शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय परराष्ट्र मंत्रालयाचं नेपाळला रोखठोक उत्तर, लिपुलेखमार्गे मानसरोवर यात्रेला केला होता विरोध
2
Mansarovar Yatra: "लिपुलेख आमचाच!" भारताच्या मानसरोवर यात्रेला नेपाळचा विरोध; चीनवरही निशाणा
3
चार राज्यांच्या निवडणूका: फलोदीसह अमेरिकन पॉलिमार्केटमध्येही सट्ट्याची धूम; बंगालवर सर्वाधिक सट्टा, भाजपा-तृणमूलमध्ये 'कांटे की टक्कर'
4
CSK ला मोठा धक्का! पदार्पणात चमकलेल्या ऑलराउंडरचा पाय फ्रॅक्चर; तो उर्वरित स्पर्धेतून बाहेर
5
निकालापूर्वी बंगालमध्ये दहशत पसरवण्याचा प्रयत्न! भाजप नेत्याच्या घरावर गोळीबार, दोघांना अटक
6
वॉशिंग्टनची 'सुंदर' खेळी! अखेरच्या षटकात षटकार मारत संपवली मॅच; GT ने टेबल टॉपर PBKS ला दिला पराभवाचा धक्का
7
रेल्वे प्रवासात तुमची लूट तर होत नाहीये? जाणून घ्या, खाण्यापिण्याचे दर; बघा IRCTC चं अधिकृत रेट कार्ड
8
कोल्हापूर जिल्ह्यात नीट परीक्षेत गोंधळ, विद्यार्थ्यांचे नुकसान झाल्याची पालकांची तक्रार; नेमकं काय घडलं?
9
​परतवाड्याचा लाकूड बाजार आगीच्या भक्ष्यस्थानी; आकाशाला भिडल्या ज्वाळा, कोट्यवधींचे नुकसान!
10
"रडण्याची वेळ आली आहे...!" बंगाल निकालापूर्वीच मौलाना जर्जिश अंसारी यांच प्रक्षोभक विधान; योगींना म्हणाले 'शेर'!
11
GT vs PBKS: अर्धा संघ ४७ धावांत गारद! पंजाबसाठी मुंबईकर सूर्यांश शेडगेनं शड्डू ठोकला; २४ चेंडूत पहिली IPL फिफ्टी
12
'भाजपाचा झेंडा असलेल्या कार ईव्हीएम स्ट्राँग रुमजवळ कशा?', ममता बॅनर्जींच्या मतदारसंघात खळबळ
13
GT कडून बॉक्सरच्या लेकाला IPL पदार्पणाची संधी; CSK च्या ताफ्यातून बाकावर बसून ठरलेला IPL चॅम्पियन!
14
मिसिंग लिंकवर सेल्फी, फोटो काढाल, तर महागात पडेल; सीसीटीव्हीची नजर, MSRDCने दिला इशारा
15
एकाच गर्भातून जन्माला आल्या जुळ्या बहिणी, पण वडील मात्र वेगवेगळे! DNA चाचणीतून ४९ वर्षांपूर्वीचं गुपित झालं उघड अन्...
16
मुंबईकर रहाणे-रघुवंशी जोडीचा हिट शो, रिंकूचा फिनिशिंग टच! SRH ला मात देत KKR ची विजयी हॅटट्रिक
17
अल्पवयीन मुलीवर पित्याकडूनच अत्याचार, मुलगी गर्भवती; वडिलांस अटक
18
लॅपटॉप वापरताना 'ही' एक छोटी चूक ठरू शकते मोठा धोका! आताच सुधारली नाही, तर होईल भारी नुकसान
19
"माझा सत्तेत बसलेल्यांना थेट सवाल आहे, तुमचं...", अमित ठाकरे नसरापूर प्रकरणावरून सरकारवर संतापले
20
लैंगिक शोषण प्रकरण: विनेश फोगाटचा मोठा खुलासा; "मीही त्या ६ पीडित महिला कुस्तीपटूंपैकी एक"
Daily Top 2Weekly Top 5

कोरीट फाट्याजवळ फलकाची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2021 04:30 IST

आवक घटली नंदुरबार : बाजार समितीत भाजीपाला आवक दिवसेंदिवस घटत आहे. ग्रामीण भागात भाजीपाला लागवडीचा हंगाम अद्याप सुरु झालेला ...

आवक घटली

नंदुरबार : बाजार समितीत भाजीपाला आवक दिवसेंदिवस घटत आहे. ग्रामीण भागात भाजीपाला लागवडीचा हंगाम अद्याप सुरु झालेला नाही. यापूर्वी लागवड केलेला भाजीपाला संपुष्टात आला आहे. यामुळे बाजारातील आवकवर परिणाम झाला आहे. बाजारात सध्या उन्हाळी भाज्यांची आवक होत आहे.

कोरोना संसर्गाच्या भीतीने गर्दी झाली कमी

धडगाव : सातपुड्याच्या दुर्गम भागातील धडगाव तालुक्यात कोरोना रुग्णांची संख्या अद्याप नियंत्रणात आहे. प्रशासनाकडूनही योग्य त्या उपाययोजना सुरु आहेत. दरम्यान, जिल्हाधिकारी यांच्या आदेशाने रात्रीची संचारबंदी सुरु केली आहे. यामुळे धडगाव शहरातील गर्दीवर परिणाम झाला असून, दुपारी दोन वाजल्यापासून बाजारपेठेत शुकशुकाट होत असल्याचे दिसून आले आहे.

आकडीमुक्त वीज वाहिन्यांमुळे समाधान

बोरद : तळोदा तालुक्यातील विविध भागात आकडीमुक्त वीज वाहिन्या करण्यासाठी कंपनीकडून बंच केबल टाकण्यात येत आहे. यामुळे गावे आकडीमुक्त होत आहेत. यातून चांगल्या दाबाने वीज मिळत असल्याने समाधान व्यक्त करण्यात येत आहे.

घरकुल लाभार्थींना हप्त्यांची प्रतीक्षा

नंदुरबार : जिल्ह्यातील सर्व सहा पंचायत समित्यांच्या कार्यालयांतर्गत वाटप करण्यात आलेल्या प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत लाभार्थींना घरकुल मंजूर करण्यात आले आहेत. यातील काहींनी दुसरा, तर निम्म्यापेक्षा अधिक जणांना शेवटचा हप्ता मिळालेला नाही.

ग्रामपंचायतींच्या जोडण्यांवर संक्रांत

नंदुरबार : वीजबिल थकवणाऱ्या ग्राहकांवर महावितरण कंपनीकडून सध्या कारवाई करण्यात येत आहे. यात जिल्ह्यातील काही ग्रामपंचायतींचाही समावेश असून, त्यांच्या पाणी योजनांचे कनेक्शन कट करण्याची कारवाई होणार आहे. काही ठिकाणी कार्यवाही पूर्ण झाली असून, यामुळे त्या-त्या गावांमध्ये कृत्रिम पाणीटंचाई निर्माण झाल्याची माहिती देण्यात येत आहे. जिल्हा परिषदेने याकडे लक्ष देण्याची मागणी होत आहे.

बँकांचे कामकाज सुरु

तळोदा : दोन दिवस संपावर असलेले बँक कर्मचारी बुधवारी बँकांमध्ये परत आले. यानंतर सुरु झालेल्या कामकाजामुळे बँक ग्राहकांना दिलासा मिळाला आहे. बुधवारी शहरातील सर्वच बँकांमध्ये नागरिकांची पैसे भरणा व काढण्यासाठी गर्दी झाल्याचे चित्र दिसून येत होते.

नागरिक त्रस्त

नंदुरबार : तालुक्याच्या विविध भागात मोकाट श्वानांचा संचार त्रासदायक ठरत आहे. तालुक्यातील मोठ्या व छोट्या गावांसह शहरालगतच्या गावांमध्ये मोकाट श्वान वाढीस लागले आहेत. या श्वानांचा लहान मुलांना सर्वाधिक धोका असून, ग्रामपंचायत विभागाने याकडे लक्ष देण्याची गरज आहे.