नंदुरबार जिल्ह्यात आणखी पाच जणांचा अहवाल पॉझिटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2020 19:12 IST2020-06-22T19:12:26+5:302020-06-22T19:12:33+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : जिल्ह्यातील पाच जणांचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे़ पॉझिटिव्ह आढळलेले ...

In Nandurbar district, the report of five more people is positive | नंदुरबार जिल्ह्यात आणखी पाच जणांचा अहवाल पॉझिटिव्ह

नंदुरबार जिल्ह्यात आणखी पाच जणांचा अहवाल पॉझिटिव्ह

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : जिल्ह्यातील पाच जणांचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे़ पॉझिटिव्ह आढळलेले तळोदा, शहादा आणि नंदुरबार शहरातील रहिवासी आहेत़
सोमवारी जिल्हा रुग्णालयातून सहा जणांना कोरोनामुक्त झाल्याने सुटी देण्यात आली होती़ यामुळे जिल्ह्याची कोरोनाकडे वाटचाल सुरु असताना सायंकाळी प्राप्त झालेल्या अहवालात पाच जणांचे अहवाल पॉॅझिटिव्ह आहे आहेत़ यात तळोदा शहरातील मोठा माळीवाडा परिसरात राहणारी ३० वर्षीय महिला, शहादा शहरात गणेश नगर भागातील २९ वर्षीय पुरुष, नंदुरबार शहरालगतच्या कोकणी हिल येथील २८ वर्षीय पुरुष तर सिंधी कॉलनीत राहणाऱ्या २१ व २३ वर्षीय युवतींना कोरोनाची बाधा झाल्याचे अहवालावरुन स्पष्ट झाले होते़ यात तळोदा आणि शहादा येथील रुग्णाला यापूर्वीच क्वारंटाईन करण्यात आले असून उर्वरित तिघांना नंदुरबार जिल्हा रुग्णालयात दाखल करण्याची प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे़ नव्याने पाच रुग्ण आढळून आल्याने उपचार घेणाऱ्यांची संख्या २९ झाली आहे़ आतापर्यंत जिल्ह्यातील ४७ रुग्ण कोरोनामुक्त झाले असून पाच जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे़ जिल्ह्यात ८३ जणांना कोरोनाची बाधा झाली आहे़

Web Title: In Nandurbar district, the report of five more people is positive