शहरं
Join us  
Trending Stories
1
Fuel Price Hike: मोठी बातमी! पेट्रोल-डिझेल पुन्हा महागले; पाहा मुंबई, पुण्यातील आजचे वाढलेले दर...
2
"माझ्या शांततेला कमजोरी समजू नका, मी लवकरच परतणार!" शेख हसीना यांचा बांगलादेशला थेट इशारा
3
माणुसकी उरली नाही! भररस्त्यात जोडप्याला बांबूने बेदम मारहाण अन् आजूबाजूला बघ्यांची गर्दी, अंगावर काटा आणणारा व्हिडीओ
4
अमेरिकेची दादागिरी चालणार नाही; भारत रशियाकडून तेल खरेदी करणारच, सरकारचा स्पष्ट संदेश
5
२७ एप्रिललाच नीटचा लीक पेपर नाशिकमध्ये पोहोचला, मिळताच शुभम दोन दिवस नाशिकमधून बाहेर
6
San Diego Firing : 'माझा मुलगा...'; आईने पोलिसांना केला होता कॉल, १७ आणि १८ वर्षाच्या मुलांच्या हल्ल्याने मशीद हादरली
7
Video: ‘मी महाराष्ट्र सोडून जाऊ का?’ नाना पाटेकर भावुक
8
शिंदेसेनेच्या बालेकिल्ल्यात भाजप करणार उमेदवारीसाठी दावा; विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीचे बिगुल वाजले
9
Vladimir Putin to Visit China: ट्रम्प यांच्यानंतर पुतिन चीनला भेट देणार! शी जिनपिंग यांच्यासोबत 'या' मुद्द्यांवर होणार द्विपक्षीय चर्चा
10
Twisha Sharma : "दीदी, या मला २४ तास कंट्रोल करतात"; मृत्यूच्या अवघ्या १० मिनिटांपूर्वी ट्विशाने पाठवला होता मेसेज!
11
आजचे राशीभविष्य - १९ मे २०२६, आर्थिक लाभाची संधी, वाणी वर संयम ठेवावा लागेल
12
१ जूनपासून महिलांच्या खात्यावर येणार ३ हजार ; प. बंगालच्या नव्या सरकारचा आश्वासनपूर्तीचा धडाका
13
अमेरिकेत मशिदीत अंधाधुंद गोळीबार; दोन अल्पवयीन संशयितांसह ५ जणांचा मृत्यू, पोलिसांकडून 'हेट क्राईम' घोषित
14
मोटेगावकरने स्वतःच्या मुलासाठीच फाेडला पेपर? नऊ दिवसांची कोठडी, सीबीआयचा दावा; हस्तलिखित नोट्सच्या माध्यमातून पुरवले प्रश्न व उत्तरे
15
एक हजारावर विद्यार्थ्यांकडून पेपर खरेदी; ‘सीबीआय’ला संशय : नागपूरमधील ‘आलोक’ आता रडारवर
16
साखरपुड्याला जाण्यासाठी ट्रकमध्ये बसले ६० जण; कंटेनरची धडक, १३ ठार
17
सीबीआय पथक लातूर शहरात ठाण मांडून; कोचिंग क्लासेस परिसरात कडेकोट बंदोबस्त तैनात  
18
विधान परिषदेच्या १७ जागांसाठी रणसंग्राम; १८ जूनला निवडणूक होणार
19
वंदना सूर्यवंशी यांची विभागीय चौकशी प्रारंभ, मुंबई मुद्रांक जिल्हाधिकारी असताना ४९.३१ कोटींचे शासनाचे केले हाेते नुकसान
20
एक डॉलर ९६.३५ रुपयांना...! खिसा सांभाळून ठेवा, महागाई पाेहाेचणार उच्चांकावर
Daily Top 2Weekly Top 5

शाळा परिसरात माकडांचा हैदोस; शिक्षक, विद्यार्थ्यांना घेतला चावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2026 16:56 IST

या संदर्भात शाळा प्रशासनाने यापूर्वी अनेक वेळा वनविभागाशी पत्रव्यवहार करून माहिती दिली होती. मात्र, केवळ तात्पुरती कारवाई करण्यात येत असून, प्रत्यक्षात माकडांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्यात आलेला नाही, असे शाळा प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.

नवापूर : शहरातील सार्वजनिक गुजराती व मराठी हायस्कूल परिसरात माकडांनीशिक्षक आणि विद्यार्थ्यांना चावा घेतल्याची घटना बुधवारी (दि. ११ फेब्रुवारी) सकाळी घडली. घटनेनंतर शिक्षकांनी वनविभागाच्या कार्यालयात धाव घेतली असता, तेथे अधिकारीच उपस्थित नसल्याने शिक्षकांनी तीव्र संताप व्यक्त केला.

बुधवारी सकाळी झालेल्या शिक्षक सी.एस. पाटील, विजय कदम, जुनेद खान, तसेच विद्यार्थी रुतवीज कोकणी, यहुशवा गावीत, दुर्गेश मराठे, क्रिटीन गावीत व दिव्या भोई यांना माकडांनी चावा घेतल्याची घटना घडली. या घटनेमुळे शाळा परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. गेल्या चार महिन्यांपासून शाळा परिसरात माकडांचा मोठ्या प्रमाणावर उपद्रव सुरू आहे. माकडे शाळेच्या मैदानात प्रवेश करून विद्यार्थ्यांच्या दप्तर, जेवणाचे डबे पळविण्यासह व शालेय साहित्याचे नुकसान करत आहेत. काही वेळा विद्यार्थ्यांच्या अंगावर माकड धावून जात आहेत. धावून जाण्याचे प्रकार घडत असल्याने पालकांमध्येही चिंता व्यक्त होत आहे.

या संदर्भात शाळा प्रशासनाने यापूर्वी अनेक वेळा वनविभागाशी पत्रव्यवहार करून माहिती दिली होती. मात्र, केवळ तात्पुरती कारवाई करण्यात येत असून, प्रत्यक्षात माकडांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्यात आलेला नाही, असे शाळा प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.

दरम्यान, दहावी व बारावीच्या परीक्षा केंद्र म्हणून या शाळेची निवड करण्यात आली आहे. परीक्षेच्या कालावधीत मोठ्या संख्येने विद्यार्थी शाळेत येणार असून, माकडांचा उपद्रव कायम राहिल्यास एखादी गंभीर दुर्घटना होण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत एखाद्या विद्यार्थ्यास इजा झाल्यास त्याची जबाबदारी कोण घेणार, असा सवाल शिक्षकांनी उपस्थित केला आहे.
घटनेनंतर शिक्षकांनी तहसील कार्यालयात जाऊन तहसीलदार दत्तात्रय जाधव यांना निवेदन सादर करून शाळेची व्यथा मांडली. यावेळी मुख्याध्यापक मिलिंद वाघ यांनी नवापूर वनविभागाच्या कार्यपद्धतीबाबत तीव्र नाराजी तहसीलदारांसमोर व्यक्त केली.

निवेदन दिल्यानंतर वनविभागाचे कर्मचारी शाळेच्या आवारात दाखल झाले असून, त्यांनी माकड पकडण्यासाठी पिंजरा लावला आहे. माकडांनी यापूर्वी शाळेच्या आवारात उभ्या असलेल्या अनेक शिक्षकांच्या दुचाकी वाहनांचे नुकसान झाल्याची माहितीही समोर आली आहे. वनविभागाने तातडीने लक्ष देऊन माकडांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करावा, अशी मागणी शिक्षकांनी केली आहे. वेळीच ठोस उपाययोजना न झाल्यास आंदोलनाचा मार्ग अवलंबावा लागेल, असा इशाराही शिक्षकांनी दिला आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Monkey menace in school: Teachers, students bitten in Navapur

Web Summary : Monkeys attacked teachers and students at a Navapur school. School administration expressed anger as forest officials were absent. Students are in fear due to the continued monkey menace. They demand immediate action from the forest department.
टॅग्स :Studentविद्यार्थीTeacherशिक्षकforestजंगलMonkeyमाकड