जमिन खरेदी-विक्री व्यवहाराच्या वादातून जमावाची एकास मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2021 04:45 IST2021-02-26T04:45:28+5:302021-02-26T04:45:28+5:30

नंदुरबार : जमिनीच्या खरेदी-विक्रीच्या व्यवहाराच्या वादातून जमावाने एकास बेदम मारहाण करीत वाहनाची तोडफोड केल्याची घटना नवापूर येथे घडली. याबाबत ...

One of the mob was beaten up over a land sale dispute | जमिन खरेदी-विक्री व्यवहाराच्या वादातून जमावाची एकास मारहाण

जमिन खरेदी-विक्री व्यवहाराच्या वादातून जमावाची एकास मारहाण

नंदुरबार : जमिनीच्या खरेदी-विक्रीच्या व्यवहाराच्या वादातून जमावाने एकास बेदम मारहाण करीत वाहनाची तोडफोड केल्याची घटना नवापूर येथे घडली. याबाबत जमावाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीस सूत्रांनुसार, नवापूर येथील कुणाल चंद्रकांत शहा व व्यारा येथील प्रतिक संजयभाई राणा यांच्यात जमिनीचा खरेदी-विक्रीचा व्यवहार झाला होता. त्यावरून त्यांच्यात वाद देखील होत होता. त्याच कारणातून २३ फेब्रुवारी रोजी रात्री ११ वाजता व्यारा येथील राणा परिवारातील सातजण कुणाल शाह यांच्या घरी आले. त्यांनी शाह यांच्याशी वाद घालून लाकडी दांडक्यांनी जबर मारहाण केली. शिवाय अंगणात उभी असलेल्या कारची देखील तोडफोड केली.

याबाबत कुणाल शहा यांच्या फिर्यादीवरून रोहिन किशोरभाई राणा, प्रिन्स राजेशभाई राणा, सागर किशोरभाई राणा, धवल राजेशभाई ठक्कर, प्रतिक संजयभाई राणा, अरुण राजेंद्रभाई मिश्रा, अक्षय मुकेशभाई राणा सर्व रा.व्यारा यांच्याविरुद्ध नवापूर पोलीस ठाण्यात दंगलीसह गैरकायद्याची मंडळी जमा करण्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यापैकी सहा जणांना अटक करण्यात आली आहे. तपास हवालदार विकास पाटील करीत आहे.

Web Title: One of the mob was beaten up over a land sale dispute