शहरं
Join us  
Trending Stories
1
"रडण्याची वेळ आली आहे...!" बंगाल निकालापूर्वीच मौलाना जर्जिश अंसारी यांच भडकावू विधान; योगींना म्हणाले 'शेर'!
2
'भाजपाचा झेंडा असलेल्या कार ईव्हीएम स्ट्राँग रुमजवळ कशा?', ममता बॅनर्जींच्या मतदारसंघात खळबळ
3
मुंबईकर रहाणे-रघुवंशी जोडीचा हिट शो, रिंकूचा फिनिशिंग टच! SRH ला मात देत KKR ची विजयी हॅटट्रिक
4
"माझा सत्तेत बसलेल्यांना थेट सवाल आहे, तुमचं...", अमित ठाकरे नसरापूर प्रकरणावरून सरकारवर संतापले
5
लैंगिक शोषण प्रकरण: विनेश फोगाटचा मोठा खुलासा; "मीही त्या ६ पीडित महिला कुस्तीपटूंपैकी एक"
6
एकाच गर्भातून जन्माला आल्या जुळ्या बहिणी, पण वडील मात्र वेगवेगळे! DNA चाचणीतून ४९ वर्षांपूर्वीचं गुपित झालं उघड अन्...
7
Maharashtra Weather: उष्णतेच्या तडाख्यातून दिलासा मिळणार, चार जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट! पुढील चार दिवस कसे असेल हवामान?
8
"दादा वाचव, हे मला मारतील!" बहिणीची शेवटची हाक अन् बरेलीत लव्ह मॅरेजचा रक्तरंजित शेवट!
9
IPL 2026: रोहित शर्मा अखेर 'मुंबई इंडियन्स' सोडणार? एका व्हायरल पोस्टमुळे चर्चांना उधाण
10
आंबा पाहताच तोंडाला पाणी सुटतं, पण जरा थांबा; जास्त खाल्ल्याने शरीरात उष्णता वाढते, कारण...
11
इराणचा शांततेचा हात, ट्रम्प यांचा लाथ मारण्याचा इशारा! "चुकीचं वागलात तर याद राखा..."
12
नेपाळमध्ये 'बालेन' स्टाईल दणका! एका क्षणात १५०० सरकारी अधिकाऱ्यांना बसवलं घरी; नव्या सरकारचा मोठा निर्णय
13
मिस्ट्री स्पिनर सुनील नरेनचा ऐतिहासिक पराक्रम! IPL मध्ये २०० विकेट्स घेणारा पहिला परदेशी गोलंदाज
14
IPL मधील पहिला भारतीय शतकवीर! KKR कडून संधी मिळताच पठ्ठ्याची रोहित-विराटच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
15
Sara Tendulkar : "कसं वागावं, कोणते कपडे घालावे?"; सारा तेंडुलकरने केला सचिनच्या 'कडक' शिस्तीबाबत खुलासा
16
...तर नसरापूरच्या नराधमाला १५ ते २१ दिवसांत फाशीची शिक्षा झाली असती- राज्याचे माजी गृहमंत्री
17
Video: डोंगराळ मार्गावरून जात असताना अचानक रस्ता खचला, बघता-बघता ट्रक आत रूतला अन् मग...
18
कडक निर्बंध, तरीही इराणचं तेल पोहचलं आशियात! अमेरिकेच्या डोळ्यात धूळ फेकत कसं निघालं जहाज?
19
दिल्लीत AC ब्लास्टने जैन कुटुंब संपलं; आईच्या छातीशी घट्ट बिलगलेला दीड वर्षांचा आरू अन् शेवटचा तो व्हिडिओ कॉल...
20
आईच्या जीवाभावाच्या मैत्रिणीनेच रचला १४ वर्षांच्या चिमुरड्याच्या हत्येचा कट; सीसीटीव्हीमुळे फुटलं भांडं!
Daily Top 2Weekly Top 5

तळोद्यात विलगीकरण केंद्रासाठी हालचाली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2020 12:20 IST

लोकमत न्यूज नेटवर्क कोठार : सहाय्यक जिल्हाधिकारी अविशांत पांडा यांच्या अध्यक्षेतेखाली तळोदा येथे झालेल्या अधिकाऱ्यांच्या बैठकीत कोरोनाच्या पार्श्वभूमीवर तालुक्यात ...

लोकमत न्यूज नेटवर्ककोठार : सहाय्यक जिल्हाधिकारी अविशांत पांडा यांच्या अध्यक्षेतेखाली तळोदा येथे झालेल्या अधिकाऱ्यांच्या बैठकीत कोरोनाच्या पार्श्वभूमीवर तालुक्यात विलगीकरण कक्ष उभारण्यासाठी चर्चा झाली. सभेत पांडा यांनी येथील आदिवासी मुलांच्या वसतिगृहात विलगीकरण कक्ष स्थापना करण्याच्या सूचना केल्या. त्यानुसार या केंद्रासाठी तळोद्यात हालचाली सुरु झाल्या आहे.कोरोनाच्या पार्श्वभूमीवर करण्यात येण्याºया कार्यवाहीत आपत्कालीन परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी सहाय्यक जिल्हाधिकारी अविशांत पांडा यांनी तळोदा तालुक्यातील सर्व विभागप्रमुखांची बैठक घेतली. बैठकीत तहसीलदार पंकज लोखंडे, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. महेंद्र चव्हाण, गटविकास अधिकारी सावित्री खर्डे, सहाय्यक गटविकास अधिकारी सोनावणे, पालीका मुख्याधिकारी सपना वसावा, नायब तहसीलदार रामजी राठोड, दीपक गवते, श्रीकांत लोमते, सहय्यक प्रकल्पाधिकारी शैलेश पाटील, सुवर्णा सोलंकी, विजय सोनावणे आदी उपस्थित होते.यावेळी पांडा यांनी आपत्कालीन स्थिती उद्भवू नये यासाठी संबंधित विभागांमार्फत प्रतीबंधात्क उपाययोजनांची काटेकोर अंमलबजावणी करण्याचे आदेश दिले. तालुका व शहरात बाहेरून कोरोनाची लागण झालेला संशयित आल्यास त्याला विलगीकरण कक्षात ठेवणे अत्यावश्यक आहे. त्यासाठी उप जिल्हा रुग्णालयात विलगीकरण कक्ष स्थापन केल्याची माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. चव्हाण यांनी दिली. असे असले तरी आपत्कालीन परिस्थितीत हे विलगीकरण कक्ष अपुरे पडू नये, यासाठी अधिक खाटांची व्हावी म्हणून आमलाड येथील आदिवासी मुलांच्या वसतिगृहात २०० खाटांचे विलगीकरण कक्ष उभारण्याच्या सूचना करण्यात आल्या आहे. त्यासाठी वसतिगृहातील स्वच्छतागृह निर्जंतुकीकरण करण्याच्या सूचना प्रांताधिकारी पांडा यांनी दिल्या. बैठक संपल्यानतर पांडा यांनी सर्व अधिकाऱ्यांसह आमलाड वसतिगृहाला भेट देत तेथील सुविधांची पाहणीही केली.बैठक संपल्यानतर पांडा यांनी सर्व अधिकाºयांसह आमलाड वसतिगृहाला भेट देत तेथील सुविधांची पाहणीही केली.बैठकीत पांडा यांनी शासकीय विश्रमगृह, लॉज ट्रॅव्हल्स व खाजगी प्रवासी वाहतूक पूर्णत: बंद ठेवण्याबाबत आदेश काढण्याचे आवाहन केले.पालिकेकडून नागरिकांच्या जनजागृतीवर भर देण्याच्या केल्या सूचना.शहरात मास्क व सनेटायझरची वाढीव दराने विक्री व साठेबाजी करतांना कुणी आढळल्यास त्यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश दिले.सरकारी कार्यालयात ५०-५० टक्के कर्मचारी उपस्थितीचे आवाहन.सहाय्यक जिल्हाधिकाºयांची नाराजीकोरोनावर मात करण्यासाठी प्रशासनाकडून प्रयत्न सुरू असतांना सहाय्यक जिल्हादिकारी अविशांत पांडा यांना बाजारात फेरफटका मारतांना मोठी गर्दी आढळून आली. श्विाय दुकानेही सुरू असल्याचे दिसून आल्याने त्यांनी नाराजी व्यक्त केली. दरम्यान शासनाकडून दिल्या जाणाºया सूचना व मार्गदर्शक तत्वाचे काटेकोर व गांभीर्याने अंमलबजावणी व्हावी, अशी अपेक्षा व्यक्त केली. पुढील आठवडा कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी महत्वाचा असल्याने नागरिकांना त्यांच्या जबाबदारीची जाणिव करून देण्याच्या सुचनाही पांडा यांनी केल्या.