रस्त्यावर थुंकणाऱ्या एकास २०० रुपये दंड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 27, 2020 12:53 PM2020-03-27T12:53:57+5:302020-03-27T12:54:15+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क खांडबारा : कोरोनाच्या संदर्भात नवापूरचे गटविकास अधिकारी व पथक हे सुचना देत असतांनाच एकाने त्यांच्यासमोरच रस्त्यावर ...
लोकमत न्यूज नेटवर्क
खांडबारा : कोरोनाच्या संदर्भात नवापूरचे गटविकास अधिकारी व पथक हे सुचना देत असतांनाच एकाने त्यांच्यासमोरच रस्त्यावर थुंकल्याने पथकाने जागेवरच संबधीत व्यक्तीला २०० रुपयांचा दंड ठोठावला. जागेवरच दंड भरण्यास देखील लावला.
कोरोनाच्या पार्श्वभुमीवर जिल्हाभरात दक्षता पाळली जात आहे. पान, गुटखा खावून सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता करू नये म्हणून अशी दुकाने व टपरीच बंद करण्यात आल्या आहेत. तरीही अनेकजण गुटखा खावून रस्त्यांवर थुंकत असल्याचे चित्र आहे. गुरुवारी खांडबारा येथे गटविकास अधिकारी नंदकुमार वाळेकर यांचे पथक गेले असतांना त्यांना हा अनुभव आला. मुख्य बाजारपेठेत दुकानदारांना कोरोनासंदर्भात घ्यावयाची काळजी व उपाययोजना यासंदर्भात माहिती देत असतांनाच एकाने त्यांच्यासमोरच सार्वजनिक ठिकाणी थुंकल्याचे त्यांना निदर्शनास आले. त्यांनी पथकातील लोकांना संबधीत व्यक्तीस समज देवून दंड अकारणी करण्याच्या सुचना दिल्या. नियमानुसार संबधीत व्यक्तीकडून २०० रुपयांचा दंड अकारून रितसर पावती देखील देण्यात आली.
याशिवाय मास्क न लावता एकाने वस्तू विक्री केली तर एकाने परवाणगी नसतांना दुकान उघडल्याने त्यालाही दंड अकारण्यात आला. यावेळी गटविकास अधिकारी वाळेकर यांच्यासह सहायक पोलीस निरिक्षक गणेश न्हायदे, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.हरिष कोकणी, सरपंच, उपसरपंच आदी उपस्थित होते.
सार्वजनिक ठिकाणी व रस्त्यांवर थुंकण्यास मनाई असल्याचा कायदाच आहे. परंतु त्याची अंमलबजावणी होत नाही. अशा कारवाईतून संबधितांना कायदा व नियमांची आठवण करून दिली जात आहे.