आमदार राजेश पाडवी यांनी तळोद्यात घेतली लस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2021 04:29 IST2021-03-19T04:29:39+5:302021-03-19T04:29:39+5:30

यावेळी आ. पाडवी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली कोरोनावरील रुग्णांना दिल्या जाणाऱ्या दोन्ही लसी सुरक्षित आहेत. तसे संशोधनातूनही ...

MLA Rajesh Padvi took the vaccine in Talodya | आमदार राजेश पाडवी यांनी तळोद्यात घेतली लस

आमदार राजेश पाडवी यांनी तळोद्यात घेतली लस

यावेळी आ. पाडवी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली कोरोनावरील रुग्णांना दिल्या जाणाऱ्या दोन्ही लसी सुरक्षित आहेत. तसे संशोधनातूनही समोर आले आहे. त्यामुळे लसीच्या दुष्परिणामाबाबत ज्या अफवा पसरवल्या जात आहेत, त्याकडे लक्ष देवू नका. विशेषत: ज्येष्ठ नागरिक व ज्यांना काही व्याधी असतील त्यांनीही आपल्या डॉक्टरांच्या सल्ल्याने लस टोचून घ्यावी, असे आवाहन त्यांनी केले.

यावेळी त्यांनी लसीकरणासाठी उपजिल्हा रुग्णालयातील व्यवस्था, त्याचे नियोजन, नागरिकांसाठी बैठक व्यवस्था याची माहिती डाॅ. महेंद्र चव्हाण, डाॅ. विजय पाटील यांच्याकडून जाणून घेतली. त्यांच्यासोबत भाजपचे बळीराम पाडवी, विठ्ठल बागले, कृष्णा पाडवी, प्रवीण पाडवी, प्रदीप शुक्ला यांनीही करोना प्रतिबंधक लस घेतली.

आ. पाडवी यांनी आरोग्य अधिकारी व कर्मचाऱ्यांनी लस टोचणीसाठी केलेल्या नियोजनाबाबत समाधान व्यक्त केले. तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. महेंद्र चव्हाण, वैद्यकीय अधीक्षक डॉ. विजय पाटील, परिचारिका पाडवी, ठाकरे, गावित, विशाल चौधरी, आरोग्य अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

Web Title: MLA Rajesh Padvi took the vaccine in Talodya