शहरं
Join us  
Trending Stories
1
TCS प्रकरणातील मास्टरमाइंड HR निदा खान महाराष्ट्रातून पसार?; 'या' ३ राज्यांत पोलीस पथके रवाना
2
संसदेतील महाचर्चेतच मध्यरात्री लागू झाला महिला आरक्षण कायदा २०२३; सरकारने जारी केले नोटिफिकेशन
3
नराधम अयानला पोलिसांनीच भरवला केक;'बॉस'चा टी-शर्ट घालून भररस्त्यात वाढदिवस साजरा
4
Top Marathi News LIVE Updates: मी असतो तर आरोपींना फाशी दिली असती- अमित ठाकरे
5
MI vs PBKS: मैदान मुंबईचं अन् दशहत पंजाबची! श्रेयस अय्यरच्या संघानं वानखेडेवर रचला मोठा इतिहास
6
IPL 2026: ५ सामने, ० विकेट्स! MIचा हुकूमी एक्का जसप्रीत बुमराहचा 'फ्लॉप शो'; 'हे' आहे कारण
7
नवग्रह काही वाकडं करू शकणार नाही, उलट अपार लाभ-भरभराट होईल; अक्षय्य तृतीयेला ‘हे’ दान करा!
8
कर्जात बुडालेले लोक आता घेताहेत सोन्यावर कर्ज, बुडण्याची भीती वाढली
9
सोन्या-चांदीच्या दरात किरकोळ तेजी; पाहा २४K, २२K, १८K सोन्याचा तुमच्या शहरातील दर 
10
सांगली हादरली! पत्नीला घरात ठेवण्याच्या हट्टापायी आईची हत्या; वडील घरी नसताना मुलाचे क्रूर कृत्य
11
भारतासमोर नवं आव्हान, तेल कुठून आणायचं?; रशिया-इराण तेल निर्बंधावरील सूट अमेरिकेने हटवली
12
केवळ ४ वर्षांपर्यंत भरावा लागेल प्रीमिअम, नंतर मिळणार १ कोटींचं बेनिफिट; कोणती आहे LIC ची ही स्कीम?
13
डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणशी शांतता चर्चा करणार? म्हणाले, “मी पाकिस्तानात जाण्यास तयार”
14
Share Market: शेअर बाजाराची सुस्त सुरुवात! Sensex मध्ये किरकोळ तेजी, तर Nifty घसरला; ITC आणि अदानी एन्टरप्रायझेसचे शेअर्स चमकले
15
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला आमरसपुरीचे जेवण आणि पितरांना ठेवतात नैवेद्य; काय आहे प्रथा? वाचा 
16
होर्मुजच्या सामुद्रधुनीत जहाजांवरील हल्ले खपवून घेणार नाही! भारताचा संयुक्त राष्ट्रात इशारा; सुरक्षेसाठी आक्रमक भूमिका
17
Pakistan Explosion: पाकिस्तानमध्ये भीषण स्फोट! ८ जण ठार, अनेकजण होरपळले, नेमकं काय घडलं?
18
दोन सख्ख्या भावांची एकच बायको; १० महिन्यांनी झालं बाळ; बाप झाल्यावर काय म्हणाले दोघं भाऊ?
19
विराट कोहलीने पुन्हा मॉडेलचा फोटो केला LIKE, सोशल मीडियावर चर्चा, जाणून घ्या कोण आहे Lizlaz?
20
छत्तीसगड पॉवर प्लांट दुर्घटना: वेदांताचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांच्यासह १० जणांवर FIR
Daily Top 2Weekly Top 5

पालिकेत मोकाट गुरांमुळे धावपळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 25, 2020 13:11 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नवापूर :  नवापूर शहरातील सर्वच रस्त्यांवर मोकाट गुरे व उपद्रवाने शहरातील नागरिक पुरते हैराण झाले आहेत. ...

लोकमत न्यूज नेटवर्कनवापूर :  नवापूर शहरातील सर्वच रस्त्यांवर मोकाट गुरे व उपद्रवाने शहरातील नागरिक पुरते हैराण झाले आहेत. अनेक नागरिक जखमी        झाले आहेत यासंदर्भात आरपीआयचे नेते तथा माजी नगरसेवक चंद्रकांत नगराळे यांनी नगरपालिकेच्या कार्यालयाच्या प्रवेशद्वाराजवळ मोकाट गुरे बांधून आंदोलन केले. नगर पालिका प्रशासनाचा विरोधात घोषणा देत ठिय्या आंदोलन करण्यात आले.लेखी आश्वासन दिल्याशिवाय येथुन उठणार नाही असा पवित्रा घेतल्या नंतर नगराध्यक्षा हेमलता पाटील, नगरपालिकेचे कार्यालयीन अधीक्षक अनिल सोनार, आरोग्य निरीक्षक राजेंद्र चव्हाण, मिलिंद भामरे यांनी आंदोलनकर्त्याशी चर्चा करुन लेखी आश्वासन दिले. नवापूर शहरातील मोकाट गुरांचा बंदोबस्त करणेबाबत कार्यालयाकडे लेखी निवेदन दिले आहे. सदर निवेदनाच्या अनुषंगाने नवापूर नगरपरिषदेने कारवाई सुरू केली आहे. येत्या पंधरा दिवसात मोकाट गुरांचा बंदोबस्त नगर परिषदेमार्फत करण्यात येईल असे आश्वासन दिले. यावेळी रिपब्लिकन पार्टीचे तथा माजी नगरसेवक चंद्रकांत नगराळे यांनी गुरांच्या बंदोबस्त नगरपालिकेने १५ दिवसात न  केल्यास याहीपेक्षा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा यावेळी दिला.रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे नंदुरबार जिल्हाध्यक्ष युवा अध्यक्ष राहुल शिरसाठ यांनी मोकाट गुरे व कुत्र्यांच्या नवापूरकरांना होत असलेल्या त्रासाबद्दल माहिती  दिली. यावेळी माजी नगरसेवक चंद्रकांत नगराळे, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे नंदुरबार युवा जिल्हाध्यक्ष राहुल शिरसाठ, दिनेश नगराळे,नटु नगराळे, भटु नगराळे, सोहेब मिर्झा, प्रवीण तिरमली, रमीझ शेख, मुकेश गोसावी, सुनील राठोड, किरण झांझरे, अज्जु मक्राणी,राहुल सोनवणे, गोपी वाघ, संतोष तिरमली आदि यावेळी उपस्थित होते. नवापूर शहरातील गुरांना नगरपालिकेत आणून आंदोलन करण्याचा प्रकार पहिल्यांदाच पाहायला मिळाले.नगर पालिकेबाहेर आंदोलन पहाण्यासाठी लोकांनी गर्दी केली होती.