शहरं
Join us  
Trending Stories
1
"आक्षेप घेणाऱ्यांनी हे पुस्तक वाचलंय का?"; विनाकारण वाद करु नका म्हणत मुख्यमंत्री फडणवीसांचे खडे बोल
2
Top Marathi News LIVE Updates: मराठी सक्तीसाठी १५ ऑगस्टपर्यंत मुदतवाढ; मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती
3
सुटलात...! पूर्वीच्या काळी सायकल चालवायला देखील लायसन लागायचे, देशपांडेंना आजोबांच्या ट्रंकात सापडले...
4
Bank of Baroda मध्ये जमा कर ₹१,००,००० आणि मिळवा ₹५१,६४४ चं फिक्स व्याज, सरकारी गॅरेंटीसह बंपर रिटर्न
5
खासगी शाळांमध्ये आता मराठी शिकवणे बंधनकारक; नियम मोडणाऱ्या शाळेला बसणार दणका
6
पाकिस्तानकडे ५-६ दिवस पुरेल एवढेच कच्चे तेल! भारताकडे मागणार? अर्थमंत्री हतबल, जनतेत घबराट
7
'खरातच्या सल्ल्यानुसार बारामतीमधील एका नेत्याने केली होती अजितदादांच्या घराबाहेर पूजा, रोहित परावांचा मोठा गौप्यस्फोट
8
“प्रियंका चोप्रामुळे राघव चड्ढा यांचा भाजपात प्रवेश”; नवज्योत सिंग सिद्धू यांच्या पत्नीचा मोठा दावा
9
धक्कादायक! नाशिक, अमरावतीसारखा प्रकार कोल्हापुरात; तरुणींचे Video बनवून ब्लॅकमेल, तरुणाला अटक
10
Budh Pradosh 2026: कर्जमुक्ती आणि मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी २९ एप्रिलला न चुकता करा 'बुध प्रदोष' व्रत
11
तुमची गुप्त ऊर्जा जागृत आहे का? राशीनुसार करा ‘हे’ साधे-सोपे उपाय; नशिबाची साथ-भरघोस लाभ!
12
अजितदादांच्या अपघातादिवशीच विमान कंपनीला ९ कोटींचे बक्षीस; रोहित पवारांचे खळबळजनक आरोप
13
भारत लष्करी खर्चात जगात पाचवा ठरला! शेजारी पाकिस्तान जवळपासही कुठेच नाहीय..., चीन मात्र...
14
गोलsss... पंतप्रधान नरेंद्र मोदी सिक्कीमच्या तरुणांसोबत खेळले फुटबॉल, PHOTOS ची रंगली चर्चा
15
वाढदिवसासाठी Reel तयार करण्याच्या नादात युवकाने भलताच उद्योग केला; शेवटी हातात पडल्या बेड्या
16
Adhar Card : मोठा बदल! आता आधार कार्ड तुमचे वय सिद्ध करणार नाही, तुम्हाला जन्मतारखेचा पुरावा म्हणून 'ही' कागदपत्रे दाखवावी लागणार
17
कलमा वाचता येतो का? विचारले अन् सुरक्षा रक्षकांवर चालवला चाकू; मीरा रोडच्या हल्ल्यात 'लोन वुल्फ'चा संशय
18
Robert Kiyosaki Prediction: रॉबर्ट कियोसाकी यांची २०२६-२७ मध्ये मोठ्या आर्थिक संकटाची भविष्यवाणी; भारतीय गुंतवणूकदारांनी काय करावं?
19
‘RTE’ प्रवेश! पसंतीच्या शाळेसाठी पालकांची कोंडी; ३० एप्रिलपर्यंत मुदतवाढ, तरीही संभ्रम कायम
20
तुमच्या छोट्याशा बाल्कनीला, खिडकीला द्या 'ग्रीन टच'; कमी जागेत बाग फुलवण्याच्या 'मास्टर ट्रिक'
Daily Top 2Weekly Top 5

दारू चोरी प्रकरणातील एकजण ताब्यत, तीन जण फरार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2021 04:32 IST

नंदुरबार : वॅाईन शॅाप फोडून चार लाख ९४ हजार रुपयांची दारू चोरीप्रकरणी एकास अटक करण्यात आली असून, त्याच्याकडून २२ ...

नंदुरबार : वॅाईन शॅाप फोडून चार लाख ९४ हजार रुपयांची दारू चोरीप्रकरणी एकास अटक करण्यात आली असून, त्याच्याकडून २२ हजार रुपयांची दारू जप्त करण्यात आली आहे. त्याचे एका अल्पवयीनसह तीन साथीदार फरार झाले आहेत. एलसीबीने ही कारवाई केली.

नंदुरबारातील गरीविहार गेट भागातील मोरे वॅाईन शॅाप फोडून चोरट्यांनी चार लाख ९४ हजार रुपयांची दारू चोरून नेल्याची घटना ६ मे रोजी घडली होती. संचारबंदी काळात आणि भरवस्तीत दारू दुकान फोडल्याने खळबळ उडाली होती. या घटनेचा तपास करण्याचे निर्देश पोलीस अधीक्षकांनी एलसीबीला दिले होते. त्यानुसार एलसीबीचे निरीक्षक विजयसिंग राजपूत यांनी पथक स्थापन करून तपासाला गती दिली. अशा प्रकारची चोरी करणाऱ्यांचा शोध घेतला असता सिलिंडर चोरी प्रकरणातील संशयित अविनाश यशवंत नरभवर यावर लक्ष केंद्रीत केले. तो सिंधी कॉलनी परिसरात फिरत असल्याचे लक्षात आल्यावर त्याला ताब्यात घेतले असता त्याने चोरीची कबुली दिली. वाईन शॅापमधील चोरीत आपल्यासह आणखी तिघे सहभागी असल्याचे सांगितले. त्यात आकाश रोहिदास पाडवी (रा. खोडाई माता मंदिराजवळ), विशाल बजरंग मराठे (रा. मोरे वाईन शॅापच्या बाजुला) व सिंधी कॉलनीतील एका अल्पवयीन मुलाचे नाव सांगितले. चोरी केेलेला दारूसाठा सिंधी कॉलनीतील बंद शाळेच्या मागील बाजूस लपविल्याचे सांगितले. तेथे तपासणी केली असता २२ हजार रुपये किमतीचे तीन बॅाक्स जप्त करण्यात आले. संशयित इतर तिन्ही फरार झाले आहेत. त्यांचा शोध घेतला जात आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित, अपर अधीक्षक विजय पवार यांच्या मार्गदर्शनाखाली एलसीबीचे निरीक्षक विजयसिंग राजपूत, हवालदार जितेंद्र तांबोळी, राकेश मोरे, दादाभाई मासूळ, आनंदा मराठे यांच्या पथकाने केली.