शहरं
Join us  
Trending Stories
1
Mansarovar Yatra: "लिपुलेख आमचाच!" भारताच्या मानसरोवर यात्रेला नेपाळचा विरोध; चीनवरही निशाणा
2
चार राज्यांच्या निवडणूका: फलोदीसह अमेरिकन पॉलिमार्केटमध्येही सट्ट्याची धूम; बंगालवर सर्वाधिक सट्टा, भाजपा-तृणमूलमध्ये 'कांटे की टक्कर'
3
निकालापूर्वी बंगालमध्ये दहशत पसरवण्याचा प्रयत्न! भाजप नेत्याच्या घरावर गोळीबार, दोघांना अटक
4
वॉशिंग्टनची 'सुंदर' खेळी! अखेरच्या षटकात षटकार मारत संपवली मॅच; GT ने टेबल टॉपर PBKS ला दिला पराभवाचा धक्का
5
रेल्वे प्रवासात तुमची लूट तर होत नाहीये? जाणून घ्या, खाण्यापिण्याचे दर; बघा IRCTC चं अधिकृत रेट कार्ड
6
​परतवाड्याचा लाकूड बाजार आगीच्या भक्ष्यस्थानी; आकाशाला भिडल्या ज्वाळा, कोट्यवधींचे नुकसान!
7
"रडण्याची वेळ आली आहे...!" बंगाल निकालापूर्वीच मौलाना जर्जिश अंसारी यांच प्रक्षोभक विधान; योगींना म्हणाले 'शेर'!
8
GT vs PBKS: अर्धा संघ ४७ धावांत गारद! पंजाबसाठी मुंबईकर सूर्यांश शेडगेनं शड्डू ठोकला; २४ चेंडूत पहिली IPL फिफ्टी
9
'भाजपाचा झेंडा असलेल्या कार ईव्हीएम स्ट्राँग रुमजवळ कशा?', ममता बॅनर्जींच्या मतदारसंघात खळबळ
10
GT कडून बॉक्सरच्या लेकाला IPL पदार्पणाची संधी; CSK च्या ताफ्यातून बाकावर बसून ठरलेला IPL चॅम्पियन!
11
मिसिंग लिंकवर सेल्फी, फोटो काढाल, तर महागात पडेल; सीसीटीव्हीची नजर, MSRDCने दिला इशारा
12
मुंबईकर रहाणे-रघुवंशी जोडीचा हिट शो, रिंकूचा फिनिशिंग टच! SRH ला मात देत KKR ची विजयी हॅटट्रिक
13
अल्पवयीन मुलीवर पित्याकडूनच अत्याचार, मुलगी गर्भवती; वडिलांस अटक
14
लॅपटॉप वापरताना 'ही' एक छोटी चूक ठरू शकते मोठा धोका! आताच सुधारली नाही, तर होईल भारी नुकसान
15
"माझा सत्तेत बसलेल्यांना थेट सवाल आहे, तुमचं...", अमित ठाकरे नसरापूर प्रकरणावरून सरकारवर संतापले
16
लैंगिक शोषण प्रकरण: विनेश फोगाटचा मोठा खुलासा; "मीही त्या ६ पीडित महिला कुस्तीपटूंपैकी एक"
17
एकाच गर्भातून जन्माला आल्या जुळ्या बहिणी, पण वडील मात्र वेगवेगळे! DNA चाचणीतून ४९ वर्षांपूर्वीचं गुपित झालं उघड अन्...
18
Maharashtra Weather: उष्णतेच्या तडाख्यातून दिलासा मिळणार, चार जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट! पुढील चार दिवस कसे असेल हवामान?
19
"दादा वाचव, हे मला मारतील!" बहिणीची शेवटची हाक अन् बरेलीत लव्ह मॅरेजचा रक्तरंजित शेवट!
20
IPL 2026: रोहित शर्मा अखेर 'मुंबई इंडियन्स' सोडणार? एका व्हायरल पोस्टमुळे चर्चांना उधाण
Daily Top 2Weekly Top 5

धडगाव शहरातील रस्त्यांची एका रात्रीत दुरुस्ती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2021 04:29 IST

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे शुक्रवारी नंदुरबार जिल्हा दाै-यावर येत आहेत. या पार्श्वभूमीवर धडगाव येथील कृषी विभागाच्या फळरोपवाटिकेच्या आवारात हेलिपॅड ...

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे शुक्रवारी नंदुरबार जिल्हा दाै-यावर येत आहेत. या पार्श्वभूमीवर धडगाव येथील कृषी विभागाच्या फळरोपवाटिकेच्या आवारात हेलिपॅड तयार करण्याचे काम बुधवारी रात्रीतून पूर्ण करण्यात आले. मुख्यमंत्री ठाकरे हे आरोग्य यंत्रणांचा आढावा घेणार असल्याने धडगाव ग्रामीण रुग्णालय तसेच शहरातील विविध भागात स्वच्छता करण्यात आली आहे. ग्रामीण रुग्णालयात स्वच्छ बेडशीट, कचराकुंड्यांची स्वच्छता, स्वच्छतागृहांची सफाई करण्यात आली. सकाळपासून कर्मचारी वा-याच्या वेगाने धावपळ करत कामे करत असल्याने याठिकाणी दाखल रुग्णही बुचकाळ्यात पडले होते. दरम्यान मुख्यमंत्री ठाकरे यांच्याकडून लसीकरण सुविधेचा आढावा घेतला जाणार असल्याची माहिती आहे. यासाठी लसीकरण कक्ष तयार करण्याचे कामही होत असल्याचे सांगण्यात आले. मुख्यमंत्री ठाकरे यांच्या या दाै-यामुळे दुर्गम भागात उत्साहाचे वातावरण असल्याचे दिसून आले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे दुस-यांदा धडगाव येथे येत असून यापूर्वी ते २०१९ मध्ये झालेल्या निवडणूक प्रचारासाठी आले होते.

मुख्यमंत्री हे हेलिपॅडवरुन मोटारीने शहरात येणार असल्याने रोझरीपाडा भागातील खड्डेमय रस्ता पूर्णपणे नव्याने करण्यात आल्याचे दिसून येत आहे. खड्ड्यांमध्ये खडी व डांबर टाकून त्यावर रोलर फिरवत पुन्हा डांबर टाकून रस्ता चकचकीत करण्याचे काम रात्री सुरु होते. सकाळीही काही भागातील खड्डे बुजवण्यात आले. दरम्यान मुख्यमंत्र्यांसोबत इतर मंत्र्यांची येण्याची शक्यता असल्याने धडगाव ते मोलगी दरम्याच्या रस्त्याचे कामही सुरु असल्याची माहिती आहे.