शहरं
Join us  
Trending Stories
1
पेट्रोल ११९.८५ रुपये तर डिझेल १२३ रुपयांवर! तेल कंपन्या पुन्हा वाढवणार भाव? जाणून घ्या महाराष्ट्रातील दर
2
समृद्धी महामार्गावर निष्काळजीपणाचा कहर! बस अपघातात चिमुकलीचा मृत्यू, २५ प्रवासी जखमी
3
"माझ्यामध्ये दैवीशक्ती आहे, कॅन्सरसारखे आजारही बरे करतो", संगमनेरमधील भोंदूबाबा गजाआड
4
PM मोदींचे भाषण अन् कारमधला फोटो... 'युवा आमदार' मैथिली ठाकूर होतेय ट्रोल, कारण...
5
१२ कोचची नॉन-AC ट्रेन, आजपर्यंत मिळाल्या नाहीत अशा १० सेवा मिळणार; प्रवाशांना मोठा फायदा!
6
Shreyas Iyer: "मिशन चॅम्पियनसाठी पाय जमिनीवर असू द्या", श्रेयस अय्यर पंजाबच्या खेळाडूंना असं का म्हणाला?
7
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन म्हणजे विरोधकांना मोठी चपराक”: DCM एकनाथ शिंदे
8
"ज्या भाजपने महाराष्ट्रात..."; 'महिला आरक्षण'वरून अंजली दमानिया यांची फडणवीसांवर बोचरी टीका
9
रणवीर-दीपिका पुन्हा आईबाबा होणार! क्युट फोटो पोस्ट करत शेअर केली गुडन्यूज
10
२ भारतीय जहाजांवर होर्मुझमध्ये गोळीबार, इराणची मोठी प्रतिक्रिया; अधिकारी म्हणाले, “लवकरच...”
11
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना सुखाचा काळ, व्यापारी करारातून लाभ; नोकरीत पगारवाढ, इगो टाळा!
12
Chris Gayle: "माझ्यावर प्रचंड कर्ज, माझ्यासाठी IPL खेळणं गरजेचं" ऑक्शननंतर ख्रिस गेलनं कुणाला केला फोन?
13
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन हे काँग्रेसचा जप, खोटारडेपणाचा गजर”: हर्षवर्धन सपकाळ
14
तब्बूने मुंबईतील वर्सोवामध्ये घेतला आलिशान फ्लॅट, मोजले तब्बल 'इतके' कोटी
15
Video: Jasprit Bumrah फॅन्ससोबत काढत होता सेल्फी, बाजूने Hardik Pandya आला अन् म्हणाला...
16
आजचे राशीभविष्य, १९ एप्रिल २०२६: शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, आर्थिक बाबीत सावध राहा!
17
‘धर्मांतरासारखे प्रकार खपवून घेऊ नका’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना कडक निर्देश
18
Air Travel Rules: ...तर ‘त्या’ प्रवाशांना विमानात ‘नो एन्ट्री’, नव्या नियमांचा मसुदा तयार!
19
'धुरंधर'चा आलम भाई ५२ व्या वर्षीही अविवाहित, कधीही लग्न न करण्याचा घेतला निर्णय; कारण...
20
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
Daily Top 2Weekly Top 5

नवापूर पोलिसांची मोठी कारवाई, तंबाखू जन्य पदार्थाचा 50 लाखाचा मुद्देमाल जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 1, 2020 19:43 IST

नवापूर, जि नंदुरबार : महाराष्ट्रात बंदी असलेला विमल तंबाखू व गुटखा वाहतुक केला जात असतांना नवापुर पोलीसांनी ट्रकसह सुमारे ...

नवापूर, जि नंदुरबार : महाराष्ट्रात बंदी असलेला विमल तंबाखू व गुटखा वाहतुक केला जात असतांना नवापुर पोलीसांनी ट्रकसह सुमारे 50 लाखाचा तंबाखू जन्य पदार्थाचा साठा आज दुपारी जप्त केला. या प्रकरणी ट्रक चालक व क्लिनरला पोलीसांनी अटक केली आहे.      येथील पोलिस निरीक्षक  विजयसिंग राजपूत यांना  एका ट्रक मधुन तंबाखू जन्य पदार्थाची वाहतुक होत असल्याची गुप्त माहिती मिळाली. गुप्त माहितीच्या आधारे नवापुर पोलीसांनी शहर हद्दीत नवापूर पिंपळनेर चौफुली जवळ सापळा लावला. प्रत्येक वाहनाची तपासणी करण्यात आली. त्यात एक ट्रक (क्र MH 31GB 8837) ची तपासणी केली असता महाराष्ट्रात बंदी असलेला विमल गुटखा व तंबाखू आढळून आला. जीवनावश्यक वस्तूच्या वाहतुकीच्या नावा खाली महाराष्ट्रात बंदी असलेला विमल तंबाखू व गुटखा तांदुळाच्या चुरीच्या गोण्यांच्या आड लपवलेला आढळून आला. ट्रक आणि तंबाखुजन्य पदार्थ असा एकूण 50 लाख रुपये किमतीचा साठा पोलीसांनी जप्त केला आहे. ही कारवाई पोलीस अधिक्षक महेंद्र पंडीत, अप्पर पोलीस अधिक्षक चंद्रकात गवळी, उपविभागीय पोलीस अधिकारी रमेश पवार यांच्या मार्गदर्शनाखाली नवापूरचे पोलीस निरीक्षक विजययसिंग राजपूत, सहाय्यक पोलीस निरीक्षक दिगम्बर शिंपी, धीरज महाजन, पो काॅ प्रविण मोरे, दिनेश बाविस्कर,जयेश बाविस्कर, योगेश साळवे, निशान गिते, आदिनाथ गोसावी, कृष्णा पवार, गुमान पाडवी, शाम पेढारे, हेमंत सैंदाणे व सहकार्यांनी केली. पोलीसांनी केलेल्या कारवाईतुन पुन्हा गुटखा तस्करीचे मोठे रॅकेट सक्रिय असल्याची बाब उघड झाली आहे. गत आठवड्यात गुजरात पोलीसांनी आयशर टेम्पो आणि पिकअप मधुन होत असलेली तस्करी उघड केली होती. या प्रकरणी महाराष्ट्र जीवनावश्यक कायदा 2005 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून ट्रक चालक आणि क्लिनरला ला अटक करण्यात आली आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक धीरज महाजन व सहकारी करीत आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी