शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
2
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
3
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
4
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
5
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
6
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
7
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
8
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
9
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
10
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
11
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
12
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
13
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
14
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
15
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
16
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
17
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
18
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
19
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
20
"उंदीर-झुरळांसोबत राहावं लागलं, गंभीर आजार झाला"; सोनाली राऊतचे 'बिग बॉस मराठी'च्या टीमवर गंभीर आरोप; म्हणाली...
Daily Top 2Weekly Top 5

बिबट्याला जेरबंद करण्यासाठी ठोस उपाययोजनांची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2021 04:20 IST

बिबट्यांनी तळोदा तालुक्यातील शेतशिवारात ठाण मांडले असून, पारंपरिक शिकार मिळत नसल्याने पाळीव प्राण्यांपाठोपाठ त्यांनी माणसांवरही हल्ले सुरू केले असल्याने ...

बिबट्यांनी तळोदा तालुक्यातील शेतशिवारात ठाण मांडले असून, पारंपरिक शिकार मिळत नसल्याने पाळीव प्राण्यांपाठोपाठ त्यांनी माणसांवरही हल्ले सुरू केले असल्याने शेतमजुरांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. गेल्या चार ते पाच वर्षांपासून बिबट्यांनी पाळीव प्राण्यांवर अनेकवेळा हल्ले केल्याने मोठी दहशत माजली आहे.

सहसा दाट झाडीझुडपात लपूनछपून जीवन जगणारा बिबट्या अत्यंत ‘छलिया शिकारी’ समजला जातो. मिळेल त्या परिस्थितीत मिळेल ती शिकार करण्याचे कसब अंगी भिनलेले बिबटे जंगले नष्ट झाल्याने मोठ्या प्रमाणत विस्‍थापित होत आहेत. पोटाची भूक शमविण्यासाठी पारंपरिक शिकार मिळत नसल्याने ते साहजिकच मानवी वस्त्यांकडे आकर्षिले जात आहेत. मानवी वस्त्यांच्या सीमेवर येऊन मिळेल त्या भक्ष्याची शिकार करताना त्यांचा जगण्यासाठीचा संघर्ष आता आणखी कठीण होत चालल्याची लक्षणे दिसू लागली आहेत.

तालुक्यात सायंकाळी अंधार गडद होऊ लागताच बिबट्यांचा मुक्त संचार सुरू होतो. हल्ल्याच्या भीतीने रहिवाशांना एकट्याने घराबाहेर पडणे कठीण झाले आहे. वस्त्यांवरील पाळीव कुत्री, बकऱ्या, कोंबड्या, गायी, म्हशींची सहज शिकार मिळत असल्याने बिबटे आता मानवी वस्त्यांकडे आकर्षिले जात आहेत. त्यामुळे या भागात बिबट्यांची संख्या नेमकी किती असाही प्रश्न उपस्थित केला जात आहे. पाणी व भक्ष्याच्या शोधात बिबटे मानवी वस्त्यांकडे आकर्षिले जात असून, मनुष्य जीवितालाही धोका निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे वनविभागाने लवकरात लवकर बिबट्या पकडण्यासाठी उपाययोजना कराव्यात, अशी आशा व्यक्त करण्यात येत आहे.

वसाहतीतील लोकांनी घ्यायची काळजी

शेतकऱ्यांनी पाळीव जनावरे शक्यतो बंदिस्त गोठ्यात बांधावीत.

शेतात एकट्याने जाण्याची वेळ येईल त्यावेळी ध्वनिनाद निर्माण करीत जावे.

बिबट्या शक्यतो उभ्या व्यक्तीवर हल्ला करीत नाही. तो खाली बसलेली, वाकलेली व्यक्ती म्हणजेच त्याच्या नजरेच्या टप्प्यातील आकृती यास तो सावज समजून हल्ला करू शकतो. त्यामुळे अशा परिस्थितीत वाकणे, खाली बसणे टाळा.

वनविभागाकडून अपेक्षा

ठिकठिकाणी पिंजऱ्यांची संख्या वाढवावी.

बिबट्या नरभक्षकाच्या व्याख्येत बसत असेल तर त्याला पकडण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणे.

उपद्रव असलेल्या गावांमध्ये नागरिकांना खबरदारीच्या उपाययोजनांसंदर्भात जागरूक करणे. तसेच परिसरात कायमस्वरूपी वन कर्मचाऱ्यांची नियुक्ती करणे.

गेल्या दोन दिवसांपूर्वी बिबट्याने हातोडा शिवारात बोकड फस्त केल्याची घटना घडली होती. त्यामुळे शेतमजूर शेतशिवारात यायला घाबरत आहेत. दरम्यान, परिसरातील अनेक शेतकऱ्यांची कापूस पेरणी करायचा बाकी आहे आधीच पाऊस कमी पडल्यामुळे दुसऱ्यांदा पेरणी करावी लागत आहे. बिबट्यांचा दहशतीमुळे शेत शिवारात काम करण्यासाठी मजूर येणार नाहीत तर उपाशी मरायची वेळ येईल. - अभिजित कलाल, शेतकरी, तळोदा.