शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्रीय कर्मचाऱ्यांना गुड न्यूज; महागाई भत्ता २ टक्के वाढला; पेन्शनरांनाही होणार लाभ 
2
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
3
खेळण्यातील कारचा वापर करून हल्ल्याचा कट, ४ संशयित दहशतवाद्यांना अटक
4
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
5
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
6
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
7
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
8
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
9
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
10
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
11
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
12
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
13
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
14
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
15
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
16
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
17
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
18
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
19
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
20
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
Daily Top 2Weekly Top 5

नंदुरबारात विद्यापीठाची साहित्य कौशल्य कार्यशाळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2019 12:22 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : शहरातील जिजामाता महाविद्यालयात काव्यवाचन, वक्तृत्व व वादविवाद या विषयांवर साहित्य कौशल्य कार्यशाळेचे आयोजन करण्यात ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : शहरातील जिजामाता महाविद्यालयात काव्यवाचन, वक्तृत्व व वादविवाद या विषयांवर साहित्य कौशल्य कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. कार्यशाळेचे उद्घाटन जिजामाता शिक्षण संस्थेच्या अध्यक्षा शोभा दिलीपराव मोरे यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यशाळेत 110 विद्याथ्र्यानी सहभाग नोंदवला.अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ.टी.ए. मोरे तर प्रमुख अतिथी म्हणून सार्वजनिक महाविद्यालय विसरवाडी व उमविचे सिनेट सदस्य प्राचार्य डॉ.ए.टी. पाटील, उमविचे सिनेट सदस्य व जी.टी. पाटील महाविद्यालयाचे प्रा.डॉ.एन.बी. गोसावी, अक्कलकुवा येथील कला व वाणिज्य महाविद्यालयाचे डॉ.एस.बी. पाटील उपस्थित होते. कार्यशाळेत व्याख्याते म्हणून अमळनेर येथील प्रताप कॉलेजचे प्रा.डॉ.रमेश माने, विधी महाविद्यालय धुळेचे सारांश सोनार, एसपीडीएम कॉलेज शिरपूरचे प्रा.डॉ.संजीव गिरासे, एसएसव्हीपीएस धुळेचे सतीश अहिरे, जीटीपी महाविद्यालयाचे प्रा.डॉ.माधव कदम यांचे मार्गदर्शन लाभले. या वेळी शोभा मोरे म्हणाल्या की, विद्याथ्र्याच्या व्यक्तिमत्त्व विकासासाठी वाचन, लेखन, चिंतनाची आवश्यकता असून यु-टय़ूब, इंटरनेट, मोबाईल या सोशलमिडीयाच्या अतिवापरामुळे युवापिढी वाचनापासून दूर जात         आहे. परिणामी आजचा युवा वर्ग दिशाहीन होत आहे. या दिशाहीन अवस्थेवर मात करण्यासाठी विद्यापीठाने आयोजित केलेल्या वादविवाद, काव्यवाचन, वक्तृत्व अशा व्यक्तिमत्त्व विकासाला बळकटी देणा:या कार्यशाळेमुळे विद्यार्थी येणा:या संकटाला सामोरे जावू शकतो, असे सांगितले.कार्यशाळेत उत्तर महाराष्ट्रातील 40 महाविद्यालयातील सुमारे 110 विद्याथ्र्यानी सहभाग नोंदविला. प्रास्ताविक विद्यार्थी विकास अधिकारी प्रा.डॉ.डी.व्ही. सोनवणे यांनी केले. सूत्रसंचालन प्रा.संजय महाले यांनी तर आभार प्रा.सचिन भसारकर यांनी मानले. कार्यशाळेसासाठी प्रा.डॉ.आर.जी. मेश्राम, प्रा.डॉ.ए.बी. देशमुख, प्रा.विजय सूर्यवंशी, प्रा.डॉ.डी.के. सावंत, प्रा.व्ही.के. पंडीत, डी.बी. मराठे, एल.आर. खैरनार आदींनी परिश्रम घेतले.