तळोद्यात मन्सूरी समाजाचा सामूहिक विवाह सोहळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 3, 2020 12:42 IST2020-02-03T12:42:23+5:302020-02-03T12:42:39+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क तळोदा : मन्सुरी समाजाचा तिसरा सामूहिक विवाह रविवारी येथे झाला. या सोहळ्यात समाजातील ११ जोडप्यांचे शुभमंगल ...

Mass wedding ceremony of Mansuri community in Talod | तळोद्यात मन्सूरी समाजाचा सामूहिक विवाह सोहळा

तळोद्यात मन्सूरी समाजाचा सामूहिक विवाह सोहळा

लोकमत न्यूज नेटवर्क
तळोदा : मन्सुरी समाजाचा तिसरा सामूहिक विवाह रविवारी येथे झाला. या सोहळ्यात समाजातील ११ जोडप्यांचे शुभमंगल लावण्यात आले. दरम्यान, गेल्या वर्षाच्या तुलनेत यावर्षी सोहळ्यासाठी जोडप्यांची संख्या वाढल्यामुळे उपस्थित वºहाडीकडून समाजाचे कौतुक केले.
तळोदा येथील मन्सुरी समाजाने गौसिया मस्जिदजवळ समाजाचा तिसरा सामूहिक विवाह रविवारी आयोजित केला होता. त्यात समाजाच्या रितीरिवाजाप्रमाणे ११ जोडप्यांचे विवाह लावण्यात आले. या सोहळ्यास प्रमुख अतिथी म्हणून आमदार राजेश पाडवी, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा सीमा वळवी, माजी मंत्री अ‍ॅड.पद्माकर वळवी, भाजपचे प्रदेश सदस्य डॉ.शशिकांत वाणी, नगराध्यक्ष अजय परदेशी, उपनगराध्यक्षा भाग्यश्री चौधरी, नगरसेवक रामानंद ठाकरे, अमोनोद्दीन शेख, हितेंद्र क्षत्रिय, गौरव वाणी, अनिता परदेशी, जितेंद्र सूर्यवंशी, योगेश चौधरी, संदीप परदेशी, योगेश मराठे, निसारअली मक्राणी, गौतम जैन, अनिल माळी, प्रकाश ठाकरे, डॉ.देविदास शेंडे, महेंद्र कलाल, अरविंद पाडवी यांच्यासह मन्सुरी समाजाचे विविध गावातील अध्यक्ष उपस्थित होते.
प्रमुख पाहुण्यांनी समाजाच्या या उपक्रमाचे कौतुक करीत आजच्या महागाईच्या काळात समाजातील जास्तीत जास्त घटकांनी अशा प्रकारच्या सोहळ्याचे आयोजन करुन विवाहांसाठी केल्या जाणाऱ्या खर्चावर लगाम घातला पाहिजे़ यामुळे खर्च होणारा पैसा व वेळेची बचत होते. शिवाय समाजही एकत्र येतो. सूत्रसंचालन अविनाश मराठे यांनी केले.
विवाह सोहळा यशस्वी करण्यासाठी तळोदा मन्सुरी पंच जमात सामाजिक विकास संस्थेच्या कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले.

Web Title: Mass wedding ceremony of Mansuri community in Talod