शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
6
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
7
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
8
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
9
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
10
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
11
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
12
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
13
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
14
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
15
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
16
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
17
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
18
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
19
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
20
ट्रम्प नरमले! अमेरिका-इराणमध्ये आणखी दोन आठवड्यांचा युद्धविराम होण्याची शक्यता, चर्चेसाठी ३ मुद्दे महत्वाचे
Daily Top 2Weekly Top 5

रस्त्यावर स्वयंपाक करून आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 28, 2020 12:05 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार :  इंधन दरवाढीच्या निषेधार्थ केंद्र सरकारच्या विरोधात रविवारी राष्ट्रवादी महिला काँग्रेस पक्षाच्या जिल्हाध्यक्षा हेमलता शितोळे ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार :  इंधन दरवाढीच्या निषेधार्थ केंद्र सरकारच्या विरोधात रविवारी राष्ट्रवादी महिला काँग्रेस पक्षाच्या जिल्हाध्यक्षा हेमलता शितोळे यांच्या नेतृत्वाखाली चूल मांडून भाकरी बनवून अनोखे आंदोलन करण्यात आले. नंदुरबार शहराच्या मुख्य प्रवेशद्वारावर हे आंदोलन करण्यात आले.गेल्या वर्षभरापासून सिलिंडरचे दर दिवसेंंदिवस वाढत असल्याने शहरातील धुळे चौफुली येथे सिलिंडर आणि बाजूला चूल मांडून आंदोलन करण्यात आले. केंद्र सरकारने मोठमोठ्या घोषणा केल्या. मात्र त्यांची अंमलबजावणी होताना दिसत नाही. केंद्र सरकार हे महिलाविरोधी असून त्या आनुषंगाने रविवारी राष्ट्रवादी महिला काँग्रेसतर्फे रस्त्यावर चूल मांडून व भाकरी बनवून अनोखे आंदोलन करीत केंद्र शासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. आंदोलनादरम्यान फिजकल डिस्टन्स व शासनाचे नियम पाळून केवळ ५० ते ६० महिलांच्या उपस्थितीत हे आंदोलन करण्यात आले. केंद्र शासनाने सिलिंडरचे भाव कमी केले नाही तर राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या वतीने जिल्हाभर रास्ता रोको आंदोलन करण्यात येईल, असा इशारा महिला जिल्हाध्यक्ष हेमलता शितोळे यांनी दिला.

आंदोलनस्थळी पोलिसांतर्फे बंदोबस्त... वाघेश्वरी चौफुली ही २४ तास रहदारीची असते. महिलांच्या आंदोलनामुळे रहदारी ठप्प होऊ नये यासाठी नियोजन करण्यात आले होते. त्यामुळे आंदोलनकर्त्या महिलांना चौफुलीवरील प्रवेशद्वार कमानीच्या बाजुला मोकळ्या जागेत त्यांना चूल मांडू देण्यास परवाणगी देण्यात आली होती. यावेळी पोलिसांचा मोठ्या प्रमाणावर बंदोबस्त तैणात होता.