शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपाचे उमेदवार शुभेंदू सरकार यांना पळवून पळवून मारहाण; पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात कुठे काय घडले... 
2
Top Marathi News LIVE Updates: "चर्चेचे स्वागतच, पण धमक्या..." इराणच्या राष्ट्राध्यक्षांनी डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर फोडलं खापर
3
Petrol-Diesel Price Hike: पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीच्या चर्चांना पूर्णविराम; केंद्र सरकारचा मोठा खुलासा
4
२०२६ मध्ये उन्हाचा कहर! AC-कूलरही होतील फेल? बाबा वेंगा यांची धडकी भरवणारी भविष्यवाणी
5
आता खासगी शाळांमध्येही फक्त NCERT पुस्तके, महागड्या पुस्तकावर बंदी; NHRC ने राज्यांना दिला ३० दिवसांचा वेळ
6
IPL 2026: MI vs CSK मॅचआधी चेन्नईला मोठा धक्का; खेळाडूच्या आईचे निधन, सामन्याला मुकणार!
7
मुंबईतून दुपारी सुटणाऱ्या ‘वंदे भारत’ ट्रेनचे टाइमटेबल बदलले, नवीन वेळ काय? कधी होणार लागू?
8
Trinamool Congress vs BJP: तृणमूल अन् भाजप यांच्यात थेट लढत; ‘तिसरी आघाडी’मुळे कोणाचा स्वप्नभंग
9
“ते इथे येतात, मुले जन्माला घालतात अन्...”; ट्रम्प यांच्याकडून भारताची थेट नरकाशी तुलना?
10
NATOबाबत अमेरिकेची मोठी चाल! इराण युद्धात मदत केली नाही; गंभीर परिणाम भोगावे लागणार, यादी तयार
11
तामिळनाडूमध्ये ५.७३ कोटी मतदार ठरवणार ४,०२३ उमेदवारांचे भवितव्य, 'या' जागांवर सर्वांची नजर
12
PM Internship Scheme 2026: आता १८ ते २५ वर्षांच्या तरुणांना मिळणार ₹९००० चं स्टायपेंड; नियमांमध्ये झाला मोठा बदल
13
वरातीदरम्यान, कुत्र्याचा धुमाकूळ, ६० जणांचा घेतला चावा, वाचण्यासाठी वऱ्हाड्यांची पळापळ  
14
ताडगोळ्यांना इंग्रजीत काय म्हणतात माहीत आहे का? हे पाणीदार फळ कुणी खावं, कुणी टाळावं?
15
IPL 2026: 'ती' गोष्ट केल्याशिवाय वैभव सूर्यवंशी मैदानात उतरत नाही; खुद्द त्यानेच केला खुलासा
16
पैसा, प्लॉट, घर गेले, मातृछत्रही हरवले, ‘त्या’ शहीदपुत्राची हृदयद्रावक कहाणी! नोकरीसाठी २ कोटींची फसवणूक
17
"TCS मध्ये नेटचा पासवर्ड अश्लील भाषेत, धार्मिक भावना दुखावल्या"; पीडितेने सांगितली आपबिती
18
Vastu Tips: झोपताना उशीखाली ठेवा 'या' घरगुती वस्तू; नशीब पालटायला वेळ लागणार नाही!
19
US Israel Iran War : जगावर महागाईचं संकट! होर्मुझमधील सुरुंग काढायला लागणार सहा महिने; पेंटागॉनने वर्तवली भीती
20
रिपोर्ट! कामाचा दबाव, नोकरी जाण्याची भीती; 'टॉक्सिक वर्क कल्चर'मुळे दरवर्षी ८ लाखाहून अधिक मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

नवीन अधिका:यांनी लिलया पेलले निवडणुकीचे शिवधनुष्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 23, 2019 12:53 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : जिल्ह्यातील दोन्ही प्रमुख अधिकारी नवीन असतांना आणि विशेष म्हणजे चारही निवडणूक निर्णय अधिकारी महिनाभरापूर्वीच ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : जिल्ह्यातील दोन्ही प्रमुख अधिकारी नवीन असतांना आणि विशेष म्हणजे चारही निवडणूक निर्णय अधिकारी महिनाभरापूर्वीच बदलून आलेले असतांना देखील निवडणूक मुक्त वातावरणात पार पडल्याने सर्वानीच सुटकेचा नि:श्वास टाकला.जिल्ह्यातील चारही विधानसभा मतदारसंघात सोमवारी शांततेत आणि सुरळीतपणे मतदान झाले. मतदानादरम्यान कुठेही कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला नाही. कुठेही निवडणुकीत विस्कळीतपणा आल्याचे दिसून आले नाही. जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारूड आणि कायदा व सुव्यवस्थेची जबाबदारी असलेले पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित हे निवडणुकीच्या दोन महिन्याआधीच बदलून आल्याने त्यांच्यावर मोठी जबाबदारी येवून ठेपली होती. परंतु आपल्या प्रशासकीय कामाच्या अनुभवावरून त्यांनी निवडणूक प्रक्रिया सुरळीतपणे हाताळली.  याशिवाय मतदानाची टक्केवारी वाढावी यासाठी देखील जिल्हाधिकारी यांनी मोठी मेहनत घेतली. लोकसभा निवडणुकीत नंदुरबार जिल्हा सर्वाधिक मतदानाबाबत राज्यात दुस:या क्रमांकावर होता. विधानसभा निवडणुकीत प्रथम क्रमांकावर यावा यासाठी धडपड होती. राजकीय आणि इतर चित्र   पहाता 50 टक्केही मतदान होते की नाही अशी स्थिती असतांना तब्बल 66.37 टक्केर्पयत मतदान    नेण्यार्पयत यश आले. लोकसभा निवडणुकीत जिल्ह्यातील चारही मतदारसंघात एकुण 70.35 टक्के मतदान झाले होते. आता 66.37 टक्के झाले. निवडणूक निर्णय अधिकारीजिल्ह्यातील चारही निवडणूक निर्णय अधिकारी हे नव्याने जिल्ह्यात आलेले आहेत. नंदुरबारच्या निवडणूक निर्णय अधिकारी स्वाती थवील या यापूर्वी नंदुरबारात उपजिल्हा निवडणूक अधिकारी होत्या. त्यांनी त्यांच्या त्या अनुभवाच्या जोरावर नंदुरबार विधानसभा मतदारसंघाची जबाबदारी पार पाडली.नवापूरचे निवडणूक निर्णय अधिकारी महेश शेलार यापूर्वी नंदुरबार तहसीलदार होते. शिवाय नवापूर येथे पर्यावेक्षाधिन तहसीलदार देखील होते. त्या अनुभवाच्या जोरावर त्यांनी नवापूरची निवडणूक पार पाडली. शहाद्याचे निवडणूक निर्णय अधिकारी डॉ.चेतन गिरासे हे मात्र, जिल्ह्यासाठी नवीनच होते. तरीही त्यांनी स्थानिक अधिका:यांच्या मदतीने शहाद्याची निवडणूक पार पाडली. अक्कलकुवाचे निवडणूक    निर्णय अधिकारी राहुल पाटील   यापूर्वी नंदुरबारात तहसीलदार होते. त्यांनी देखील जिल्ह्यातील      कामाच्या अनुभवाच्या जोरावर अक्कलकुवाची निवडणूक पार पाडली.