10 लाखासाठी विवाहितेचा छळ

By Admin | Updated: May 27, 2017 13:44 IST2017-05-27T13:44:16+5:302017-05-27T13:44:16+5:30

विवाहितेला ठार मारण्याची दिली धमकी

Marriage for 10 Lakhs Married | 10 लाखासाठी विवाहितेचा छळ

10 लाखासाठी विवाहितेचा छळ

ऑनलाईन लोकमत

नंदुरबार : माहेरून 10 लाख रूपये आणावेत या कारणासाठी विवाहितेचा छळ करणा:या सासरच्यांविरोधात नंदुरबार तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आह़े 
आक्राळे ता़ नंदुरबार येथील माहेर व टिटाणे ता़ साक्री येथील सासर असलेल्या प्रमिला समाधान पाटील यांचा पती समाधान बालू पाटील व त्यांच्या कुटूंबियांकडून शारिरिक व मानसिक छळ करण्यात येत होता़ माहेरून 10 लाख आण, अन्यथा घटस्फोट देऊ अशी धमकी देऊन मारहाण करण्यात येत होती़ या जाचाला कंटाळून प्रमिला पाटील ह्या माहेरी आल्या होत्या़ मात्र तेथेही पतीसह त्याच्या कुटूंबियांकडून धमकावणे सुरूच असल्याने त्यांनी गुरूवारी तालुका पोलीस ठाणे गाठून आपबिती कथन केली़ पिडीत विवाहिता प्रमिला पाटील यांच्या फिर्यादीवरून समाधान बालू पाटील, लताबाई बालू पाटील, भिकन बळीराम पाटील रा़टिटाणे,  अजर्वा ईश्वर पाटील, ईश्वर पोपट पाटील रा़ खोरे ता़ साक्री,  सोनल राकेश पाटील, राकेश हिंमत पाटील रा़ धुळे चौफुली, पिंकीबाई बाळासाहेब पाटील, बाळासाहेब अशोक पाटील रा़ अमळनेर यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आह़े 

Web Title: Marriage for 10 Lakhs Married