१५ दिवसानंतर सीसीआयकडून खरेदी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 14, 2020 12:35 IST2020-03-14T12:35:45+5:302020-03-14T12:35:52+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : एकीकडे शेतकरी मिळेल त्या भावात कापूस विक्रीसाठी खेडा खरेदीकडे धाव घेत होता तर दुसरीकडी ...

One killed, eight injured in road mishap | १५ दिवसानंतर सीसीआयकडून खरेदी

१५ दिवसानंतर सीसीआयकडून खरेदी

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : एकीकडे शेतकरी मिळेल त्या भावात कापूस विक्रीसाठी खेडा खरेदीकडे धाव घेत होता तर दुसरीकडी सीसीसायची खरेदी १५ दिवसांपासून बंद होती. यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक फटका सहन करावा लागत होता. ही बाब लक्षात घेता नंदुरबार बाजार समितीने सीसीआयकडे पाठपुरावा करून पुन्हा खरेदी केंद्र सुरू केले आहे. या ठिकाणी भाव देखील ५,२५० ते ५,४५० मिळत असल्याने समाधान व्यक्त होत आहे.
नंदुरबार बाजार समितीतर्फे खाजगी व्यापारी आणि सीसीआयकडून कापूस खरेदी केली जाते. यंदा डिसेंबर महिन्यापासून हे केंद्र सुरू करण्यात आले होते. यंदा पर्जन्यमान चांगले राहिल्याने कापूस उत्पादन देखील चांगले आले. परिणामी अजूनही कापूस विक्रीसाठी येत आहे. परंतु १५ दिवसांपासून सीसीआयने कापूस खरेदी अचानक बंद केली होती. परिणामी शेतकऱ्यांना खाजगी व्यापाºयांकडे कापूस विक्री करावा लागत होता. त्यात त्यांना आर्थिक फटका सहन करावा लागत होता. ही बाब लक्षात घेता माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी व बाजार समितीचे सभापती किशोर पाटील यांनी सीसीसायच्या वरिष्ठ अधिकाºयांकडे पाठपुरावा करून आणखी काही दिवस सीसीआयची कापूस खरेदी सुरू ठेवण्याची मागणी केली. त्यांच्या मागणीवरून सीसीआयने पुन्हा कापूस खरेदीला सुुरुवात केली आहे.
पहिल्याच दिवशी २०० वाहने
सीसीआयने कापूस खरेदीला सुरुवात करताच पहिल्याच दिवशी तब्बल २०० वाहने खरेदी केंद्रात दाखल झाली. सर्व वाहनांमधील कापसाची खरेदी करण्यात आली. यापुढे दररोज किमान ५० ते ६० वाहनांमधीलच कापूस खरेदी केला जाणार असल्याचे सीसीआयने स्पष्ट केले आहे. सीसीआयच्या अटी व शर्ती कायम राहणार आहेत. चांगल्याच चांगल्या कापसाला जास्तीत जास्त भाव देण्यात येत आहे. त्यामुळे शेतकºयांमध्ये समाधान देखील व्यक्त होत आहे. कमीत कमी ५,२५० ते ५,४५० रुपये भाव सध्या या ठिकाणी मिळत आहे. कापूस खरेदी शुभारंभाच्या वेळी सभापती किशोर पाटील, सचिव योगेश अमृतकर, सीसीआयचे केंद्रप्रमुख आदित्य वामन, पंकज झाडे यांच्यासह कर्मचारी व शेतकरी उपस्थित होते.
खेडा खरेदीत फसवणूक
अद्यापही शेतकºयांकडे मोठ्या प्रमाणावर कापूस पडून आहे. मध्यंतरी वातावरणातील बदलामुळे शेतकरी चिंतेत होते. परिणामी मिळेल त्या भावात कापूस विक्री करण्याकडे शेतकºयांचा कल होता. त्यातच सीसीआयची खरेदी बंद होती. परिणामी खाजगी व्यापारी खेडा खरेदीतून शेतकºयांना अगदी कमी भाव दिला जात होता. शिवाय वजन देखील सदोष राहत होते. परिणामी शेतकºयांना आर्थिक फटका सहन करावा लागला. अद्यापही गावोगावी अनेक शेतकरी आर्थिक फटका सहन करून खेडा खरेदीत कापूस विक्री करीत आहेत.
बाजार समितीचे आवाहन
सीसीआयने कापूस खरेदी सुरू केली असली तरी कापूस ठेवण्याासाठीची जागा, मणुष्यबळ लक्षात घेता दररोज किमान ५० ते ६० वाहनांमधील कापूस लिलाव होणार आहे. यामुळे शेतकºयांनी सहकार्य करावे असे आवाहन बाजार समितीचे सचिव योगेश अमृतकर यांनी केले आहे.

Web Title: One killed, eight injured in road mishap