शहरं
Join us  
Trending Stories
1
वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरण, ट्रम्प यांची मोठी प्रतिक्रिया; इराण युद्धाशी संबंध जोडत म्हणाले…
2
तमिळ अभिनेत्री अक्षया हरिहरनच्या नावे बोगस मतदान! पोलिंग बूथवर उडाली खळबळ; कोर्टात जाणार...
3
आपली बस, आपली सेवा…! ST प्रवाशांसाठी मोठे पाऊल; १ मे पासून ‘लालपरी’चे नवे अभियान होणार सुरू
4
दिल्ली विमानतळावर अपघात! २३२ प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या स्विस एअरच्या विमानाच्या इंजिनला आग; ६ जण जखमी, धावपट्टी बंद
5
“लोकशाहीत हिंसाचाराला थारा नाही”; वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरणी PM मोदींची प्रतिक्रिया
6
“ST ग्रामीण भागाची जीवनवाहिनी, विलिनीकरणाबाबात महायुती सरकार गप्प का?”: विजय वडेट्टीवार
7
IPL मध्ये अडखणाऱ्या मुंबई इंडियन्ससाठी गुडन्यूज, ‘या’ सामन्यातून रोहित शर्मा करणार कमबॅक
8
त्याच हॉटेलमध्ये राष्ट्राध्यक्षांवर ४५ वर्षांपूर्वी झालेला गोळीबार; डोनाल्ड ट्रम्प थोडक्यात बचावले, पण...
9
पाकिस्तानने इव्हेंट बनवून ठेवला...! अमेरिका चर्चेसाठी जाणार नाही, दौरा रद्द; इराणचे परराष्ट्रमंत्री कधीचेच निघाले...
10
संरक्षण क्षेत्रात भारताची आघाडी! रशियाच्या जुन्या भागीदाराला मिळाली साथ; पुतिनही हैराण
11
अशोक खरातचे आणखी 'काळे कारनामे' उघड! ऑफिसबॉयनंतर कुकनेही उडवली झोप; फार्महाऊसमधील कृत्य एसआयटीच्या हाती
12
कोणत्याही क्षणी काश पटेल यांचे FBI संचालक पद जाणार? ट्रम्प प्रशासनामध्ये खळबळ, गच्छंतीची शक्यता
13
गोजुबावीत अजितदादांच्या प्रतिमेसमोर अघोरी पूजा, 'टाचण्या टोचलेले लिंबू'; अमोल मिटकरींच्या ट्विटने मोठी खळबळ
14
Credit Card : क्रेडिट कार्ड वापरताय? गरजेपेक्षा जास्त खर्च करणं पडेल महागात; थेट Income Tax ची नोटीस येण्याची शक्यता
15
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना शानदार, उत्साह वाढेल; पद-पैसा-चांगला लाभ, पण आरोग्य सांभाळा!
16
अमेरिकेची ‘माइन हंटिंग’ मोहीम! इराणकडून समुद्रतळात पेरलेले पाणसुरुंग काढण्याचे ट्रम्प यांचे आदेश
17
माओवाद्यांकडून सशस्त्र क्रांतीचाच पुनरुच्चार! ‎'देवजी'ला ठरवले गद्दार: आत्मसमर्पण धोरणावर पत्रकातून आगपाखड 
18
हैदराबादहून चेन्नईला जाणाऱ्या चारमीनार एक्स्प्रेसला लागली आग, प्रवाशांनी धावत्या ट्रेनमधून मारल्या उड्या   
19
बैठे काम सिगारेट ओढण्याइतकेच घातक; दुर्लक्ष केल्यास आरोग्याचा निघणार ‘धूर’, कशी घ्याल काळजी? 
20
डोनाल्ड ट्रम्प यांच्यासमोरच अंदाधुंद गोळीबार; अमेरिकेत खळबळ, सुरक्षा जवानांनी संशयिताला पकडलं
Daily Top 2Weekly Top 5

कोठलीत नवकूळ नागपूजा भातिजी नाम होमयज्ञ महोत्सव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 1, 2019 13:02 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : तालुक्यातील कोठली येथे रविवारी भातिजी संप्रदायातर्फे प.पू. गोविंदास महाराज यांच्या प्रमुख उपस्थितीत 25 वे ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : तालुक्यातील कोठली येथे रविवारी भातिजी संप्रदायातर्फे प.पू. गोविंदास महाराज यांच्या प्रमुख उपस्थितीत 25 वे नवकुळ नागपूजा भातिजी नामयज्ञ महोत्सवाचे आयोजन करण्यात आलेले आहे. यासाठी तयारी पूर्ण करण्यात आलेली असून कार्यक्रमास महाराष्ट्र, गुजरात व मध्य प्रदेशातील 20 हजार भाविक उपस्थित राहणार आहेत.कोठली येथे दुपारी साडेतीन वाजता होमयज्ञ महोत्सवाला सुरुवात होणार आहे. सायंकाळी सहा वाजता आरती, साडेआठ वाजता महाप्रसाद, रात्री साडेआठ ते नऊ वाजेर्पयत भजन व गुरुवंदना कार्यक्रम होईल. रात्री नऊ ते 10 वाजेर्पयत स्वागत समारंभ, 12 वाजेर्पयत सत्संग तर रात्री 12 वाजता आरती प्रसाद व त्यानंतर रात्री एक ते पहाटे पाच वाजेर्पयत कीर्तनाचा कार्यक्रम होणार आहे.महोत्सवाचे प्रमुख अतिथी म्हणून खासदार डॉ.हीना गावीत, आमदार डॉ.विजयकुमार गावीत, पालघराचे खासदार राजेंद्र गावीत, आमदार शिरीष नाईक, माजी आमदार शरद गावीत, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष भरत गावीत उपस्थित राहणार आहेत. भातिजी नामयज्ञ महोत्सव जयसिंग महाराज, जंबूभाई महाराज, सेवादास महाराज, खुमानदास महाराज, कुवरसिंग महाराज, आत्माराम महाराज, नानसिंग महाराज, सोमाभाई महाराज, रुमशीभाई महाराज, शिवाजी महाराज, अनितामाता यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडणार असल्याची माहिती सरपंच वासंतीबाई वळवी, कांतीलाल पाडवी, विजय वळवी, चंद्रकांत वळवी, सतीश वळवी, बालाजी वळवी, मिथुन वळवी, दिनेश वळवी, उघडय़ा वळवी, संजय वळवी, विपुल वळवी, सुरेश वळवी, मदन वळवी, विवेकानंद वळवी यांनी  दिली.भाविक एकवटलेजिल्ह्यात मोठय़ा प्रमाणावर प.पू.भातिजी महाराज संप्रदायाचे अनुयायी असून महोत्सवाचे आयोजन करण्यासाठी गेल्या महिनाभरापासून विविध समित्या स्थापन करण्यात आलेल्या आहेत. महाराष्ट्र, गुजरात व मध्य प्रदेशातील साधारणत: 20 हजार भाविक उपस्थित राहणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली आहे. शनिवारी दिवसभर भाविकांकडून यज्ञ मंडपाची उभारणी करण्यात येत होती. गावातील के.डी. गावीत हायस्कूलच्या प्रांगणात भजन व कीर्तनाचा कार्यक्रम होणार असल्याने त्या ठिकाणाचीही तयारी पूर्ण करण्यात आलेली आहे.

पारंपरिक आदिवासी नृत्याने महोत्सवाला रविवारी दुपारी साडेतीन वाजेपासून प्रारंभ होण्यापूर्वी गावातून संत व महात्म्यांची शोभायात्रा काढण्यात येणार आहे. महोत्सव यशस्वी करण्यासाठी एकलव्य गणेश मंडळ, वीर भातिजी मंडळ, सिद्धार्थ नवयुवक मंडळ, स्वाध्याय परिवार, श्रीराम मंडळ, बालाजीवाडा ग्रुप, माऊली माता ग्रुप, युवा प्रतिष्ठान मंडळ तसेच गावातील सर्व महिला बचत गटाच्या महिला परिश्रम घेत आहेत.