शहरं
Join us  
Trending Stories
1
"रडण्याची वेळ आली आहे...!" बंगाल निकालापूर्वीच मौलाना जर्जिश अंसारी यांच भडकावू विधान; योगींना म्हणाले 'शेर'!
2
'भाजपाचा झेंडा असलेल्या कार ईव्हीएम स्ट्राँग रुमजवळ कशा?', ममता बॅनर्जींच्या मतदारसंघात खळबळ
3
मुंबईकर रहाणे-रघुवंशी जोडीचा हिट शो, रिंकूचा फिनिशिंग टच! SRH ला मात देत KKR ची विजयी हॅटट्रिक
4
"माझा सत्तेत बसलेल्यांना थेट सवाल आहे, तुमचं...", अमित ठाकरे नसरापूर प्रकरणावरून सरकारवर संतापले
5
लैंगिक शोषण प्रकरण: विनेश फोगाटचा मोठा खुलासा; "मीही त्या ६ पीडित महिला कुस्तीपटूंपैकी एक"
6
एकाच गर्भातून जन्माला आल्या जुळ्या बहिणी, पण वडील मात्र वेगवेगळे! DNA चाचणीतून ४९ वर्षांपूर्वीचं गुपित झालं उघड अन्...
7
Maharashtra Weather: उष्णतेच्या तडाख्यातून दिलासा मिळणार, चार जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट! पुढील चार दिवस कसे असेल हवामान?
8
"दादा वाचव, हे मला मारतील!" बहिणीची शेवटची हाक अन् बरेलीत लव्ह मॅरेजचा रक्तरंजित शेवट!
9
IPL 2026: रोहित शर्मा अखेर 'मुंबई इंडियन्स' सोडणार? एका व्हायरल पोस्टमुळे चर्चांना उधाण
10
आंबा पाहताच तोंडाला पाणी सुटतं, पण जरा थांबा; जास्त खाल्ल्याने शरीरात उष्णता वाढते, कारण...
11
इराणचा शांततेचा हात, ट्रम्प यांचा लाथ मारण्याचा इशारा! "चुकीचं वागलात तर याद राखा..."
12
नेपाळमध्ये 'बालेन' स्टाईल दणका! एका क्षणात १५०० सरकारी अधिकाऱ्यांना बसवलं घरी; नव्या सरकारचा मोठा निर्णय
13
मिस्ट्री स्पिनर सुनील नरेनचा ऐतिहासिक पराक्रम! IPL मध्ये २०० विकेट्स घेणारा पहिला परदेशी गोलंदाज
14
IPL मधील पहिला भारतीय शतकवीर! KKR कडून संधी मिळताच पठ्ठ्याची रोहित-विराटच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
15
Sara Tendulkar : "कसं वागावं, कोणते कपडे घालावे?"; सारा तेंडुलकरने केला सचिनच्या 'कडक' शिस्तीबाबत खुलासा
16
...तर नसरापूरच्या नराधमाला १५ ते २१ दिवसांत फाशीची शिक्षा झाली असती- राज्याचे माजी गृहमंत्री
17
Video: डोंगराळ मार्गावरून जात असताना अचानक रस्ता खचला, बघता-बघता ट्रक आत रूतला अन् मग...
18
कडक निर्बंध, तरीही इराणचं तेल पोहचलं आशियात! अमेरिकेच्या डोळ्यात धूळ फेकत कसं निघालं जहाज?
19
दिल्लीत AC ब्लास्टने जैन कुटुंब संपलं; आईच्या छातीशी घट्ट बिलगलेला दीड वर्षांचा आरू अन् शेवटचा तो व्हिडिओ कॉल...
20
आईच्या जीवाभावाच्या मैत्रिणीनेच रचला १४ वर्षांच्या चिमुरड्याच्या हत्येचा कट; सीसीटीव्हीमुळे फुटलं भांडं!
Daily Top 2Weekly Top 5

कर वसुलीसाठी जप्तीच्या नोटीसा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2020 12:11 IST

लोकमत न्यूज नेटवर्क शहादा : नगरपरिषद हद्दीतील मालमत्ता कर व पाणीपट्टी थकबाकीदार यांना कराची रक्कम भरण्याबाबत वारंवार लेखी मागणी ...

लोकमत न्यूज नेटवर्कशहादा : नगरपरिषद हद्दीतील मालमत्ता कर व पाणीपट्टी थकबाकीदार यांना कराची रक्कम भरण्याबाबत वारंवार लेखी मागणी बीले बजाविण्यात आली असून, नोटीसीव्दारे रक्कम भरण्याची सूचना दिली आहे. सूचना देऊन व जप्तीपूर्व नोटीस बजाविल्यानंतरही ज्यांनी कराची रक्कम भरलेली नाही त्यांच्या नांवाची यादी वृत्तपत्रात प्रसिध्द करण्यात येणार आहे. अश्या थकित मालमत्ताधारकांनी कराची रक्कम न भरल्याने शहरातील २७ नळ कनेक्शन खंडीत करण्यात आल्याची माहिती मुख्याधिकारी राहुल वाघ यांनी दिली.शहादा शहरामध्ये एकूण दहा हजार ९०० मालमत्ता धारक असून, त्यात दोन हजार ८०० झोपडपट्टी धारक आहेत. या मालमत्ता धारकांकडून मागील अंदाजित एक कोटी ७१ लाख व सन २०१९-२० या वर्षा करिता अंदाजित तीन कोटी १२ लाख अशी एकूण अंदाजित चार कोटी ८४ लाख रूपये कराची मागणी आहे. यापैकी दोन कोटी नऊ लाख वसुल झाले असून, अंदाजित एक कोटी ९४ लाख रूपये वसुल करणे बाकी आहे.या वसुलीसाठी धडक मोहिम राबविण्यात येत असून, कर वसुलीची मोहिम प्रभावीपणे राबविण्याच्या दृष्टीने शहरातील १० हजाराच्या पुढे थकबाकी असणाऱ्या १०० मालमत्ता धारकांची यादी तयार करण्यात आली आहे. या थकबाकीदारांना पुरेशी व वाजवी संधी देवूनही त्यांनी थकबाकी रक्कम न भरल्यास अश्या मालमत्ताधारकांची नांवे वृत्तपत्रात लवकरच प्रसिध्द करण्यात येणार आहे. त्यांच्या स्थावर व जंगम मालमत्तेची जप्ती करण्याची कारवाई करण्यात येत आहे.यासाठी महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम १९६५ मधील कलम १५२ मधील तरतूदी नुसार थकबाकीदारांना जप्तीची कारवाई करण्याच्या नोटीस बजावण्यात आलेल्या आहेत.तद्नंतरही या मालमत्ताधारकांनी थकबाकीची रक्कम न भरल्याने शहादा नगरपरिषदेने सुरू केलेल्या कर वसुली धडक मोहिमेमध्ये शहरातील २७ मालमत्ता धारकांचे नळ कनेक्शन तोडण्यात आले आहेत. तसेच ज्या मालमत्ता धारकांची १० हजाराच्या पुढे थकबाकी आहे, अश्या मालमत्ता धारकांची यादी वृत्तपत्रात प्रसिध्दी केल्यानंतरही थकबाकी रक्कम न भरल्यास त्यांच्या मालमत्तेची जप्ती करण्यात येणार आहेत.मालमत्ता जप्त केल्यानंतरही मालमत्ता धारकाने रक्कम न भरल्यास शासन निर्देशानुसार व महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम १९६५ मधील कलम १५६ मधील तरतूदी नुसार जिल्हाधिकारी यांच्या मंजुरीने या मालमत्तेस नगरपरिषदेचे नाव लावण्याची तरतूद करण्यात आल्याने अश्या थकबाकी मालमत्ता धारकावर याप्रमाणे कार्यवाही करण्याचे संकेत मुख्याधिकारी राहल वाघ यांनी दिले आहेत. ही विशेष धडक मोहिम मुख्याधिकारी वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली व प्रशासन अधिकारी माधव गाजरे, विधी व कामगार पर्यवेक्षक भाऊसाहेब देशमुख, मिळकत व्यवस्थापक सचिन महाडीक, सहा.भांडारपाल अख्तर खान व सहा.कर निरिक्षक तथा वॉरंट आॅफीसर राजेंद्र सैंदाणे हे कार्यवाही करीत आहे.वसुली विभागाचे कर्मचारी दिलीप कोळी, पीतांबर चव्हाण, दुर्गादास वैदू, उमाकांत शिंपी, पुरूषोत्तम शिवदे, दिलीप सोनवणे, सुनील भारती, इत्यादी तथा सहा.खलील शे.मुशीर, यशवंत तांबोळी, पांडूरंग जाधव, हरिश्चंद्र बढे, ब्रिजलाल पाटील, दीपक चौधरी, अनिल पाटील, समीर शे.सुल्तान, स्वप्नील पाटील, वसीम बेग व पाणीपुरवठा विभागातील संजीव सोनार, प्रल्हाद पाटील, रवींद्र चव्हाण, विवेक भट, नसीर बेग कलंदर बेग, रज्जाक खाटीक इत्यादी तसेच शहादा नगरपालिका अधिकारी व कर्मचारी ही विशेष धडक मोहिम राबवित आहेत.शहरात नियमित व पुरेसा पाणीपुरवठा करण्यासाठी नगरपालिका प्रयत्नशिल आहे. त्यामुळे नागरिकांनी पाणीपट्टी वेळेवर भरून नगरपालिकेस सहकार्य करावे असे, आवाहन पाणीपुरवठा सभापती लक्ष्मण बढे व उपनगराध्यक्षा रेखाबाई चौधरी यांनी केले. जमा होणाºया कराच्या रकमेतून शहराच्या विकासासाठी निधी उपलब्ध होणार असल्याने थकित मालमत्ता धारकांनी आपली कराची रक्कम त्वरीत नगरपरिषदेकडे भरणा करावी व कट कार्यवाही प्रसंग टाळावा, असे आवाहन नागरिकांना नगराध्यक्ष मोतीलाल पाटील यांनी केले आहे.