किरकोळ वादातून दोन गटात हाणामारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 16, 2019 12:07 PM2019-10-16T12:07:47+5:302019-10-16T12:07:55+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क अक्कलकुवा : शहरातील होळी चौक परिसरात दोन गटात किरकोळ वादातून हाणामारी झाल्याची घटना सोमवारी रात्री 10 ...

Minor arguments in two groups | किरकोळ वादातून दोन गटात हाणामारी

किरकोळ वादातून दोन गटात हाणामारी

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
अक्कलकुवा : शहरातील होळी चौक परिसरात दोन गटात किरकोळ वादातून हाणामारी झाल्याची घटना सोमवारी रात्री 10 वाजेच्या सुमारास घडली़ याप्रकरणी दोन्ही गटांनी परस्परविरोधी फिर्याद दिली आह़े 
कुरेशी मोहल्ल्यातील नासिर अल्लारख्खा मक्राणी व जमील रहेमान कुरेशी या दोघा युवकांमध्ये वाद झाला होता़ जमील हा नासिर मक्राणी याच्या ओटय़ावर बसून दंगामस्ती करीत असल्याने दोघांमध्ये वादावादी झाली़ दरम्यान जमील रेहमान कुरेशी, सादिक रहेमान कुरेशी, शारुख रसूल कुरेशी, शोएब रसुल कुरेशी सर्व रा़ आयटीआय कॉलजे जवळ कसाई मोहल्ला व नासीर कालु मक्राणी, नझीर कालु मक्राणी सर्व रा़ कसाई मोहल्ला यांच्या हाणामारी झाली होती़ यादरम्यान नासीर मक्राणी याने त्याच्याजवळील चाकूने जमीलखान मक्राणी याच्या हातावर वार केला होता़ तर दुस:या गटाकडून शारुख कुरेशी याने नासिर मक्राणी याच्या डोक्यात सळईने वार केला होता़ घटनेनंतर पोलीस निरीक्षक मेघश्याम डांगे यांनी तातडीने घटनास्थळी भेट देत परिस्थितीवर नियंत्रण मिळवल़े 
याप्रकरणी नासिर मक्राणी याच्या फिर्यादीवरुन जमील, सादिक, शारुख, शोएब या तिघांविरोधात तर जमील  कुरेशी याच्या फिर्यादीनुसार नासीर मक्राणी, नझीर मक्राणी, मम्मू मक्राणी यांच्याविरोधात अक्कलकुवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आह़े तपास सहायक पोलीस उपनिरीक्षक यशवंत वसावे व पोलीस कॉन्स्टेबल विजय वसावे करत आहेत़
 

Web Title: Minor arguments in two groups

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.