शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय परराष्ट्र मंत्रालयाचं नेपाळला रोखठोक उत्तर, लिपुलेखमार्गे मानसरोवर यात्रेला केला होता विरोध
2
Mansarovar Yatra: "लिपुलेख आमचाच!" भारताच्या मानसरोवर यात्रेला नेपाळचा विरोध; चीनवरही निशाणा
3
चार राज्यांच्या निवडणूका: फलोदीसह अमेरिकन पॉलिमार्केटमध्येही सट्ट्याची धूम; बंगालवर सर्वाधिक सट्टा, भाजपा-तृणमूलमध्ये 'कांटे की टक्कर'
4
CSK ला मोठा धक्का! पदार्पणात चमकलेल्या ऑलराउंडरचा पाय फ्रॅक्चर; तो उर्वरित स्पर्धेतून बाहेर
5
निकालापूर्वी बंगालमध्ये दहशत पसरवण्याचा प्रयत्न! भाजप नेत्याच्या घरावर गोळीबार, दोघांना अटक
6
वॉशिंग्टनची 'सुंदर' खेळी! अखेरच्या षटकात षटकार मारत संपवली मॅच; GT ने टेबल टॉपर PBKS ला दिला पराभवाचा धक्का
7
रेल्वे प्रवासात तुमची लूट तर होत नाहीये? जाणून घ्या, खाण्यापिण्याचे दर; बघा IRCTC चं अधिकृत रेट कार्ड
8
कोल्हापूर जिल्ह्यात नीट परीक्षेत गोंधळ, विद्यार्थ्यांचे नुकसान झाल्याची पालकांची तक्रार; नेमकं काय घडलं?
9
​परतवाड्याचा लाकूड बाजार आगीच्या भक्ष्यस्थानी; आकाशाला भिडल्या ज्वाळा, कोट्यवधींचे नुकसान!
10
"रडण्याची वेळ आली आहे...!" बंगाल निकालापूर्वीच मौलाना जर्जिश अंसारी यांच प्रक्षोभक विधान; योगींना म्हणाले 'शेर'!
11
GT vs PBKS: अर्धा संघ ४७ धावांत गारद! पंजाबसाठी मुंबईकर सूर्यांश शेडगेनं शड्डू ठोकला; २४ चेंडूत पहिली IPL फिफ्टी
12
'भाजपाचा झेंडा असलेल्या कार ईव्हीएम स्ट्राँग रुमजवळ कशा?', ममता बॅनर्जींच्या मतदारसंघात खळबळ
13
GT कडून बॉक्सरच्या लेकाला IPL पदार्पणाची संधी; CSK च्या ताफ्यातून बाकावर बसून ठरलेला IPL चॅम्पियन!
14
मिसिंग लिंकवर सेल्फी, फोटो काढाल, तर महागात पडेल; सीसीटीव्हीची नजर, MSRDCने दिला इशारा
15
एकाच गर्भातून जन्माला आल्या जुळ्या बहिणी, पण वडील मात्र वेगवेगळे! DNA चाचणीतून ४९ वर्षांपूर्वीचं गुपित झालं उघड अन्...
16
मुंबईकर रहाणे-रघुवंशी जोडीचा हिट शो, रिंकूचा फिनिशिंग टच! SRH ला मात देत KKR ची विजयी हॅटट्रिक
17
अल्पवयीन मुलीवर पित्याकडूनच अत्याचार, मुलगी गर्भवती; वडिलांस अटक
18
लॅपटॉप वापरताना 'ही' एक छोटी चूक ठरू शकते मोठा धोका! आताच सुधारली नाही, तर होईल भारी नुकसान
19
"माझा सत्तेत बसलेल्यांना थेट सवाल आहे, तुमचं...", अमित ठाकरे नसरापूर प्रकरणावरून सरकारवर संतापले
20
लैंगिक शोषण प्रकरण: विनेश फोगाटचा मोठा खुलासा; "मीही त्या ६ पीडित महिला कुस्तीपटूंपैकी एक"
Daily Top 2Weekly Top 5

अवैध नळ कनेक्शनधारकांवर ठोस कारवाईची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2021 04:28 IST

पूर्वी राज्य शासनाच्या जीवन प्राधिकरण मंडळाकडे तळोदा शहराचा पाणीपुरवठा करण्यात येत होता. त्यावेळेस जीवन प्राधिकरणची पाणीपट्टी प्रचंड होती. साहजिकच ...

पूर्वी राज्य शासनाच्या जीवन प्राधिकरण मंडळाकडे तळोदा शहराचा पाणीपुरवठा करण्यात येत होता. त्यावेळेस जीवन प्राधिकरणची पाणीपट्टी प्रचंड होती. साहजिकच नगरपालिकेने शहराची पाणीपुरवठा योजना आपल्याकडे घ्यावी, अशी नागरिकांनी मागणी लावून धरली होती. यासाठी सामाजिक संघटनांनी मोठ्या प्रमाणात तीव्र आंदोलने केली होती. परिणामी पालिकेलादेखील आपला ताठरपणा सोडून द्यावा लागला. त्यानंतर २००३ मध्ये पालिकेने शहराची पाणीपुरवठा योजना आपल्याकडे हस्तांतरित केली. ती योजना होती, त्याच परिस्थितीत जीवन प्राधिकरणकडून घेतली होती. तेव्हापासून तर आजतागायत शहराची पाणीपुरवठा योजना चर्चेत राहिली आहे. आताही पालिकेकडे येथील वीज वितरण कंपनीचे साधारणत साडेचौरेचाळीस लाखांपेक्षा अधिक रकमेची थकबाकी वीजबिलापोटी वाढली आहे. एवढी प्रचंड रक्कम वाढल्यामुळे पालिकेच्या पाणीपुरवठा करणाऱ्या कूपनलिकांचे वीजपुरवठा खंडित करावा लागला. परिणामी, तळोदा शहरवासियांना गेल्या सहा-सात दिवसांपासून कृत्रिम पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. शहराच्या पाणीपुरवठ्यासाठी पालिकेने वेगवेगळ्या भागात ३२ ठिकाणी कूपनलिका केल्या आहेत. त्याद्वारे शहरवासियांना दिवसाआड पाणीपुरवठा केला जातो. या पाणीपुरवठ्याच्या वीज बिलापोटी पालिका दरमहा १२ लाख रुपये वीज वितरण कंपनीकडे भरत असते. म्हणजे, वर्षाकाठी पालिका तब्बल दीड कोटी रुपये शहराच्या पाणीपुरवठ्यावर खर्च करते. मात्र, वर्षभराची पाणीपट्टी केवळ सात ते आठ लाखच जमा होते. म्हणजे, एका महिन्याची पाणीपट्टीही जमा होत नाही. तरीही पालिका शहरवासियांच्या सुविधेसाठी मोठी आर्थिक झळ सोसत आहे. वास्तविक पालिकेची पाणीपट्टी वर्षाला केवळ ७४० रुपये आहे. तीही वेळेवर भरण्याबाबत नळधारक का-कू करतात. म्हणूनच, पाणीपट्टीची थकबाकी ५४ लाखांवर गेली आहे. तसे अवैध नळ कनेक्शनची संख्याही अधिकृत जोडणीधारकांपेक्षा तीन ते साडेतीन पटीपेक्षा अधिक आहे. पालिकेकडून मिळालेल्या माहितीनुसार शहरात सहा हजार मालमत्ता आहेत. परंतु, अधिकृत जोडण्या फक्त एक हजार ७०० आहेत. एवढ्या मोठ्या संख्येने अनधिकृत जोडण्यांचा भार त्यांच्यावर पडत आहे. यामुळे प्रामाणिकपणे बिल भरणाऱ्या जोडणीधारकांवर दुजाभावाची भावना निर्माण झाली आहे. पाणीपट्टी थकल्याचे हेही कारण सांगितले जाते. अनधिकृत जोडण्यांबाबत तत्कालीन पालिका प्रशासनही जबाबदार आहे. कारण, याप्रकरणी कोणीच गांभीर्याने लक्ष घातले नाही. पालिकेच्या लोकप्रतिनिधींनीही दखल घेतली नाही. याउलट काही लोकप्रतिनिधींनी मतांच्या राजकारणासाठी खासगी केलेल्या कूपनलिका पालिकेच्या माथी मारून आपला खर्च काढून घेतला होता. अशाच कूपनलिकांवर मोठ्या प्रमाणात अवैध कनेक्शन असल्याचे म्हटले जाते. एकीकडे पालिकेमार्फत वर्षाची माफक दरात पाणीपट्टी आहे. तर दुसरीकडे नवीन वसाहतींमधील रहिवासी खासगी कूपनलिका मालकाला दरमहा तब्बल ४०० रुपये मोजत आहेत. असेही विदारक चित्र पाण्याच्या बाबतीत आहे. एकूणच शहरातील अवैध नळ कनेक्शनप्रकरणी पालिका प्रशासन अन् लोकप्रतिनिधींनी मतांच्या राजकारणाबरोबरच आपले हितसंबंध बाजूला ठेवून पालिकेच्या उत्पन्नात भर घालण्यासाठी कायदेशीर मोहीम हाती घ्यावी, अशी अपेक्षा आहे.