नवापूर तहसीलदारांच्या अध्यक्षतेखाली शाळा व्यवस्थापन समितीची सभा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2021 04:28 IST2021-03-20T04:28:42+5:302021-03-20T04:28:42+5:30

नंदुरबार जिल्ह्यात कस्तुरबा गांधी बालिका विद्यालयाची प्रत्येक तालुक्याला एक निवासी शाळा असून, एकूण सहा निवासी शाळा आहेत; मात्र अनुदान ...

Meeting of School Management Committee under the chairmanship of Navapur Tehsildar | नवापूर तहसीलदारांच्या अध्यक्षतेखाली शाळा व्यवस्थापन समितीची सभा

नवापूर तहसीलदारांच्या अध्यक्षतेखाली शाळा व्यवस्थापन समितीची सभा

नंदुरबार जिल्ह्यात कस्तुरबा गांधी बालिका विद्यालयाची प्रत्येक तालुक्याला एक निवासी शाळा असून, एकूण सहा निवासी शाळा आहेत; मात्र अनुदान नसल्याने विद्यार्थिनींना बोलाविण्यात अडचण येत आहे. दिवसेंदिवस कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता, तसेच पालकांच्या संमतीने विद्यार्थिनींना बोलवले जाण्याचे मुख्याध्यापिका ज्योती कापुरे यांनी शाळा व्यवस्थापन समितीच्या सभेत विषय मांडले. त्यावेळी नवापूर नगरपालिकेच्या नगराध्यक्ष हेमलता पाटील उपस्थित होत्या. त्यांनी शाळा परिसरातील वसतिगृहातील समस्या जाणून घेतल्या, तसेच नवापूर पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस अधिकारी संजय कोंडार यांनी वसतिगृहातील विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेबद्दल समस्या जाणून घेतल्या. याप्रसंगी नवापूर पंचायत समितीचे केंद्रप्रमुख किशोर रायते, वसतिगृहाचे गृहप्रमुख मनीषा नाईक, लेखापाल सपना बोरसे, योगेश खैरनार आदी उपस्थित होते.

Web Title: Meeting of School Management Committee under the chairmanship of Navapur Tehsildar