सुलतानपूर फाट्याजवळ ट्रकच्या धडकेत एक ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 17, 2020 11:49 AM2020-02-17T11:49:28+5:302020-02-17T11:49:43+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क ब्राह्मणपुरी : शहादा-खेतीया मार्गावर सुलतानपुर फाट्यानजीक अज्ञात वाहनाने पायी जाणाऱ्या जबर धडक दिल्याने त्याचा मृत्यू झाल्याची ...

One killed in truck collision near Sultanpur Gate | सुलतानपूर फाट्याजवळ ट्रकच्या धडकेत एक ठार

सुलतानपूर फाट्याजवळ ट्रकच्या धडकेत एक ठार

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
ब्राह्मणपुरी : शहादा-खेतीया मार्गावर सुलतानपुर फाट्यानजीक अज्ञात वाहनाने पायी जाणाऱ्या जबर धडक दिल्याने त्याचा मृत्यू झाल्याची घटना रविवारी पहाटे चार वाजेच्या सुमारास घडली़
राजू सोनवणे (४०) असे मयत व्यक्तीचे नाव असून तो कोचरा येथील रहिवासी आहे़ पहाटे चार वाजेच्या सुमारास सोनवणे हा सुलतानपूर फाट्याकडे पायी जात असताना ट्रकने धडक दिल्याने त्याचा मृत्यू झाला़ घटनेची माहिती मिळाल्यानंतर ब्राह्मणपुरी येथील पोलीस पाटील रविंद्र पवार यांनी शहादा पोलीस स्टेशनला खबर दिली़ उशिरापर्यंत मयताची ओळख पटली नव्हती़ पोलीस कॉन्स्टेबल नरेंद्र सोनार यांनी कोचरा व खेडदिगर येथे चौकशी केल्यावर मृतदेहाची ओळख पटली़ उशिरापर्यंत शहादा पोलीसात गुन्हा दाखल करणे सुरु होते़

Web Title: One killed in truck collision near Sultanpur Gate

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.