रस्त्याने जाऊ देण्याच्या वादातून तिघांची एकास मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 5, 2021 04:31 AM2021-03-05T04:31:37+5:302021-03-05T04:31:37+5:30

नंदुरबार : रस्ता काँक्रिटीकरणाचे काम सुरू असताना त्यावरून जाऊ द्यावी, असे सांगितले असता त्याचा राग येऊन तिघांनी एकास बेदम ...

One of the three was beaten up over an argument over leaving the road | रस्त्याने जाऊ देण्याच्या वादातून तिघांची एकास मारहाण

रस्त्याने जाऊ देण्याच्या वादातून तिघांची एकास मारहाण

googlenewsNext

नंदुरबार : रस्ता काँक्रिटीकरणाचे काम सुरू असताना त्यावरून जाऊ द्यावी, असे सांगितले असता त्याचा राग येऊन तिघांनी एकास बेदम मारहाण केल्याची घटना खामगाव, ता.नंदुरबार येथे घडली. याबाबत तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, खामगाव येथे रस्ता काँक्रिटीकरणाचे काम सुरू आहे. त्या भागातून शंभू राजन भिल हा जात होता. रस्त्याने जात असतांना त्याला राहुल सुनील भिल, दीपक सुनील भिल व विशाल नामक युवकाने त्याला अडवून वाद घातला. वादातून तिघांनी लाकडी दांडक्याने तसेच हाताबुक्क्याने जबर मारहाण केली. याशिवाय दगडाने देखील मारहाण केली. याबाबत शंभू राजन भिल यांच्या फिर्यादीवरून राहुल, दीपक व विशाल यांच्याविरुद्ध तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलीस नाईक मुकेश ठाकरे करीत आहे.

Web Title: One of the three was beaten up over an argument over leaving the road

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.