जांगठी येथील एकाच्या मृत्यूप्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2020 12:05 IST2020-05-26T12:05:40+5:302020-05-26T12:05:49+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : सातपुड्याच्या दुर्गम भागातील मणिबेली ते जांगठी या दरम्यान परीस घाटात एकास मारुन फेकून दिल्याची ...

Murder case filed against one in Jangthi | जांगठी येथील एकाच्या मृत्यूप्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल

जांगठी येथील एकाच्या मृत्यूप्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : सातपुड्याच्या दुर्गम भागातील मणिबेली ते जांगठी या दरम्यान परीस घाटात एकास मारुन फेकून दिल्याची घटना नोव्हेंबर २०१९ मध्ये घडली होती़ याप्रकरणी मोलगी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद होती़
राया पाशा वळवी रा़ जांगठी असे मयताचे नाव असून त्यांना संशयित भुऱ्या होडल्या वसावे रा़ मणिबेली याने ४ ते ५ नोव्हेंबर दरम्यान ठार मारले होते़ पुरावे नष्ट करण्यासाठी संशयिताने मृतदेह जांगठी ते मणिबेली दरम्यान परीस घाटात फेकून दिले होते़ घटनेनंतर पोलीसांनी अकस्मात मृत्यूची नोंद करुन घेत तपास सुरु ठेवला होता़ दरम्यान रविवारी वैद्यकीय अधिकारी शामराव घोळवे यांनी पोलीसांना मरणाबाबत अभिप्राय दिल्यानंतर कारवाई करुन खुनाचा गुन्हा दाखल झाला़ पोलीस उपनिरीक्षक राजेश पाटील यांनी फिर्याद दिल्यानंतर संशयित भुºया होडल्या वसावे याच्याविरोधात गुन्हा दाखल असून तपास सहायक पोलीस निरीक्षक मनोहर पगार करत आहेत़

Web Title: Murder case filed against one in Jangthi