पीर तलावाजवळ एकाचे पैसे लूटले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 16, 2019 12:02 PM2019-10-16T12:02:53+5:302019-10-16T12:03:00+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : शहरातील पीर तलाव परिसरात चौघांनी एकास दमदाटी करुन रोख रक्कम लंपास केल्याची घटना सोमवारी ...

One looted money at Lake Pir | पीर तलावाजवळ एकाचे पैसे लूटले

पीर तलावाजवळ एकाचे पैसे लूटले

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : शहरातील पीर तलाव परिसरात चौघांनी एकास दमदाटी करुन रोख रक्कम लंपास केल्याची घटना सोमवारी रात्री उशिरा घडली़ चौघांनी रस्त्यावरुन ये-जा करतो म्हणून हप्ता दे अशी मागणी करत शिवीगाळ केली होती़ 
घोडापीर मोहल्ल्यातील शेख इमरान शेख सलीम कुरेशी हे खामगाव येथून पोल्ट्रीचे पैसे घेऊन रात्री घरी येत असताना पीर तलावाजवळ भिमा लाकूड तोडय़ा रा़ बंधारहट्टी व इतर तिघांनी वाहन अडवल़े यावेळी चौघांनी दमदाटी करुन इमरान कुरेशी यांच्या खिशातील 14 हजार काढून घेत वाहनाची तोडफोड करुन नुकसान केल़े कुरेशी यांनी तातडीने शहर पोलीस ठाण्यात धाव घेत दिलेल्या फिर्यादीवरुन चौघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आह़े 
 

Web Title: One looted money at Lake Pir

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.