शहादा महाविद्यालयात राष्ट्रीय स्तरावरील परिषद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2021 04:32 IST2021-02-16T04:32:36+5:302021-02-16T04:32:36+5:30

परिषदेचे उद्‌घाटन प्रमुख वक्ते व साक्री येथील सि. गो. पाटील महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर. आर. अहिरे यांच्या हस्ते उद्घाटन ...

National level conference at Shahada College | शहादा महाविद्यालयात राष्ट्रीय स्तरावरील परिषद

शहादा महाविद्यालयात राष्ट्रीय स्तरावरील परिषद

परिषदेचे उद्‌घाटन प्रमुख वक्ते व साक्री येथील सि. गो. पाटील महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर. आर. अहिरे यांच्या हस्ते उद्घाटन झाले. अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर. एस. पाटील हे होते. या ई-परिषदेचे थेट प्रक्षेपण ऑनलाईन करण्यात आले. या परिषदेचा विषय ‘द न्यू इरा इन ज्योग्राफी : जिओइन्फोमेटीक्स’ हा होता. या परिषदेस देश-विदेशांतील सुमारे ४०० पेक्षा अधिक व्यक्तींनी सहभाग नोंदविला. परिषदेस साधन व्यक्ती म्हणून डॉ. प्रकाश कोन्का (बीड), डॉ. अविनाश तनमले (नागपूर), डॉ. मंजुनाथ मानकरी (लातूर) यांनी विविध विषयांवर मार्गदर्शन केले. परिषदेत प्रश्नोत्तरे झाली व प्रातिनिधिक स्वरूपात सहभागींमधून प्रा. विशाल भोसले यांनी मनोगत व्यक्त केले. डॉ. यु. व्ही. निळे, प्रा. मीना पटेल, सुरेंद्र वळवी, संजय विसावे, आदी उपस्थित होते. प्रास्ताविक परिषदेचे संयोजक व भूगोल विभागप्रमुख डॉ. जी. एस. खंडागळे व आय.क्यू.ए.सी. समन्वयक डॉ. एम. के. पटेल यांनी केले. परिषदेचे सचिव प्रा. राहुल पाटील यांनी सूत्रसंचालन केले, तर परिषदेचे सहसंयोजक डॉ. प्रशांत तोरवणे यांनी मानले.

Web Title: National level conference at Shahada College