शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
2
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
3
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
4
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
5
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
6
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
7
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
8
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
9
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
10
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
11
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
12
पित्याने पोटच्या पोराला ज्युसरने ठेचून मारलं; आई-मुलाचं 'अनैतिक नातं' ठरलं हत्येचं कारण?
13
पुण्यात थरार..! मद्यधुंद व्यक्तीकडून बस ‘हायजॅक’चा प्रयत्न; संतोष माने प्रकरणाची पुनरावृत्ती होता होता वाचली
14
आप सोडताच राघव चड्ढांच्या लोकप्रियतेला ओहोटी; भाजप प्रवेशानंतर ११ लाख इन्स्टाग्राम चाहत्यांनी फिरवली पाठ
15
Monsoon 2026 Update: उन्हाच्या झळा आणि घामाच्या धारांमधून कधी होणार सुटका, यंदा मान्सून कधीपर्यंत दाखल होणार?
16
DC vs PBKS : बाप रे! IPL मॅचदरम्यान खेळाडूला गंभीर दुखापत! ॲम्ब्युलन्स मैदानात; नेमकं काय घडलं?
17
रेकॉर्ड ब्रेकर KL राहुल! हिटमॅन रोहित, विराटला जमलं नाही ते या पठ्ठ्यानं करुन दाखवलं
18
क्रूरतेचा कळस! दात तोडले, डोकं फोडलं अन् शेवटी... ब्लॉक केल्याच्या रागातून २ मुलांच्या आईला संपवलं
19
बघून धक्का बसेल! कारमधून चक्क सहा जनावरांची तस्करी, अपघातामुळे फुटले बिंग; एका गायीचा मृत्यू
20
KL Rahul Fastest Century : १२ धावांवर कॅच सुटला! मग KL राहुलनं ठोकली विक्रमी सेंच्युरी
Daily Top 2Weekly Top 5

वनविभागाच्या परवानगीनंतर मोलगी घाट सेक्शन रस्ता दुरुस्ती काम सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2020 12:17 IST

लोकमत न्यूज नेटवर्क वाण्याविहिर : अक्कलकुवा ते मोलगी या रस्त्याची गेल्या पावसाळ्यात वाताहत झाली होती़ डाब ते आमलीबारी या ...

लोकमत न्यूज नेटवर्कवाण्याविहिर : अक्कलकुवा ते मोलगी या रस्त्याची गेल्या पावसाळ्यात वाताहत झाली होती़ डाब ते आमलीबारी या अंतरात वाहून गेलेल्या पुलांसह ढापे पूर्ववत करण्यासाठी वनविभागाची परवानगी आवश्यक होती़ त्याला वनविभागाने मंजूरी दिल्यानंतर रस्ता काम सुरु झाले आहे़ रस्ता दुरुस्तीसाठी ‘लोकमत’ने सातत्याने पाठपुरावा केला होता़ त्यातून कामाला गती देण्यात आली आहे़सातपुड्याच्या दुर्गम भागातील मोलगी परिसरातील गावांना जोडणारा एकमेव रस्ता मोलगी ते अक्कलकुवा दरम्यान आहे़ देवगोई घाटातून जाणाऱ्या या मार्गाची गेल्या वर्षीच्या अतीवृष्टीमुळे मोठी हानी झाली होती़ आठपेक्षा अधिक पूल वाहून गेले होते़ जागोजागी दरड कोसळल्याने ढापे तुटून रस्ता उखडला होता़ यामुळे चार महिने मोलगी ते अक्कलकुवा अशी थेट वाहतूक बंद होती़ दुर्गम भागापर्यंत पोहोचण्याचा एकमेव मार्ग असल्याने रस्ता दुरुस्तीची मागणी होती़ सार्वजनिक बांधकाम विभागाने अ‍ॅन्यूटी या योजनेंतर्गत रस्ता दुरुस्तीसाठी ७५ कोटी रुपयांचा निधी मंजूर करुन ठेकेदाराची नियुक्ती केली होती़ परंतु डाब ते आमलीबारी दरम्यान जाणारा रस्ता वनक्षेत्रातील असल्याने वनविभागाची परवानगी आवश्यक होती़ वर्षभर परवानगीचा प्रस्ताव वनविभागाकडे पडून होता़ दरम्यान जागोजागी भराव केलेल्या जागांमधून वाहतूक सुरु होती़ यातून अपघात होण्याची भिती होती़ बांधकाम विभागाने यासाठी वनविभागाला पत्रव्यवहार करत पाठपुरावा सुरु ठेवल्याने त्यांनी गेल्या आठवड्यात मंजूरी दिली आहे़ पावसाळ्यात पक्के बांधकाम होवू शकत नसल्याने चार महिन्याची तरतूद म्हणून डाब ते आमलीबारी दरम्यान देवगोई घाटात दरड कोसळून रस्ता बंद होण्याची स्थिती निर्माण होवू नये यासाठी पुलांचा भराव व्यवस्थित करुन त्यावर पाईप टाकण्याचे तसेच पाण्याचा निचरा होण्यासाठी गटारी तयार केल्या जात आहेत़ जागोजागी कोसळलेली दरड वर्षभरानंतर बाजूला करण्यास वेग दिला आहे़ ही कामे पूर्ण होवून वाहतूक पावसाळ्यातही सुरळीत राहिल असे विभागाचे म्हणणे आहे़पावसाळा असल्याने पक्के काम करण्याऐवजी तरतूद म्हणून ढापा आणि पुलाची दुरुस्ती करत आहे़ पावसाळ्यानंतर पक्के काम केले जाईल अशी माहिती शाखा अभियंता रितेश पाडवी यांनी दिली आहे़