ऑक्सिजनयुक्त रुग्णालय उभारणीसाठी हालचाली गतिमान;

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2021 04:31 IST2021-04-20T04:31:21+5:302021-04-20T04:31:21+5:30

कोठार : वाढती कोरोना रुग्णसंख्या लक्षात घेता तळोदा शहरात ऑक्सिजनयुक्त रुग्णालय उभारणीसाठी हालचाली गतिमान झाल्या आहेत. तळोदा तहसीलदार गिरीश ...

Movements to build an oxygenated hospital; | ऑक्सिजनयुक्त रुग्णालय उभारणीसाठी हालचाली गतिमान;

ऑक्सिजनयुक्त रुग्णालय उभारणीसाठी हालचाली गतिमान;

कोठार : वाढती कोरोना रुग्णसंख्या लक्षात घेता तळोदा शहरात ऑक्सिजनयुक्त रुग्णालय उभारणीसाठी हालचाली गतिमान झाल्या आहेत. तळोदा तहसीलदार गिरीश वखारे यांनी शहादा व नंदुरबारचे सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता तसेच जिल्हाधिकाऱ्यांना या इमारतीमध्ये आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्याबाबत दिलेल्या पत्राच्या अनुषंगाने व लोकप्रतिनिधी यांच्या पाठपुराव्याने व जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या आदेशानुसार पशुसंवर्धन विभागाच्या तालुका लघू पशू चिकित्सालयाच्या नूतन इमारतीत सुरू होणार असणाऱ्या कोविड केंद्राच्या कामाचा आढावा घेण्यासाठी आज प्रशासनाच्या वतीने पाहणी करण्यात आली.

तळोदा शहर व तालुक्यातील वाढती संख्या पाहता प्रशासनाच्या वतीने तालुका पशू चिकित्सालयच्या नूतन इमारत पूर्णत्वास येत असून ती ताब्यात घेऊन त्या ठिकाणी कोविड सेंटर सुरू करण्याचे नियोजन सुरू आहे. मात्र एकंदरीत स्थिती पाहता कोविड केअर सेंटर सुरू करण्याबाबत विलंब होणार आहे. या बाबतीत परिस्थिती पाहता स्वतः प्रभारी प्रांताधिकारी शाहूराज मोरे, तहसीलदार गिरीश वखारे, मुख्याधिकारी अनंत जवादवार यांनी प्रास्ताविक ठिकाणी भेट देऊन पाहणी केली. यावेळी इमारतीचे ठेकेदारदेखील उपस्थित होते.

तळोदा सार्वजनिक बांधकाम विभागाकडून सर्व्हे नंबर २६० या जागेवर नूतन तालुका लघु पशुवैद्यकीय चिकित्सालय व निवासस्थान या इमारतीचे बांधकाम करण्यात आले आहे. ही इमारत अद्याप पशुसंवर्धन विभागाकडे हस्तांतरित झाली नसली तरी शहरापासून नजीक व उपजिल्हा रुग्णालय जवळ असल्याने सदर इमारत कोविड रुग्णांसाठी सोयीची असल्याचे सांगण्यात येत आहे. तथापि, या इमारतीमध्ये रुग्णालय व वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी यांच्या सुविधेसाठी पाणीपुरवठा, स्वच्छतागृह, वीज व इतर आनुषंगिक सुविधा पुरवण्याचे काम सुरू आहे.

मागील आठवड्यात आमदार राजेश पाडवी, नगराध्यक्ष अजय परदेशी, तालुका वैद्यकीय अधिकारी यांनी काही दिवसांपूर्वी भेट देऊन पाहणी केली होती व संबंधित ठेकदाराला तशा सूचनादेखील केल्या होत्या, मात्र फ्लोरिंग बसविणे, रंगकाम, अद्यापही बरेचसे कामे बाकी आहेत. आज या ठिकाणी २५ माणसे काम करत असतानादेखील कामाची स्थिती पाहता या कोविड सेंटर सुरू होण्यास अजूनही विलंब होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. सद्य:स्थितीत हे कोविड सेंटर लवकर सुरू करण्यासाठी ठेकेदाराला आवश्यक त्या सूचना आज प्रांताधिकारी शाहू मोरे यांनी दिल्या आहेत.

असे असेल कोविड सेंटर

या ठिकाणी ३० बेड्सची सुविधा ऑक्सिजनसह उपलब्ध असेल.

तळोदा शहर व तालुक्यातील रुग्ण या ठिकाणी येऊन उपचार घेऊ शकतील, तसेच या ठिकाणी वैद्यकीय उपचार करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी निवासाचीदेखील सोय करण्यात येणार आहे.

Web Title: Movements to build an oxygenated hospital;