मोलगी रस्त्यावर अपघातात एक ठार तर दहाजण जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2020 12:21 IST2020-08-12T12:20:56+5:302020-08-12T12:21:03+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : मोलगी ता़ अक्कलकुवा ते बालघाट रस्त्यावर सेलकीपाडाजवळ खाजगी प्रवासी वाहनाचा अपघात होवून एक ठार ...

One killed, ten injured in road mishap | मोलगी रस्त्यावर अपघातात एक ठार तर दहाजण जखमी

मोलगी रस्त्यावर अपघातात एक ठार तर दहाजण जखमी

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : मोलगी ता़ अक्कलकुवा ते बालघाट रस्त्यावर सेलकीपाडाजवळ खाजगी प्रवासी वाहनाचा अपघात होवून एक ठार त १० जण जखमी झाले़ ४ मार्च २०२० रोजी हा अपघात घडला होता़ याप्रकरणी सोमवारी वाहनचालकाविरोधात प्राणंतिक अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला़
४ मार्च रोजी बालाघाटच्या सेनकीपाड्याजवळ एमएच ३९-१६२१ वरील प्रवासी वाहनचालक भरत वाहऱ्या वसावे याने भरधाव वेगात डोंगर उतारावर वाहन चालवले होते़ यात वाहन रस्त्याच्या खाली उतरुन झालेल्या गंभीर अपघातात विरजी खेमा वळवी रा़ सरीचा बुंदेसरीपाडा हे मयत झाले होते़ तर दिलीप वसावे, रायसा वसावे, बाबुलाल वसावे, मोत्या वसावे, मोगी वसावे, रतिलाल वसावे, काकड्या वसावे, लक्ष्मण वसावे, तुलसीदास वसावे, विलास वसावे सर्व रा़ बुंदेसरीपाडा ता़ अक्कलकुवा हे जखमी झाले होते़
याप्रकरणी संदीप विरजी वळवी याने मोलगी पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून संशयित चालक भरत वसावे याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ तपास सहायक पोलीस उपनिरीक्षक गावीत करत आहेत़

Web Title: One killed, ten injured in road mishap