शहरं
Join us  
Trending Stories
1
वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरण, ट्रम्प यांची मोठी प्रतिक्रिया; इराण युद्धाशी संबंध जोडत म्हणाले…
2
तमिळ अभिनेत्री अक्षया हरिहरनच्या नावे बोगस मतदान! पोलिंग बूथवर उडाली खळबळ; कोर्टात जाणार...
3
आपली बस, आपली सेवा…! ST प्रवाशांसाठी मोठे पाऊल; १ मे पासून ‘लालपरी’चे नवे अभियान होणार सुरू
4
दिल्ली विमानतळावर अपघात! २३२ प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या स्विस एअरच्या विमानाच्या इंजिनला आग; ६ जण जखमी, धावपट्टी बंद
5
“लोकशाहीत हिंसाचाराला थारा नाही”; वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरणी PM मोदींची प्रतिक्रिया
6
“ST ग्रामीण भागाची जीवनवाहिनी, विलिनीकरणाबाबात महायुती सरकार गप्प का?”: विजय वडेट्टीवार
7
IPL मध्ये अडखणाऱ्या मुंबई इंडियन्ससाठी गुडन्यूज, ‘या’ सामन्यातून रोहित शर्मा करणार कमबॅक
8
त्याच हॉटेलमध्ये राष्ट्राध्यक्षांवर ४५ वर्षांपूर्वी झालेला गोळीबार; डोनाल्ड ट्रम्प थोडक्यात बचावले, पण...
9
पाकिस्तानने इव्हेंट बनवून ठेवला...! अमेरिका चर्चेसाठी जाणार नाही, दौरा रद्द; इराणचे परराष्ट्रमंत्री कधीचेच निघाले...
10
संरक्षण क्षेत्रात भारताची आघाडी! रशियाच्या जुन्या भागीदाराला मिळाली साथ; पुतिनही हैराण
11
अशोक खरातचे आणखी 'काळे कारनामे' उघड! ऑफिसबॉयनंतर कुकनेही उडवली झोप; फार्महाऊसमधील कृत्य एसआयटीच्या हाती
12
कोणत्याही क्षणी काश पटेल यांचे FBI संचालक पद जाणार? ट्रम्प प्रशासनामध्ये खळबळ, गच्छंतीची शक्यता
13
गोजुबावीत अजितदादांच्या प्रतिमेसमोर अघोरी पूजा, 'टाचण्या टोचलेले लिंबू'; अमोल मिटकरींच्या ट्विटने मोठी खळबळ
14
Credit Card : क्रेडिट कार्ड वापरताय? गरजेपेक्षा जास्त खर्च करणं पडेल महागात; थेट Income Tax ची नोटीस येण्याची शक्यता
15
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना शानदार, उत्साह वाढेल; पद-पैसा-चांगला लाभ, पण आरोग्य सांभाळा!
16
अमेरिकेची ‘माइन हंटिंग’ मोहीम! इराणकडून समुद्रतळात पेरलेले पाणसुरुंग काढण्याचे ट्रम्प यांचे आदेश
17
माओवाद्यांकडून सशस्त्र क्रांतीचाच पुनरुच्चार! ‎'देवजी'ला ठरवले गद्दार: आत्मसमर्पण धोरणावर पत्रकातून आगपाखड 
18
हैदराबादहून चेन्नईला जाणाऱ्या चारमीनार एक्स्प्रेसला लागली आग, प्रवाशांनी धावत्या ट्रेनमधून मारल्या उड्या   
19
बैठे काम सिगारेट ओढण्याइतकेच घातक; दुर्लक्ष केल्यास आरोग्याचा निघणार ‘धूर’, कशी घ्याल काळजी? 
20
डोनाल्ड ट्रम्प यांच्यासमोरच अंदाधुंद गोळीबार; अमेरिकेत खळबळ, सुरक्षा जवानांनी संशयिताला पकडलं
Daily Top 2Weekly Top 5

बिबटय़ाच्या हल्ल्यात नऊ मेंढय़ा ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 1, 2019 13:05 IST

लोकमत न्यूज नेटवर्क म्हसावद : शहादा तालुक्यातील म्हसावद गावाजवळ बिबटय़ाने हल्ला करून शनिवारी रात्री नऊ मेंढय़ांना ठार केल्याची घटना ...

लोकमत न्यूज नेटवर्कम्हसावद : शहादा तालुक्यातील म्हसावद गावाजवळ बिबटय़ाने हल्ला करून शनिवारी रात्री नऊ मेंढय़ांना ठार केल्याची घटना घडली. मेंढपाळांच्या पाळीव कुत्र्यांनाही बिबटय़ाने गंभीर जखमी केले आहे. तोरणमाळ वनक्षेत्राचे वनपाल व कर्मचारी यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.याबाबत सविस्तर वृत असे की, म्हसावद गावालगतच रामदास अजरुन कोळी यांच्या मिरचीच्या शेतात शनिवारी संध्याकाळी चार मेंढपाळ  मेंढय़ा घेऊन चारणी करण्यास आले. त्यांचा मुक्काम याच शेतात होता. त्यांच्या वाडय़ावर रात्री आठ  वाजेच्या सुमारास बिबटय़ाने मेंढय़ांवर हल्ला चढवून नऊ मेंढय़ा ठार केल्या. त्यात चार मेंढय़ा मारून तेथेच राहू दिल्या तर चार मेंढय़ा शेताच्या बाजूलाच केळीच्या शेतात फरफटत नेल्या व दोन मेंढय़ा गंभीर जखमी आहेत. यात एकूण 65 ते 70 हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. यात खेमा डेमा पडलकर रा.खोक्राळे, ता.नंदुरबार यांच्या तीन, भगा पूना गोदकर रा.आसाणे, ता.नंदुरबार यांचा दोन मेंढय़ा ठार तर एक जखमी, हिमा बोदल करे रा.खोक्राळे, ता.नंदुरबार यांच्या चार मेंढय़ा ठार तर एक              मेंढी जखमी झाली. रात्री आठ वाजेपासून ते दोन वाजेर्पयत बिबटय़ाचा थरार सुरुच होता. मेंढपाळांजवळ संरक्षणासाठी कुत्रे होते मात्र त्यांचाही टिकाव लागला नाही. कुत्र्यांनाही बिबटय़ाने गंभीर जखमी केले आहे. तोरणमाळ-राणीपूर वनविभागाचे वनक्षेत्रपाल सुनील खुणे, वनपाल पी.आर. निळे यांनी पंचनामा केला. ए.जी. पावरा, के.के. पावरा, कांतीलाल वळवी, सुकलाल पावरा यांनी सहकार्य केले. तिन्ही मेंढपाळ कुटुंबातील लोकांनी नुकसान भरपाई मिळावी, अशी मागणी केली आहे.दरम्यान, वनक्षेत्रपाल सुनील खुणे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सदर हल्ला हा बिबटय़ाचा नसून संदिाग्धता आहे. कारण कोठेही बिबटय़ांचे पगमार्क आढळून आले नाहीत. मेंढय़ांच्या पायाची हाडेही मोडलेली होती. शेतकरी, मेंढपाळ कोणाचीच भेट झाली नसल्याचे त्यांनी सांगितले. तर शेतक:याची भेट घेतली असता सकाळी खाटीक आल्याने त्यांनी पाय मोडल्याचे सांगितले. प्रत्येक मेंढीच्या मानेजवळ चावा घेतल्याच्या मोठय़ा जखमा आढळून आल्याचे सांगितले.