ई-संजीवनी ओपीडीची माहितीच नसल्याने अपेक्षित प्रतिसाद नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2021 04:29 IST2021-03-19T04:29:03+5:302021-03-19T04:29:03+5:30

नंदुरबार : ई-संजीवनी ओपीडीला जिल्ह्यात अपेक्षित प्रतिसाद नसल्याचे चित्र आहे. मुख्यत: अशा प्रकारची सुविधा असल्याचेच नागरिकांना माहिती नसल्याचे समोर ...

No expected response as e-Sanjivani OPD is not known | ई-संजीवनी ओपीडीची माहितीच नसल्याने अपेक्षित प्रतिसाद नाही

ई-संजीवनी ओपीडीची माहितीच नसल्याने अपेक्षित प्रतिसाद नाही

नंदुरबार : ई-संजीवनी ओपीडीला जिल्ह्यात अपेक्षित प्रतिसाद नसल्याचे चित्र आहे. मुख्यत: अशा प्रकारची सुविधा असल्याचेच नागरिकांना माहिती नसल्याचे समोर आले आहे.

कोरोना काळापासून जिल्ह्यात ई-संजीवनी ओपीडी नामक सुविधा सुरू करण्यात आल्या आहेत. नागरिकांना काही आजारांबाबत माहिती हवी असल्यास, घरगुती उपचार हवा असल्यास किंवा डॅाक्टरांकडून काही मार्गदर्शन हवे असल्यास ॲानलाईन असलेल्या डॅाक्टरांना विचारणा करण्याची सोय आहे. जिल्हा रुग्णालयात आळीपाळीने दोन ते तीन डॅाक्टरांची या सेवेसाठी नियुक्ती केली जाते. परंतु नागरिकांना या सुविधेची माहितीच नाही. विशेष म्हणजे कोरोना काळात घरी राहूनच उपचार करून घेणे व डॅाक्टरांचे मार्गदर्शन मिळवावे असा या सुविधेचा उद्देश होता. दरम्यान, लॅाकडाऊन दिवाळीच्या आधी कोरोना काळात बऱ्यापैकी फोनकॉल यासाठी येत होते. आता देखील येत असतात. त्यामुळे नागरिकांनी या सुविधेचा लाभ घ्यावा असे आवाहन अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॅा.के.डी.सातपुते यांनी केले आहे.

Web Title: No expected response as e-Sanjivani OPD is not known