शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
2
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
3
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
4
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
5
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
6
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
7
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
8
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
9
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
10
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
11
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
12
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
13
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
14
पित्याने पोटच्या पोराला ज्युसरने ठेचून मारलं; आई-मुलाचं 'अनैतिक नातं' ठरलं हत्येचं कारण?
15
पुण्यात थरार..! मद्यधुंद व्यक्तीकडून बस ‘हायजॅक’चा प्रयत्न; संतोष माने प्रकरणाची पुनरावृत्ती होता होता वाचली
16
आप सोडताच राघव चड्ढांच्या लोकप्रियतेला ओहोटी; भाजप प्रवेशानंतर ११ लाख इन्स्टाग्राम चाहत्यांनी फिरवली पाठ
17
Monsoon 2026 Update: उन्हाच्या झळा आणि घामाच्या धारांमधून कधी होणार सुटका, यंदा मान्सून कधीपर्यंत दाखल होणार?
18
DC vs PBKS : बाप रे! IPL मॅचदरम्यान खेळाडूला गंभीर दुखापत! ॲम्ब्युलन्स मैदानात; नेमकं काय घडलं?
19
रेकॉर्ड ब्रेकर KL राहुल! हिटमॅन रोहित, विराटला जमलं नाही ते या पठ्ठ्यानं करुन दाखवलं
20
क्रूरतेचा कळस! दात तोडले, डोकं फोडलं अन् शेवटी... ब्लॉक केल्याच्या रागातून २ मुलांच्या आईला संपवलं
Daily Top 2Weekly Top 5

लाखो रुपये खचरून बांधलेली इमारत धूळखात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 25, 2019 10:59 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : लाखो रुपये खर्च करून तयार करण्यात आलेली नंदुरबार तालुका पोलीस ठाण्याची इमारत वर्षभरापासून धूळखात ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : लाखो रुपये खर्च करून तयार करण्यात आलेली नंदुरबार तालुका पोलीस ठाण्याची इमारत वर्षभरापासून धूळखात आहे. यंदाच्या पावसाळ्यात इमारत आवारात चार ते पाच फूट गवत उगवले आहे. गदरूले देखील या ठिकाणी भटकत असल्यामुळे त्यांना ते सोयीचे ठरले आहे. तातडीने तालुका पोलीस ठाण्याचे कामकाज या नवीन इमारतीत सुरू करावे अशी अपेक्षा तालुक्यातील जनतेकडून होत आहे. नंदुरबार तालुका पोलीस ठाण्याची इमारत पूर्वीपासून जुन्या तहसील कार्यालयाच्या आवारात ब्रिटीशकालीन इमारतीत होती. अतिशय तोकडय़ा जागेत तालुका पोलीस ठाण्याचे कामकाज वर्षानुवर्ष चालले. त्यानंतर त्याच ठिकाणी असलेले शहर पोलीस ठाणे हाटदरवाजाजवळील जुन्या कोषागार कार्यालयात स्थलांतरीत करण्यात आल्यानंतर ही इमारत तालुका पोलीस ठाण्याला देण्यात आली. परंतु दोन वर्षापूर्वी पुन्हा शहर पोलीस ठाणे जुन्याच इमारतीत स्थलांतर करून तेथे तालुका पोलीस ठाणे कार्यान्वीत करण्यात आले. याच दरम्यान तालुका पोलीस ठाण्यासाठी जागा मिळून तेथे इमारत बांधकामही करण्यात आले. गावाबाहेर निजर्नस्थळी जागातालुका पोलीस ठाण्याच्या इमारतीसाठी शहराबाहेर उमर्दे रस्त्यावर निजर्न स्थळी जागा देण्यात आली. एका बाजुुला रेल्वे मार्ग तर दुस:या बाजुला खाजगी कंपनी आहे. आजुबाजुला सर्व शेत शिवार आहे. रहिवास वस्ती या भागात नसल्यामुळे निजर्नस्थळी जाण्या-येण्यासाठी मोठी कसरत करावी लागणार आहे. जागा मंजुर करतांना या सर्व बाबींचा विचार करून ती मंजुर केली गेली पाहिजे होती, परंतु त्याबाबत ना पोलीस दल ना प्रशासनाने विचार केल्याचे दिसून येते. रात्री, अपरात्री या ठिकाणी जाणे म्हणजे मोठे दिव्य राहणार आहे. त्यामुळे तालुक्यातील लांबवरच्या गावातून आलेल्या नागरिकाला      त्रास सहन करावा लागेल हे मात्र निश्चित.सुविधांयुक्त इमारतया ठिकाणी बांधण्यात आलेली इमारत ही सर्व सोयीसुविधांयुक्त आहे. पोलीस निरिक्षकांचे स्वतंत्र दालन, सहायक व उपनिरिक्षक यांचे दालन, ठाणे अंमलदारची रूम, साहित्य व शस्त्र ठेवण्याची कस्टडी, आराम कक्ष, अभ्यागतांना बसण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था, कच्च्या आरोपींना ठेवण्यासाठीची सोय, स्वच्छतागृहे आदी सुविधा या ठिकाणी करण्यात आल्या आहेत. इमारत परिसरात प्रशस्त जागा आहे. या ठिकाणी वाहनतळ आणि जप्त केलेली वाहने उभी करण्यासाठी मोकळी जागा आहे. आजुबाजुला पक्के कुंपन बांधण्यात आले आहे.इमारतीचे नुकसानसर्व सुविधांयुक्त असलेली  इमारत गेल्या वर्षभरापासून पडून  आहे. या ठिकाणी दिवसा गुराखींचे विश्रांती स्थान असते तर इतर वेळी गदरुल्ले देखील या भागात भटकत असतात. यंदा पावसाचे प्रमाण    जास्त असल्यामुळे या ठिकाणी गवताचे प्रमाण वाढले आहे. पाण्याचे तळे साचले होते. त्यामुळे या    ठिकाणी विषारी जनावरे देखील मोठय़ा प्रमाणावर असण्याची शक्यता आहे. 

सध्या असलेल्या तालुका पोलीस ठाण्याच्या इमारतीत सुविधांचा अभाव आहे. शिवाय जागेचेही अडचण आहे. नवीन इमारत सुविधांयुक्त तयार असतांनाही पोलीस दल ही इमारत ताब्यात घेण्यास का कुचराई करीत आहे असा प्रश्न उपस्थित होत आहे. वर्षभरापूर्वी इमारतीच्या उद्घाटनाचा कार्यक्रम निश्चित करण्यात आला होता. परंतु तो ऐनवेळी रद्द करण्यात आला.