नंदुरबार जिल्हा परिषदेवर अखेर काँग्रेस-शिवसेनेची सत्ता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 17, 2020 06:08 PM2020-01-17T18:08:16+5:302020-01-17T18:08:39+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : जिल्हा परिषदेवर अखेर काँग्रेस-शिवसेना यांचीच सत्ता स्थापन झाली. अध्यक्षपदी काँग्रेसच्या अ‍ॅड.सिमा पद्माकर वळवी तर ...

Nandurbar Zilla Parishad finally gives Congress-Shiv Sena power | नंदुरबार जिल्हा परिषदेवर अखेर काँग्रेस-शिवसेनेची सत्ता

नंदुरबार जिल्हा परिषदेवर अखेर काँग्रेस-शिवसेनेची सत्ता

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : जिल्हा परिषदेवर अखेर काँग्रेस-शिवसेना यांचीच सत्ता स्थापन झाली. अध्यक्षपदी काँग्रेसच्या अ‍ॅड.सिमा पद्माकर वळवी तर उपाध्यक्षपदी शिवसेनेचे अ‍ॅड.राम चंद्रकांत रघुवंशी यांची निवड झाली. अध्यक्षपदाच्या निवडीत भाजपच्या कुमुदिनी गावीत यांनीही अर्ज दाखल केला होता, परंतु ऐनवेळी भाजपच्या सर्व सदस्यांनी काँग्रेस उमेदवाराला पाठींबा दिला. परंतु उपाध्यक्षपदासाठी निवडणूक होऊन भाजप उमेदवाराला २६ तर शिवसेना उमेदवाराला ३० मते मिळाली.
जिल्हा परिषदेत कुठल्याही एका पक्षाला बहुमत मिळाले नव्हते. ५६ जागांमध्ये भाजपला २३, काँग्रेसला २३, शिवसेनेला ७ तर राष्टÑवादीला ३ जागा मिळाल्या होत्या. त्यामुळे शिवसेनेला सत्ता स्थापनेत महत्त्व प्राप्त झाले होते. दुसरीकडे भाजप-राष्टÑवादीने एकत्रीत गट स्थापन केल्याने त्यांची संख्या २६ झाली होती. शिवसेनेने अखेर काँग्रेस सोबत जाण्याचे निश्चित केल्याने काँग्रेस-सेना यांची सत्ता जिल्हा परिषदेत स्थापन झाली.
शेवटपर्यंत उत्कंठा असलेल्या अध्यक्ष, उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीत अध्यक्ष व उपाध्यक्षपदासाठी प्रत्येकी चार जणांनी अर्ज दाखल केले होते. माघारीअंती अध्यक्षपदासाठी भाजपच्या कुमुदिनी विजयकुमार गावीत व काँग्रेसच्या अ‍ॅड.सिमा पद्माकर वळवी यांचेच अर्ज तर उपाध्यक्षपदासाठी शिवसेनेचे अ‍ॅड.राम चंद्रकांत रघुवंशी तर भाजपतर्फे जयश्री दिपक पाटील यांचे अर्ज राहिले.
प्रत्यक्ष निवडीच्या वेळी भाजपच्या सर्व सदस्यांनी मतदान न घेता सिमा वळवी यांना पाठींबा असल्याचे जाहीर केल्याने त्यांना संपुर्ण ५६ मते मिळाली. उपाध्यक्षपदासाठी मात्र निवडणूक घेण्यात आली. यावेळी काँग्रेस व शिवसेना यांचे सर्वच अर्थात ३० मते अ‍ॅड.राम रघुवंनशी यांना तर भाजप-राष्टÑवादीची २६ मते जयश्री पाटील यांना मिळाल्याने अ‍ॅड.राम रघुवंशी यांना विजयी घोषीत करण्यात आले.
निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारूड व सहायक म्हणून सीईओ विनय गौडा होते.

Web Title: Nandurbar Zilla Parishad finally gives Congress-Shiv Sena power

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.