नवापूर येथील खून प्रकरणातील मयत सुरत येथील व्यापारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2021 04:21 IST2021-06-19T04:21:16+5:302021-06-19T04:21:16+5:30

भावेश मेहता यांना हल्लेखोरांनी धारदार शस्त्राने वार करून हत्या केल्याचे प्रथमदर्शनी निदर्शनास आले आहे. घटनास्थळी बघ्यांची एकच गर्दी झाली ...

Mayat Surat trader in Navapur murder case | नवापूर येथील खून प्रकरणातील मयत सुरत येथील व्यापारी

नवापूर येथील खून प्रकरणातील मयत सुरत येथील व्यापारी

भावेश मेहता यांना हल्लेखोरांनी धारदार शस्त्राने वार करून हत्या केल्याचे प्रथमदर्शनी निदर्शनास आले आहे. घटनास्थळी बघ्यांची एकच गर्दी झाली होती. पोलिसांनी तपासाची चक्रे वेगात फिरवली असून, हल्लेखाेरांचा शोध घेण्यात येत आहे. नवापूर शहरातील राष्ट्रीय महामार्गानजीक असलेले हॉटेल्स, दुकान, गॅरेज यांचे सीसीटीव्ही फुटेज चेक करण्याचे काम पोलीस करीत आहेत.

आरोपींच्या शोधासाठी पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली एलसीबीची एक पथक गुजरात राज्यात रवाना केले आहे.

हत्याकांड पूर्वनियोजित असल्याचे बोलले जात आहे. भावेश मेहता दोन-तीन दिवसांपासून नवापूर शहरात येत असल्याचेही बोलले जात आहे. दोन दिवसाआधीच महामार्गावर एका हॉटेलमध्ये पाच-सहा जणांसोबत ते मेजवानी करताना दिसून आल्याची माहिती काहींनी पोलिसांना दिली.

या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. कोणी खून केला? नवापूर शहरात कार सोडून जाणारे हल्लेखोर कोण? हत्याकांडामध्ये कुणाचा संबंध आहे, याबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत.

Web Title: Mayat Surat trader in Navapur murder case