वावद येथे वाहतुकीला अडथळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 08:06 IST2021-02-05T08:06:50+5:302021-02-05T08:06:50+5:30

मजूरअभावी शेतकरी त्रस्त नंदुरबार: रब्बीचा हंगाम जोरात सुरू असल्याने शेती कामांना चांगला वेग आला आहे; मात्र पिकांची निगा राखण्यासाठी ...

Obstruction of traffic at Wawad | वावद येथे वाहतुकीला अडथळा

वावद येथे वाहतुकीला अडथळा

मजूरअभावी शेतकरी त्रस्त

नंदुरबार: रब्बीचा हंगाम जोरात सुरू असल्याने शेती कामांना चांगला वेग आला आहे; मात्र पिकांची निगा राखण्यासाठी व शेतातील विविध कामांसाठी मजूर उपलब्ध होत नसल्याने शेतकऱ्यांना कसरत करावी लागत आहे. उस तोडणीसाठी मजुरांचे स्थलांतर झाल्यामुळे शेतातील कामांसाठी मजुराची अधिक गरज पडू लागली आहे. मजूर उपलब्ध होत नसल्याने शेतकऱ्यांकडून विविध उपाययोजना करण्यात येत आहे.

शहरातील बेशिस्त पार्किंगमुळे वाहतुकीला अडथळा

नंदुरबार: शहरातील मंगळबाजार परिसरात वाहनधारक बेशिस्त दुचाकी, तीनचाकी, चारचाकी वाहने पार्किंग करत असल्याने वाहतुकीला अडथळा निर्माण होत आहे. वाहनाचा खोळंबा होऊन वाहनाच्या लांब रांगा लागत असून, वाहनधारकांना त्रासाला सामोरे जावे लागत आहे. रस्त्याच्या दोन्ही बाजूने वाहने पार्किंग करणाऱ्या बेशिस्त वाहनधारकांवर पोलीस प्रशासनाकडून कार्यवाही करण्यात यावी, अशी मागणी होत आहे.

Web Title: Obstruction of traffic at Wawad