शहरं
Join us  
Trending Stories
1
"माझा सत्तेत बसलेल्यांना थेट सवाल आहे, तुमचं...", अमित ठाकरे नसरापूर प्रकरणावरून सरकारवर संतापले
2
एकाच गर्भातून जन्माला आल्या जुळ्या बहिणी, पण वडील मात्र वेगवेगळे! DNA चाचणीतून ४९ वर्षांपूर्वीचं गुपित झालं उघड अन्...
3
Maharashtra Weather: उष्णतेच्या तडाख्यातून दिलासा मिळणार, चार जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट! पुढील चार दिवस कसे असेल हवामान?
4
IPL 2026: रोहित शर्मा अखेर 'मुंबई इंडियन्स' सोडणार? एका व्हायरल पोस्टमुळे चर्चांना उधाण
5
इराणचा शांततेचा हात, ट्रम्प यांचा लाथ मारण्याचा इशारा! "चुकीचं वागलात तर याद राखा..."
6
नेपाळमध्ये 'बालेन' स्टाईल दणका! एका क्षणात १५०० सरकारी अधिकाऱ्यांना बसवलं घरी; नव्या सरकारचा मोठा निर्णय
7
मिस्ट्री स्पिनर सुनील नरेनचा ऐतिहासिक पराक्रम! IPL मध्ये २०० विकेट्स घेणारा पहिला परदेशी गोलंदाज
8
IPL मधील पहिला भारतीय शतकवीर! KKR कडून संधी मिळताच पठ्ठ्याची रोहित-विराटच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
9
Sara Tendulkar : "कसं वागावं, कोणते कपडे घालावे?"; सारा तेंडुलकरने केला सचिनच्या 'कडक' शिस्तीबाबत खुलासा
10
...तर नसरापूरच्या नराधमाला १५ ते २१ दिवसांत फाशीची शिक्षा झाली असती- राज्याचे माजी गृहमंत्री
11
Video: डोंगराळ मार्गावरून जात असताना अचानक रस्ता खचला, बघता-बघता ट्रक आत रूतला अन् मग...
12
कडक निर्बंध, तरीही इराणचं तेल पोहचलं आशियात! अमेरिकेच्या डोळ्यात धूळ फेकत कसं निघालं जहाज?
13
दिल्लीत AC ब्लास्टने जैन कुटुंब संपलं; आईच्या छातीशी घट्ट बिलगलेला दीड वर्षांचा आरू अन् शेवटचा तो व्हिडिओ कॉल...
14
आईच्या जीवाभावाच्या मैत्रिणीनेच रचला १४ वर्षांच्या चिमुरड्याच्या हत्येचा कट; सीसीटीव्हीमुळे फुटलं भांडं!
15
CSK vs MI: अवघ्या २१ धावांची खेळी, तरीही सूर्यकुमार यादवने मोडला किरॉन पोलार्डचा विक्रम
16
Devendra Fadnavis : "राहुल गांधींना महिला विषयावर बोलण्याचा अधिकारच नाही", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची टीका
17
"पप्पांनीच मम्मीला मारलं..."; पत्नीच्या मृतदेहाजवळ बसून ढसाढसा रडला, लेकीने केला पर्दाफाश
18
हे तर भन्नाटच! झोपा आणि बक्षीस जिंका; 'या' ठिकाणी रंगली अनोखी 'स्लीप कॉम्पिटिशन'
19
'मला जाळू नका आणि दफनही करू नका'; बहिणीची शेवटची इच्छा 'तिने' अशी केली पूर्ण; हाडांपासून बनवले विंड चाइम
20
पूर्ववैमनस्यातून तरुणाचा निर्घृण खून; पत्नीही गंभीर जखमी; तिन्ही आरोपी स्वतःहून पोलिसांत हजर
Daily Top 2Weekly Top 5

नर्मदा खोऱ्यातील प्रश्नांसदर्भात मेधा पाटकरांचे मुख्यमंत्र्यांना निवेदन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 21, 2021 04:28 IST

यासंदर्भात मुख्यमंत्र्यांना दिलेल्या निवेदनात त्यांनी म्हटले आहे की, सरदार सरोवर विस्थापन व पुनर्वसनात विस्थापितांवर मोठ्या प्रमाणात अन्याय केला जात ...

यासंदर्भात मुख्यमंत्र्यांना दिलेल्या निवेदनात त्यांनी म्हटले आहे की, सरदार सरोवर विस्थापन व पुनर्वसनात विस्थापितांवर मोठ्या प्रमाणात अन्याय केला जात आहे. प्रशासन स्तरावर केवळ कागदीच घोडे नाचविले जातात. त्यामुळे सरदार सरोवर पुनर्वसन, विस्थापन, तसेच सरदार सरोवरचा महाराष्ट्रास लाभहानी आणि त्याचबरोबर फडणवीस सरकारने गुजरातशी केलेला अवैध करार, या मुद्यावर आपल्या सोयीने लवकरात लवकर एक बैठक लावावी, अशी लेखी मागणी केली.

नर्मदा खोऱ्यातील पाणी हे या खोऱ्यातील आदिवासींना वंचित ठेवून तापीच्या खोऱ्यात वळविण्यासाठी प्रस्तावित केलेल्या आठ मध्यम प्रकल्पांना ग्रामसभांचा व अभ्यासकांचा विरोध आहे व राहील. या आराखड्यावर पुनर्विचार व नर्मदा खोऱ्यातच विकेंद्रित जलनियोजन हेही आपल्या चर्चेत घेणे आवश्यक आहे.

नंदुरबार जिल्ह्यातील धडगाव तालुक्यातील ७३ वनगावातील आदिवासींना अजूनही भूमीहक्क मिळालेले नाहीत. सर्व ७/१२ उतारे तयार असून, तसेच ७३ गावांचे महसुलीकरण हे राजपत्राद्वारे नोंदले असूनही हे काम विनाकारण अडवून पडले आहे. ज्यामुळे अनेक वर्षांपासूनचा आदिवासींवरील अन्याय दूर होईल. २००६ च्या वनाधिकार कायद्याची अंमलबजावणी ही या जिल्ह्यातील धडगाव व अक्कलकुवा तालुक्यातील दुर्गम गावांसाठी आदिवासी शेतकरी व गावांचा सामूहिक वनहक्क याबाबतीत हे प्राधान्याने होणे आवश्यक आहे.

वरील मुद्यांवर लवकर बैठक लावावी व चर्चेत नर्मदा घाटीतील अन्य प्रश्नावर चर्चा करण्यात येईल, अशा आशयाचे निवेदन देण्यात आले.

याप्रसंगी लवकरच मंत्रालयात बैठक लावण्यात येईल, असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले. यावेळी नर्मदा बचाव आंदोलनाच्या लतिका राजपूत, चेतन साळवे, पुण्या वसावे, मंगल्या वसावे, खेमसिंग पाडवी, ओरसिंग पटले, नाथ्या वसावे, सीताराम पाडवी, जोरदार पावरा आदी उपस्थित होते.

गाभा समितीत नर्मदा बचाव आंदोलनाच्या कार्यकर्ती व अशासकीय सदस्य लतिका राजपूत या तळोदा, धडगाव व अक्कलकुवा तालुक्यातील आरोग्याच्या प्रश्नाबाबत नेहमीच सूचना मांडतात; परंतु अजूनही बरेच प्रश्न प्रलंबित आहेत. त्यातही आरोग्य कर्मचाऱ्यांच्या रिक्त जागांचा मोठा प्रश्न आहे. साहजिकच यामुळे येथील आदिवासींना पुरेशा आरोग्य सुविधा मिळणे अशक्य असते. तेव्हा कर्मचाऱ्यांचा प्रश्न मार्गी लावावा, अशी आस त्यांनी प्रत्यक्ष मुख्यमंत्र्यांशी बोलून दाखवली.