शहरं
Join us  
Trending Stories
1
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
2
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
3
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
4
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
5
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
6
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
7
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
8
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
9
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
10
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
11
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
12
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
13
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
14
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
15
ट्रम्प नरमले! अमेरिका-इराणमध्ये आणखी दोन आठवड्यांचा युद्धविराम होण्याची शक्यता, चर्चेसाठी ३ मुद्दे महत्वाचे
16
अकोल्यात उष्माघाताचा पहिला बळी? ४४ अंश तापमानाने घेतला जीव; ऑटोमध्ये आढळला मृतदेह
17
तुर्कीमधील शाळेत गोळीबार, ४ जणांचा मृत्यू, २० जखमी; दोन दिवसांतील दुसरी घटना
18
हात पकडून जवळ खेचले, मग Kiss केले आणि शरीरसंबंध ठेवले; TCS प्रकरणातील पीडितेचा थरारक अनुभव
19
इराणच्या अणू हक्कासाठी रशियाची एन्ट्री! युरेनियम समृद्धीकरणाला पुतिन यांचा पाठिंबा; अमेरिकेचा दबाव झुगारला
20
अफगाणिस्तानात पुन्हा एकदा हाहाकार! तीन दिवसांत दुसऱ्यांदा बसले भूकंपाचे तीव्र धक्के, काबुलची धरती हादरली!
Daily Top 2Weekly Top 5

दरड कोसळल्याने मोलगी-अक्कलकुवा रस्ता बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2019 20:34 IST

लोकमत न्यूज नेटवर्क वाण्याविहीर : अक्कलकुवा ते मोलगी रस्त्यावर डाब देवगोई जवळील मालीआबांपाडय़ाजवळ मंगळवारी रात्री दरड कोसळल्याने वाहतूक रात्रीपासून ...

लोकमत न्यूज नेटवर्कवाण्याविहीर : अक्कलकुवा ते मोलगी रस्त्यावर डाब देवगोई जवळील मालीआबांपाडय़ाजवळ मंगळवारी रात्री दरड कोसळल्याने वाहतूक रात्रीपासून बंद होती़ दरम्यान बुधवारी पहाटे मार्गावर रस्त्यालगत झाड ही उन्मळून पडल्याने रस्ता पुन्हा बंद झाला तर पावसामुळे घराची भिंत कोसळली़  अक्कलकुवा तालुक्याच्या दुर्गम भागात संततधार पाऊस सुरु आह़े यातून जागोजागी दरडी कोसळण्याच्या घटना घडत आहेत़ यातून रस्ते बंद झाल्याने सातपुडय़ातील काही गाव-पाडे संपर्कहीन झाली आहेत़ मंगळवारी रात्री उशिरा पावसाच्या संततधारेमुळे डाबच्या देवगोई पाडय़ातील किरजा नाना वसावे यांच्या कौलारु घराची भिंत पावसामुळे कोसळली़ देवगोई घाटात दोन दिवसापूर्वी कोसळलेली दरड व उन्मळून पडलेली झाडे संबधित विभागाने लागलीच जेसीबी च्या सहाय्याने बाजूला करीत रस्ता सुरळीत सुरू केला होता. मात्र मंगळवारी रात्री पुन्हा याच घाटात मालीआबापाडा जवळ रस्त्याच्या बाजूला दरड कोसळली़ दरडीचा मलबा रस्त्यावर पडल्याने मार्गावरील प्रवासी आणि खाजगी वाहतूक बंद पडली़ दरदिवशी दरड कोसळून रस्ता बंद होत असल्याने प्रशासनाने गांभिर्याने लक्ष देण्याची मागणी भाजपचे प्रदेश सदस्य नागेश पाडवी, संजय गांधी निराधार समितीचे अध्यक्ष धनसिंग वसावे यांच्यासह परिसरातील आदिवासी बांधवांनी प्रशासनाकडे केली आह़े दरडींचे व्यवस्थापनच गेल्या काही वर्षात झालेले नसल्याने हे प्रकार होत असल्याचे सांगण्यात येत आह़े दरडींमुळे गेल्या 15 दिवसांपासून मोलगी परिसरातील काही गावांमध्ये संपर्कच झालेला नसल्याचे सांगण्यात येत आह़े