शहरं
Join us  
Trending Stories
1
ममता बॅनर्जींना दुहेरी धक्का, सत्ताही गेली-जागाही हरल्या; म्हणाल्या, “भाजपाचा अनैतिक विजय”
2
नसरापूर ग्रामस्थांनी एकनाथ शिंदेंची भेट घेतली; ‘त्या’ मागणीवर उपमुख्यमंत्र्यांनी दिला शब्द
3
IPL 2026 : हिटमॅन रोहितचा धमाका! MI च्या विक्रमी विजय; पंतच्या LSG ला पराभवाचा मोठा धक्का
4
गंगोत्री ते गंगासागर ‘कमळमय’, ऐतिहासिक विजयानंतर पीएम मोदींनी कार्यकर्त्यांचे मानले आभार
5
वानखेडेवर रोहित-रिकल्टनचा मोठा धमाका! LSG च्या गोलंदाजांची धुलाई करताना 'या' विक्रमाला घातली गवसणी
6
VIDEO: पंतप्रधान मोदींचा 'बंगाली लूक' हिट! पारंपरिक धोती-कुर्त्यात भाजप मुख्यालयात एन्ट्री
7
अंगारकी संकष्टी चतुर्थी २०२६: ८ राशींवर बाप्पा प्रसन्न, उच्च पद, मान-सन्मान; संकट दूर होईल!
8
बुमराहनं विकेट घेतली, सेलिब्रेशनही केलं! सायरन वाजल्यावर गावसकरांनी झापलं; नेमकं काय घडलं?
9
Nicholas Pooran Record : निकोलस पूरनचं वादळी अर्धशतक; वैभव सूर्यवंशीचा रेकॉर्ड मोडला
10
Election Results 2026 LIVE: आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त - पंतप्रधान नरेंद्र मोदी
11
सुनेत्रा पवारांच्या ऐतिहासिक विजयावर सुनील तटकरेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “अजितदादा…”
12
बारामतीत अभिजित बिचुकले-करुणा मुंडेंना NOTAने केले पराभूत; कोणाला किती मते मिळाली? पाहाच
13
CM फडणवीसांनी केले श्यामाप्रसाद मुखर्जींचे स्मरण; म्हणाले, “प. बंगालचा खरा पक्ष भाजपाच...”
14
निकालाची धाकधूक, दिवसभर दुकान बंद ठेवले, भाजपा विजयी होताच पुन्हा उघडले; झालमुडी विक्रेता म्हणाला…
15
Video - " गेली १५ वर्षे मार खाल्ला..."; भाजपाच्या विजयानंतर कार्यकर्ता आनंदाने ढसाढसा रडला
16
प. बंगालच्या मुख्यमंत्रिपदी कोण? टीव्हीवरून घराघरात पोहोचलेल्या अभिनेत्रीचं नाव चर्चेत...
17
Travel : जगात फक्त 'या' ५ देशांची नावं 'D' वरून होतात सुरू; ट्रॅव्हलर्ससाठी इथली ठिकाणं आहेत स्वर्ग!
18
Ravi Kishan : Video - "आज बंगाल स्वतंत्र झाला... आता मोकळा श्वास घेईल"; रवी किशन यांनी व्यक्त केला आनंद
19
MI vs LSG : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! हार्दिकच्या जागी सूर्या टॉसला आला; रोहितचं कमबॅक, कारण...
20
ममता बॅनर्जींची सत्ता गेली! पराभवानंतर अभिषेक बॅनर्जींची पहिली प्रतिक्रिया; मतमोजणीवर उपस्थित केले गंभीर प्रश्न
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षा सेतूच्या माध्यमातून विद्यार्थी गिरवताहेत गणित व संगणकाचे धडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2021 04:55 IST

नॅशनल स्टॉक एक्स्चेंज फाऊंडेशन, युनिसेफ आणि माईंडस्पार्कच्या सहकार्याने नंदुरबार प्रकल्पातील २८ आणि तळोदा प्रकल्पातील सात आश्रमशाळांमधून पहिली ली ते ...

नॅशनल स्टॉक एक्स्चेंज फाऊंडेशन, युनिसेफ आणि माईंडस्पार्कच्या सहकार्याने नंदुरबार प्रकल्पातील २८ आणि तळोदा प्रकल्पातील सात आश्रमशाळांमधून पहिली ली ते आठवीतील विद्यार्थ्यांसाठी हा प्रकल्प सुरू करण्यात आला आहे. प्रकल्पाच्या माध्यमातून शिक्षकांना माहिती, तंत्रज्ञान आणि संवाद विषयक प्रशिक्षणही देण्यात येत आहे.

माईंडस्पार्क लॅबसाठी आवश्यक विद्युत जोडणी, ७२५ संगणक टेबल, बसण्यासाठी १,५५३ स्टुल, राऊटर, युपीएस, एलईडी स्क्रीन सह ३५ सर्व्हर संगणक, विद्यार्थ्यांसाठी ७५९ लॅपटॉप, ४६ टॅबलेट, १,६१० हेडफोन आदी साहित्याची सुविधा प्रत्येक ठिकाणी करण्यात आली आहे. अध्ययनासाठी आवश्यक सॉफ्टवेअरदेखील उपलब्ध करून देण्यात आले आहे. प्रकल्पाबाबत प्रशिक्षण आणि संचलनासाठी आवश्यक मनुष्यबळदेखील उपलब्ध करून देण्यात आले आहे.

प्रत्येक आश्रमशाळेसाठी स्वतंत्र आयडी तयार करण्यात आला आहे, तसेच १२ हजार ७३२ विद्यार्थ्यांचे आयडी आणि पासवर्ड देखील तयार करण्यात आले आहेत आणि ३०० शिक्षक या प्रणालीशी जोडले गेले आहे. सर्व शिक्षकांचे प्रशिक्षणही घेण्यात आले आहे. विद्यार्थ्यांनादेखील याबाबतची माहिती देण्यात आली आहे. विषयक शिक्षक विद्यार्थ्यांना लॅबमध्ये घेऊन जातात. या ठिकाणी विद्यार्थी आपल्या पासवर्डच्या माध्यमातून प्रणालीत प्रवेश करतात आणि स्वाध्यायासह विविध प्रश्नांचा समावेश असलेल्या 8 प्रकारच्या ज्ञानवर्धक खेळात सहभागी होतात.

माऊस आणि कळफलकाचा उपयोग, कळफलकाच्या माध्यमातून लिहिणे, लॅपटॉपचा वापर करणे याबाबतची माहिती त्यांना देण्यात येते. प्रत्येक वर्षाच्या सुरूवातीला मराठी, गणित आणि इंग्रजी विषयासाठी विद्यार्थ्यांची चाचणी घेण्यात येते आणि त्यावरून त्याचा स्तर लक्षात घेतला जातो. चाचणीच्या आधारे प्रत्येक विद्यार्थी आपल्या गरजेनुसार माईंडस्पार्कद्वारे माहिती घेण्याचा प्रयत्न करतो. या संपूर्ण प्रक्रियेकडे शिक्षकांचे लक्ष असते.

लॅबचा अधिक कार्यक्षमपणे वापर करण्यासाठी वर्षातून दोनदा शिक्षकांना प्रशिक्षण देण्यात येते. त्यासाठी शिक्षण मित्रांची नियुक्ती संबंधित संस्थेतर्फे करण्यात आली आहे. या प्रकल्पाचे संनियंत्रण प्रकल्प कार्यालयाद्वारे नियमितपणे करण्यात येत आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचा ज्ञानाचा स्तर वाढविण्यासाठी, त्यांना तंत्रज्ञान विषयक माहिती देण्यासाठी, नाविन्याचा शोध घेण्याची प्रवृत्ती त्यांच्या निर्माण करण्यासाठी हा प्रकल्प उपयुक्त ठरत आहे. विद्यार्थ्यांना शिक्षणातून मिळणारा आनंद अध्ययनासाठी प्रेरक ठरत आहे.

अशी आहे प्रणाली-

* * * * *विद्यार्थी स्वत:कडील लॉगईन व पासवर्डने प्रणाली सुरू करतात.

* * * * *प्रणालीत दिलेले स्वाध्याय सोडवितात.

* * * * *सोडविलेल्या उदाहरणावरून सर्व्हर संगणकावर त्यांचा बौद्धीक स्तर शिक्षकांना लक्षात येतो.

* * * * *प्रणालीतून बाहेर पडताना सोडविलेल्या प्रश्नांचे गुणांकनही कळते.

* * * * *विद्यार्थ्यांना आलेल्या अडचणी शिक्षकांना कळत असल्याने त्यांना व्यक्तिश: मार्गदर्शन करता येते.

तंत्रज्ञानाचा उपयोग करून विद्यार्थ्यांना भाषा आणि गणित विषयाबाबत गोडी निर्माण करण्यासाठी एक चांगली सुविधा उपलब्ध झाली आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचे संगणकाबाबतचे ज्ञान वाढण्यासाठी प्रकल्प उपयुक्त ठरत आहे. विद्यार्थ्याला येणाऱ्या अडचणी स्वतंत्रपणे शिक्षकांना कळत असल्याने त्यांना मार्गदर्शन करणे शक्य होते.

्वसुमना पंत, सहायक जिल्हाधिकारी