शहरं
Join us  
Trending Stories
1
राजधानी एक्स्प्रेसला लागली भीषण आग, दिल्लीहून मुंबईकडे जाणारी रेल्वे वाहतूक विस्कळीत, सुदैवाने मोठी दुर्घटना टळली  
2
महाराष्ट्रात सरकारी नोकर भरती प्रक्रियेचा कायापालट ! 'बकेट सिस्टीम'चा आधार! कालबाह्य ११०० नियमांना फाटा
3
IPL 2026च्या पॉईंट्स टेबलमध्ये खरी उलथापालथ आज होणार, पंजाबचं भवितव्य ठरणार, सोबतच...
4
सरकारी अधिकाऱ्याच्या घरावर धाड, संपत्ती पाहून तपास यंत्रणाही हादरली; एवढा पैसा आला तरी कुठून?
5
PM Modi: मोदींच्या नेदरलँड्स दौऱ्यात मोठी घोषणा, गुजरातमध्ये उभारणार अत्याधुनिक सेमीकंडक्टर प्लांट!
6
"राजा शिवाजी बघण्याआधीच बाबा गेले...", दिशा परदेशीची खंत, म्हणाली- "ते लोकांना फोन करून सांगत होते की..."
7
तुरुंगात असूनही भोंदू अशोक खरातला जॅकपॉट; सिंहस्थ रिंगरोड भूसंपादनातून ३ कोटी मिळणार
8
'दुष्काळात तेरावा' नाही, यंदा सुख-समृद्धीचा १३ वा महिना! 'ज्येष्ठ अधिकमास' सुरू; सण-उत्सव २० दिवस लांबणीवर
9
दोन देशात जीवघेण्या विषाणूचा कहर, WHO अलर्टवर, घोषित केली हेल्थ इमर्जन्सी
10
IPL 2026: कोलकाता- गुजरात सामन्याची इतिहासात नोंद; T20 मध्ये पहिल्यांदाच असं घडलं!
11
आजचे राशीभविष्य - १७ मे २०२६, नोकरी - व्यवसायातील वातावरण आपणास अनुकूल राहील
12
मौनी रॉय अन् सूरज नांबियारचं पॅचअप? घटस्फोट जाहीर केल्यानंतरही पुन्हा केलं एकमेकांना फॉलो
13
आनंदवार्ता ! मान्सून अंदमान, निकोबारमध्ये दाखल; महाराष्ट्रात कधी एन्ट्री? 
14
विकी कौशलच्या वाढदिवशी कतरिनाची भावुक अन् मजेशीर पोस्ट, छोट्या विहानचीही दिसली झलक
15
हे दशक आपत्तींचे; ...तर गरिबीच्या खाईत अडकू; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा इशारा
16
मुलीसाठी पाच लाखांत पेपर विकत घेतला? सीबीआयकडून नांदेडात पालकांची चौकशी 
17
'पॉलिटिकल स्टार्टअप'चे दिवस! कमल हासन-चिरंजीवी ठरले 'बर्न आउट', तर 'थलपती' विजय बनला लेटेस्ट 'राजकीय युनिकॉर्न'
18
प्रा. मनीषा मांढरे सीबीआयच्या जाळ्यात; पुण्यातील तिसरी अटक
19
साक्रीत दुहेरी हत्याकांड; भोंदू बाबा गजाआड, अघोरी पूजेतून वाद झाल्याने हत्या करून मृतदेह पुरले
20
‘कारकुनी चुकी’मुळेच गोंधळ; पटेल, तटकरे पदावर कायम; अजित पवार गट आता निवडणूक आयोगाला नव्याने पत्र पाठवणार
Daily Top 2Weekly Top 5

मॉडेल ग्रंथालयाचा पहिला मान नंदुरबारला मिळणार

By admin | Updated: April 15, 2017 11:04 IST

राष्ट्रीय ग्रंथालय अभियानाअंतर्गत ‘मॉडेल ग्रंथालय’ योजनेत राज्यातून नंदुरबार जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयाची निवड करण्यात आली असून त्यासाठी निधीलाही मान्यता देण्यात आली आहे.

 राष्ट्रीय ग्रंथालय अभियान : राज्यातून नंदुरबार जिल्हा शासकीय ग्रंथालयाची निवड

ऑनलाईन लोकमत विशेष/ रमाकांत पाटील 
नंदुरबार, दि.15- केंद्र शासनातर्फे राबविण्यात येणा:या राष्ट्रीय ग्रंथालय अभियानाअंतर्गत ‘मॉडेल ग्रंथालय’ योजनेत राज्यातून नंदुरबार जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयाची निवड करण्यात आली असून त्यासाठी निधीलाही मान्यता देण्यात आली आहे. राज्यभरातून केवळ नंदुरबार ग्रंथालयाचीच निवड झाल्याने पहिले ‘मॉडेल ग्रंथालय’चा मान या ग्रंथालयाला मिळणार आहे. 
राष्ट्रीय ज्ञान आयोगाने ग्रंथालयांच्या सर्वागीन विकास होण्याच्या दृष्टीने केलेल्या शिफारशीनुसार संस्कृती मंत्रालय भारत सरकार यांच्यामार्फत ‘राष्ट्रीय पुस्तकालय मिशन’ या उच्चस्तरीय समितीची स्थापना केली आहे. त्याअंतर्गत मॉडेल ग्रंथालयाची योजना आकारास आली. या योजनेसाठी केंद्र शासनातर्फे 75 टक्के व राज्य शासनातर्फे 25 टक्के निधी देण्यात येणार आहे.
देशभरातून या योजनेअंतर्गत प्रत्येक राज्यातून दोन अशा 70 ग्रंथालयांना यंदा अनुदान देण्यात येणार आहे. त्यात महाराष्ट्रातून एकमेव जिल्हा ग्रंथालय अधिकारी नंदुरबार अर्थात जिल्हा शासकीय ग्रंथालयाची निवड करण्यात आली आहे. या योजनेसाठी जिल्हा ग्रंथालय अधिका:यांनी पाठविलेल्या प्रस्तावास राष्ट्रीय पुस्तकालय मिशन संस्कृती मंत्रालयाने मंजुरी दिली आहे. त्याअंतर्गत एकुण 21 लाख 89 हजार 507 रुपयांचा निधी मिळणार आहे. त्यासाठी राज्य शासनाच्या 25 टक्के हिस्सा अर्थात पाच लाख 47 हजार 376 रुपयांची रक्कम राष्ट्रीय पुस्तकालय मिशनकडे वर्ग करण्यास राज्य शासनानेही मान्यता दिली आहे. 
नंदुरबार जिल्हा शासकीय ग्रंथालयात सध्या 50 हजार पुस्तके असून या ग्रंथालयाची इमारत सुसज्ज व सर्व सोयींनीयुक्त आहे. ग्रंथालयात विविध कक्ष असून त्यात सुचक अभ्यासिका, बालविभाग, महिला विभाग, स्पर्धा परीक्षा दालन आहे. याशिवाय मुबलक प्रमाणावर संदर्भ ग्रंथही उपलब्ध आहेत. नवीन मिळणा:या निधीतून ग्रंथालयात बाल वाचकांना आकर्षीत करण्यासाठी स्वतंत्र ‘गेमझोन’, ज्येष्ठ नागरिकांसाठी कक्ष, स्पर्धा परीक्षेतील विद्याथ्र्यासाठी अत्याधुनिक अभ्यासिका व त्यांना पुर्णवेळ संगनक आणि इंटरनेट सेवेची सुविधा करण्यात येणार आहे. हे ग्रंथालय पुर्णत: डिजीटल करण्यात येणार असून सौर उज्रेने स्वयंपुर्ण करण्यात येणार आहे. देशभरातील ग्रंथालयांना ते जोडण्यात येणार असून ई-ग्रंथालयाची सुविधा उपलब्ध होणार आहे.
तीन महिन्यापूर्वीच जिल्हा ग्रंथालय संघाच्या अधिवेशनासाठी उच्च तंत्रशिक्षण विभागाचे उपसचिव पी.एम.ताकटे व ग्रंथालय संचालक किरण धांडोरे हे जिल्ह्यात आले होते. त्यावेळी त्यांनी जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयाची पहाणी करून येथील ग्रंथालय कामाचे कौतूक केले होते. त्याचवेळी त्यांनी हे ग्रंथालय मॉडेल ग्रंथालय होऊ शकेल असे सांगून मार्गदर्शन केले होते. त्यांच्या मार्गदर्शनानुसारच प्रस्ताव तयार करून शासनाकडे सादर केला होता. हे ग्रंथालय मॉडेल ठरणार असल्याने या भागातील वाचकांसाठी त्याचा अधिक लाभ होणार असल्याचे जिल्हा ग्रंथालय अधिकारी संतोष जाधव यांनी सांगितले.