रिक्षा अपघातात एक ठार

By Admin | Updated: March 24, 2017 00:15 IST2017-03-24T00:15:09+5:302017-03-24T00:15:09+5:30

नंदुरबार : भरधाव रिक्षा उलटून झालेल्या अपघातात एक जण ठार, तर तीन जण जखमी झाल्याची घटना इस्लामपूरनजीक २२ रोजी घडली.

One killed in rickshaw accident | रिक्षा अपघातात एक ठार

रिक्षा अपघातात एक ठार


नंदुरबार :  भरधाव रिक्षा उलटून झालेल्या अपघातात एक जण ठार, तर तीन जण जखमी झाल्याची घटना इस्लामपूरनजीक २२ रोजी घडली.
पोलीस सूत्रांनुसार, म्हसावदहून इस्लामपूरकडे प्रवासी घेऊन रिक्षा जात होती. भरधाव रिक्षाचा वळणावर चालकाकडून ताबा सुटल्याने रिक्षा उलटली. त्यात बसलेल्या वसंतीबाई शिवा मोरे (४०) यांना गंभीर मार लागल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. तर दयाराम ब्रिजलाल ठाकरे, रेलसिंग आपसिंग वळवी, तेल्या बावज्या शेमळे, रा.चिरडे हे गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले.
उदेसिंग शिवा मोरे यांनी फिर्याद दिल्याने चालक मंगल फेका ठाकरे, रा.लक्कडकोट, ता.शहादा याच्याविरुद्ध म्हसावद पोलीस  ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: One killed in rickshaw accident