शहरं
Join us  
Trending Stories
1
ममता बॅनर्जींना दुहेरी धक्का, सत्ताही गेली-जागाही हरल्या; म्हणाल्या, “भाजपाचा अनैतिक विजय”
2
नसरापूर ग्रामस्थांनी एकनाथ शिंदेंची भेट घेतली; ‘त्या’ मागणीवर उपमुख्यमंत्र्यांनी दिला शब्द
3
IPL 2026 : हिटमॅन रोहितचा धमाका! MI च्या विक्रमी विजय; पंतच्या LSG ला पराभवाचा मोठा धक्का
4
गंगोत्री ते गंगासागर ‘कमळमय’, ऐतिहासिक विजयानंतर पीएम मोदींनी कार्यकर्त्यांचे मानले आभार
5
वानखेडेवर रोहित-रिकल्टनचा मोठा धमाका! LSG च्या गोलंदाजांची धुलाई करताना 'या' विक्रमाला घातली गवसणी
6
VIDEO: पंतप्रधान मोदींचा 'बंगाली लूक' हिट! पारंपरिक धोती-कुर्त्यात भाजप मुख्यालयात एन्ट्री
7
अंगारकी संकष्टी चतुर्थी २०२६: ८ राशींवर बाप्पा प्रसन्न, उच्च पद, मान-सन्मान; संकट दूर होईल!
8
बुमराहनं विकेट घेतली, सेलिब्रेशनही केलं! सायरन वाजल्यावर गावसकरांनी झापलं; नेमकं काय घडलं?
9
Nicholas Pooran Record : निकोलस पूरनचं वादळी अर्धशतक; वैभव सूर्यवंशीचा रेकॉर्ड मोडला
10
Election Results 2026 LIVE: आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त - पंतप्रधान नरेंद्र मोदी
11
सुनेत्रा पवारांच्या ऐतिहासिक विजयावर सुनील तटकरेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “अजितदादा…”
12
बारामतीत अभिजित बिचुकले-करुणा मुंडेंना NOTAने केले पराभूत; कोणाला किती मते मिळाली? पाहाच
13
CM फडणवीसांनी केले श्यामाप्रसाद मुखर्जींचे स्मरण; म्हणाले, “प. बंगालचा खरा पक्ष भाजपाच...”
14
निकालाची धाकधूक, दिवसभर दुकान बंद ठेवले, भाजपा विजयी होताच पुन्हा उघडले; झालमुडी विक्रेता म्हणाला…
15
Video - " गेली १५ वर्षे मार खाल्ला..."; भाजपाच्या विजयानंतर कार्यकर्ता आनंदाने ढसाढसा रडला
16
प. बंगालच्या मुख्यमंत्रिपदी कोण? टीव्हीवरून घराघरात पोहोचलेल्या अभिनेत्रीचं नाव चर्चेत...
17
Travel : जगात फक्त 'या' ५ देशांची नावं 'D' वरून होतात सुरू; ट्रॅव्हलर्ससाठी इथली ठिकाणं आहेत स्वर्ग!
18
Ravi Kishan : Video - "आज बंगाल स्वतंत्र झाला... आता मोकळा श्वास घेईल"; रवी किशन यांनी व्यक्त केला आनंद
19
MI vs LSG : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! हार्दिकच्या जागी सूर्या टॉसला आला; रोहितचं कमबॅक, कारण...
20
ममता बॅनर्जींची सत्ता गेली! पराभवानंतर अभिषेक बॅनर्जींची पहिली प्रतिक्रिया; मतमोजणीवर उपस्थित केले गंभीर प्रश्न
Daily Top 2Weekly Top 5

आधार नाही, बेघरांना लस कशी देणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2021 04:55 IST

नंदुरबार : कोरोना लसीकरणासाठी आधार किंवा पॅन कार्डशिवाय लस दिली जात नाही. लसीकरणाचे रेकॅार्ड अद्यावत ठेण्यासाठी हे दोन पुरावे ...

नंदुरबार : कोरोना लसीकरणासाठी आधार किंवा पॅन कार्डशिवाय लस दिली जात नाही. लसीकरणाचे रेकॅार्ड अद्यावत ठेण्यासाठी हे दोन पुरावे आवश्यक असले तरी जे उघड्यावर राहतात व ज्यांच्याकडे हे दोन्ही पुरावे नाहीत त्यांना लसीकरणापासून वंचित राहावे लागणार आहे. अर्थात सामान्यांचे लसीकरण पुर्ण झाल्यावर त्यांच्याबाबत काय विचार केला जातो यावर सर्व काही अवलंबून राहणार आहे.

नंदुरबार शहरासह जिल्ह्यात उघड्यावर राहणाऱ्या कुटूंबांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे. नंदुरबारात रेल्वे स्थानक असल्यामुळे रेल्वेने येणारे भिकारी व मानसिक रोगी यांची संख्या अधीक आहे. याशिवाय व्यवसायानिमित्त आलेले अनेक कुटूंब शहरालगतच्या मोकळ्या जागांवर तात्पुरता निवारा करून राहत असतात. अशांची संख्या साधारणत: दीड हजारापेक्षा अधीक जाऊ शकते. अशा नागरिकांकडे ना आधारकार्ड ना पॅनकार्ड मग त्यांना लसीकरण कसे होईल हा प्रश्नच आहे. सर्वसामान्यांचे लसीकरण झाल्यानंतर त्यांच्याबाबत काय निर्णय होतो याकडे लक्ष आहे.

आधार, पॅनकार्ड नसेल तर पर्याय काय...

n लसीकरणाकरीता नोंदणीसाठी आधारकार्ड व पॅनकार्ड सक्तीचे आहे. ओळखीचा पुरावा म्हणून हे दोन पुरावे आवश्यक आहेत. परंतु ज्यांच्याकडे हे दोन्ही पुरावे नाहीत त्यांना मात्र अडचणीचा सामना करावा लागणार आहे. त्यासाठी मात्र आरोग्य विभागाने कुठलाही दिलासा दिलेला नाही.

n आधारकार्ड प्रत्येक नागरिकाकडे असतेच. त्यामुळे फारशी अडचण येणार नाही. परंतु जे उघड्यावर राहतात, ज्यांचे कार्ड नाही त्यांना शासनाच्या नव्याने तयार होणाऱ्या नियमावलीत काहीतरी दिलासा मिळू शकतो.

n सध्या ४५ वर्ष वयावरील व्यक्तींनाही लस दिली जात आहे. त्यासाठी आजाराचे कारण आणि डॅाक्टरांची फाईल महत्वाची आहे. त्यानंतरच ॲानलाईन किंवा ॲाफलाईन नोंदणी केली जात आहे.

बेघर निवारेच नाहीत...

n जिल्ह्यात बेघरांसाठी निवारे नाहीत. नंदुरबार पालिकेने पालिका शाळा क्रमांक एक च्या परिसरात बेघर निवारा सुरू केला आहे. परंतु त्यात अगदीच अत्यल्प जण राहत असतात.

n बेघर निवारे राहिले म्हणजे त्यांना आधारकार्ड काढण्यास मदत होते. परंतु बेघर निवारे नसल्यामुळे अनेकजण त्यापासून वंचीत राहत आहेत.

n नंदुरबारातील रेल्वेस्थानक परिसरात १०० ते दिडशे भिकारी राहत असतात. त्यातील अनेकजण वर्षानुवर्षापासून येथे राहतात. त्यांच्याबाबतही विचार होणे गरजेचे आहे.

लसीकरण करतांना प्रत्येक डोसची नोंद ठेवावी लागते. चोरीस जाऊ नये, गहाळ होऊ नये याची काळजी घ्यावी लागते. त्यासाठी लसीकरणाकरीता नाव नोंदणीला येणाऱ्यांची ओळख पटावी म्हणून ओळखीचा पुरावा म्हणून आधार किंवा पॅनकार्ड आवश्यक असल्याचे आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. बेघर किंवा भिकारी यांच्याबाबत शासन निर्णय घेईलच असेही त्यांनी सांगितले.