मेडीकलमधील चोरीत चोरटा सीसीटीव्हीत कैद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2020 21:27 IST2020-02-05T21:27:03+5:302020-02-05T21:27:13+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : मध्यवस्तीतील मेडीकल फोडून चोरट्याने रक्कम लांबविल्याची घटना नंदुरबारात घडली. चोरटा सीसीटीव्हीत कैद झाला आहे. ...

Medical CCTV imprisoned in a burglary | मेडीकलमधील चोरीत चोरटा सीसीटीव्हीत कैद

मेडीकलमधील चोरीत चोरटा सीसीटीव्हीत कैद

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : मध्यवस्तीतील मेडीकल फोडून चोरट्याने रक्कम लांबविल्याची घटना नंदुरबारात घडली. चोरटा सीसीटीव्हीत कैद झाला आहे. लवकरच त्याला जेरबंद केले जाईल असे पोलिसांनी सांगितले.
नंदुरबारातील आमदार कार्यालयासमोर असलेल्या मेडीकलचे शटर उचकवून चोरट्याने दुकानात प्रवेश केला. दुकानातील गल्ल्यातून चोरट्याने रोख रक्कम काढली. परंतु फारसे काही त्याच्या हाती लागले नाही. चोरट्याच्या सर्व हालचाली सीसीटीव्ही कॅमेऱ्यात टिपण्यात आल्या आहेत.
सकाळी दुकान मालक दिनेश माळी यांना ही बाब कळाल्यानंतर त्यांनी शहर पोलिसात माहिती दिली. पंचनामा करून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चोरटा २५ ते ३० वयोगटातील आहे. त्याला लवकरच जेरबंद करण्यात येईल असे पोलिसांनी सांगितले. भर वस्ती आणि चौकातील दुकान फोडल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.

Web Title: Medical CCTV imprisoned in a burglary