महिला महाविद्यालयात ‘खान्देशातील स्वातंत्र्य चळवळ’ या विषयावर ऑनलाईन चर्चासत्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2021 04:30 IST2021-03-18T04:30:09+5:302021-03-18T04:30:09+5:30

प्रास्ताविक रासेयो विभागप्रमुख प्रा. डॉ. एस. एच. झैदी यांनी केले. प्रमुख वक्ते डॉ. सोनवणे यांनी स्वातंत्र्य लढ्यावर उगमापासून प्रकाश ...

Online seminar on 'Freedom Movement in Khandesh' at Women's College | महिला महाविद्यालयात ‘खान्देशातील स्वातंत्र्य चळवळ’ या विषयावर ऑनलाईन चर्चासत्र

महिला महाविद्यालयात ‘खान्देशातील स्वातंत्र्य चळवळ’ या विषयावर ऑनलाईन चर्चासत्र

प्रास्ताविक रासेयो विभागप्रमुख प्रा. डॉ. एस. एच. झैदी यांनी केले. प्रमुख वक्ते डॉ. सोनवणे यांनी स्वातंत्र्य लढ्यावर उगमापासून प्रकाश टाकत हे आंदोलन खान्देशपर्यंत कसे आले, याचा इतिहास मांडला. धुळे, जळगाव, नंदुरबार येथील आंदोलन, त्यात सहभागी व्यक्ती यांची सविस्तर माहिती दिली. अध्यक्षीय समारोपात प्राचार्य डॉ. पाटील यांनी आधीच्या पिढीने गुलामगिरी अनुभवली, संघटित होऊन लढा देऊन आपल्या पिढीला स्वातंत्र्य मिळवून दिले. म्हणून, त्यांच्याबद्दल कृतज्ञता बाळगण्याचे आवाहन केले व देशाच्या प्रगतीत योगदान देण्याची अपेक्षा व्यक्त केली. कार्यक्रमात माजी कुलगुरू प्रो. डॉ. सुधीर मेश्राम यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.

सहायक कार्यक्रम अधिकारी प्रा. डॉ. आर. एम. साळुंके यांनी आभार मानले. शिक्षक, शिक्षिका व विद्यार्थिनी या उपक्रमात सहभागी झाल्या होत्या.

Web Title: Online seminar on 'Freedom Movement in Khandesh' at Women's College