शहरं
Join us  
Trending Stories
1
वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरण, ट्रम्प यांची मोठी प्रतिक्रिया; इराण युद्धाशी संबंध जोडत म्हणाले…
2
तमिळ अभिनेत्री अक्षया हरिहरनच्या नावे बोगस मतदान! पोलिंग बूथवर उडाली खळबळ; कोर्टात जाणार...
3
आपली बस, आपली सेवा…! ST प्रवाशांसाठी मोठे पाऊल; १ मे पासून ‘लालपरी’चे नवे अभियान होणार सुरू
4
दिल्ली विमानतळावर अपघात! २३२ प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या स्विस एअरच्या विमानाच्या इंजिनला आग; ६ जण जखमी, धावपट्टी बंद
5
“लोकशाहीत हिंसाचाराला थारा नाही”; वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरणी PM मोदींची प्रतिक्रिया
6
“ST ग्रामीण भागाची जीवनवाहिनी, विलिनीकरणाबाबात महायुती सरकार गप्प का?”: विजय वडेट्टीवार
7
IPL मध्ये अडखणाऱ्या मुंबई इंडियन्ससाठी गुडन्यूज, ‘या’ सामन्यातून रोहित शर्मा करणार कमबॅक
8
त्याच हॉटेलमध्ये राष्ट्राध्यक्षांवर ४५ वर्षांपूर्वी झालेला गोळीबार; डोनाल्ड ट्रम्प थोडक्यात बचावले, पण...
9
पाकिस्तानने इव्हेंट बनवून ठेवला...! अमेरिका चर्चेसाठी जाणार नाही, दौरा रद्द; इराणचे परराष्ट्रमंत्री कधीचेच निघाले...
10
संरक्षण क्षेत्रात भारताची आघाडी! रशियाच्या जुन्या भागीदाराला मिळाली साथ; पुतिनही हैराण
11
अशोक खरातचे आणखी 'काळे कारनामे' उघड! ऑफिसबॉयनंतर कुकनेही उडवली झोप; फार्महाऊसमधील कृत्य एसआयटीच्या हाती
12
कोणत्याही क्षणी काश पटेल यांचे FBI संचालक पद जाणार? ट्रम्प प्रशासनामध्ये खळबळ, गच्छंतीची शक्यता
13
गोजुबावीत अजितदादांच्या प्रतिमेसमोर अघोरी पूजा, 'टाचण्या टोचलेले लिंबू'; अमोल मिटकरींच्या ट्विटने मोठी खळबळ
14
Credit Card : क्रेडिट कार्ड वापरताय? गरजेपेक्षा जास्त खर्च करणं पडेल महागात; थेट Income Tax ची नोटीस येण्याची शक्यता
15
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना शानदार, उत्साह वाढेल; पद-पैसा-चांगला लाभ, पण आरोग्य सांभाळा!
16
अमेरिकेची ‘माइन हंटिंग’ मोहीम! इराणकडून समुद्रतळात पेरलेले पाणसुरुंग काढण्याचे ट्रम्प यांचे आदेश
17
माओवाद्यांकडून सशस्त्र क्रांतीचाच पुनरुच्चार! ‎'देवजी'ला ठरवले गद्दार: आत्मसमर्पण धोरणावर पत्रकातून आगपाखड 
18
हैदराबादहून चेन्नईला जाणाऱ्या चारमीनार एक्स्प्रेसला लागली आग, प्रवाशांनी धावत्या ट्रेनमधून मारल्या उड्या   
19
बैठे काम सिगारेट ओढण्याइतकेच घातक; दुर्लक्ष केल्यास आरोग्याचा निघणार ‘धूर’, कशी घ्याल काळजी? 
20
डोनाल्ड ट्रम्प यांच्यासमोरच अंदाधुंद गोळीबार; अमेरिकेत खळबळ, सुरक्षा जवानांनी संशयिताला पकडलं
Daily Top 2Weekly Top 5

नंदुरबार व शहादा तालुक्यात तुरळक पावसाची हजेरीने तारांबळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 2, 2019 12:09 IST

लोकमत न्यूज नेटवर्क प्रकाशा/नंदुरबार : शहादा आणि नंदुरबार तालुक्याच्या विविध भागात रविवारी पहाटेच्या सुमारास पावसाच्या तुरळक सरी कोसळल्या़ यातून ...

लोकमत न्यूज नेटवर्कप्रकाशा/नंदुरबार : शहादा आणि नंदुरबार तालुक्याच्या विविध भागात रविवारी पहाटेच्या सुमारास पावसाच्या तुरळक सरी कोसळल्या़ यातून काही ठिकाणी कापूस गळून पडल्याचे दिसून आले आह़े शहादा तालुक्यात प्रकाशा तर नंदुरबार तालुक्यातील तापी काठालगतच्या गावांमध्ये पावसाने हजेरी लावली होती़ रविवारी पहाटे 1 वाजेपासून पावसाला सुरुवात झाल्याची माहिती आह़े प्रकाशा ता़ शहादा मंडळात सात मिलीमीटर पाऊस झाल्याची माहिती आह़े तर नंदुरबार तालुक्यातील नाशिंदे, बोराळे, समशेपूर, कोरीट या तापी काठालगतच्या गावांमध्ये तसेच दक्षिणेकडील आष्टे मंडळातील गावांमध्ये तुरळक पावसाच्या सरी कोसळल्याची माहिती देण्यात आली आह़े या पावसामुळे खळवाडय़ांमध्ये तसेच घरांच्याबाहेर ऊन लावण्यासाठी ठेवलेल्या कापासाचे सर्वाधिक नुकसान झाल्याची माहिती देण्यात आली आह़े प्रकाशा परिसरात ब:याच ठिकाणी अद्यापही कापूस वेचणी शिल्लक आह़े यातून पहाटे पावसाने हजेरी लावल्याने काही ठिकाणी बोंडे तसेच कापूस गळू पडल्याची माहिती देण्यात आली आह़े रविवार असल्याने प्रशासनाने अद्याप या नुकसानीची दखल घेतलेली नसल्याची माहिती देण्यात आली आह़े दरम्यान नंदुरबार तालुक्याच्या विविध भागात रविवारी दिवसभर ढगाळ वातावरण होत़े यातून दिवसभर सूर्यदर्शनही झाले नाही़ हे वातावरण कायम राहिल्यास मिरची आणि हरभरा या पिकांना नुकसान होण्याची भिती व्यक्त करण्यात येत आह़े नंदुरबार तालुक्यातील आष्टे परिसरात कांदा उत्पादकांना या पावसाचा फटका बसला असल्याचे सांगण्यात येत आह़े रविवारी सायंकाळनंतर पुन्हा ढग दाटून आलेले असल्याचे चित्र तालुक्यात दिसून आले होत़े यातून शेतक:यांनी आवराआवर करत पिक सुरक्षित करण्याचा प्रयत्न केला होता़