शहरं
Join us  
Trending Stories
1
"रडण्याची वेळ आली आहे...!" बंगाल निकालापूर्वीच मौलाना जर्जिश अंसारी यांच भडकावू विधान; योगींना म्हणाले 'शेर'!
2
'भाजपाचा झेंडा असलेल्या कार ईव्हीएम स्ट्राँग रुमजवळ कशा?', ममता बॅनर्जींच्या मतदारसंघात खळबळ
3
मुंबईकर रहाणे-रघुवंशी जोडीचा हिट शो, रिंकूचा फिनिशिंग टच! SRH ला मात देत KKR ची विजयी हॅटट्रिक
4
"माझा सत्तेत बसलेल्यांना थेट सवाल आहे, तुमचं...", अमित ठाकरे नसरापूर प्रकरणावरून सरकारवर संतापले
5
लैंगिक शोषण प्रकरण: विनेश फोगाटचा मोठा खुलासा; "मीही त्या ६ पीडित महिला कुस्तीपटूंपैकी एक"
6
एकाच गर्भातून जन्माला आल्या जुळ्या बहिणी, पण वडील मात्र वेगवेगळे! DNA चाचणीतून ४९ वर्षांपूर्वीचं गुपित झालं उघड अन्...
7
Maharashtra Weather: उष्णतेच्या तडाख्यातून दिलासा मिळणार, चार जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट! पुढील चार दिवस कसे असेल हवामान?
8
"दादा वाचव, हे मला मारतील!" बहिणीची शेवटची हाक अन् बरेलीत लव्ह मॅरेजचा रक्तरंजित शेवट!
9
IPL 2026: रोहित शर्मा अखेर 'मुंबई इंडियन्स' सोडणार? एका व्हायरल पोस्टमुळे चर्चांना उधाण
10
आंबा पाहताच तोंडाला पाणी सुटतं, पण जरा थांबा; जास्त खाल्ल्याने शरीरात उष्णता वाढते, कारण...
11
इराणचा शांततेचा हात, ट्रम्प यांचा लाथ मारण्याचा इशारा! "चुकीचं वागलात तर याद राखा..."
12
नेपाळमध्ये 'बालेन' स्टाईल दणका! एका क्षणात १५०० सरकारी अधिकाऱ्यांना बसवलं घरी; नव्या सरकारचा मोठा निर्णय
13
मिस्ट्री स्पिनर सुनील नरेनचा ऐतिहासिक पराक्रम! IPL मध्ये २०० विकेट्स घेणारा पहिला परदेशी गोलंदाज
14
IPL मधील पहिला भारतीय शतकवीर! KKR कडून संधी मिळताच पठ्ठ्याची रोहित-विराटच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
15
Sara Tendulkar : "कसं वागावं, कोणते कपडे घालावे?"; सारा तेंडुलकरने केला सचिनच्या 'कडक' शिस्तीबाबत खुलासा
16
...तर नसरापूरच्या नराधमाला १५ ते २१ दिवसांत फाशीची शिक्षा झाली असती- राज्याचे माजी गृहमंत्री
17
Video: डोंगराळ मार्गावरून जात असताना अचानक रस्ता खचला, बघता-बघता ट्रक आत रूतला अन् मग...
18
कडक निर्बंध, तरीही इराणचं तेल पोहचलं आशियात! अमेरिकेच्या डोळ्यात धूळ फेकत कसं निघालं जहाज?
19
दिल्लीत AC ब्लास्टने जैन कुटुंब संपलं; आईच्या छातीशी घट्ट बिलगलेला दीड वर्षांचा आरू अन् शेवटचा तो व्हिडिओ कॉल...
20
आईच्या जीवाभावाच्या मैत्रिणीनेच रचला १४ वर्षांच्या चिमुरड्याच्या हत्येचा कट; सीसीटीव्हीमुळे फुटलं भांडं!
Daily Top 2Weekly Top 5

बंदी आदेशानंतरही भरले आठवडे बाजार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2020 12:29 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : कोरोनाचा प्रसार होऊ नये, प्रतिबंधात्मक उपाययोजना केल्या जाव्या व लोकांनी काळजी घ्यावी यासाठी ३१ ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : कोरोनाचा प्रसार होऊ नये, प्रतिबंधात्मक उपाययोजना केल्या जाव्या व लोकांनी काळजी घ्यावी यासाठी ३१ मार्च पर्यंत जिल्ह्यातील सर्व आठवडे बाजार मंगळवारपासून बंद ठेवण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी यांनी सोमवारी दिली होती़ परंतू या आदेशानंतरही मंगळवारी सकाळी नंदुरबार व शहादा येथील आठवडे बाजार सुरळीतपणे पार पडलने आहेत़ आठवडे बाजार बंदीचे आदेश रात्री उशिरापर्यंत समजू न शकल्याने दोन्ही ठिकाणी आठवडे बाजार भरल्याची माहिती आहे़जिल्हाधिकारी डॉ़ भारुड यांनी दक्षता म्हणून जिल्ह्यातील यात्रोत्सव आणि आठवडे बाजार बंद करुन विविध मार्गदर्शन सूचना केल्या आहेत़ यांची कठोर अंमलबजावणी होणे गरजेचे असताना आठवडे बाजार जिल्हा मुख्यालयाच्या ठिकाणीच आठवडे बाजार भरल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे़ दरम्यान कोरोनाची दहशत दिवसेंदिवस वाढत असून जिल्ह्यात त्याचा परिणाम जाणवू लागला आहे़ मंगळवारी सकाळपासून शहादा, नंदुरबार या मोठ्या शहरांमधून शिक्षणासाठी बाहेर गेलेले विद्यार्थी घराकडे परतत असल्याचे दृश्य होते़ प्रामुख्याने पुण्यासह विविध शहरात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पालकांना भिती असल्याने त्यांनी विद्यार्थ्यांना घरी बोलावून घेतल्याची माहिती देण्यात आली आहे़दुसरीकडे शासकीय कार्यालय आवारांमध्ये प्रथमच शुकशुकाट पसल्याचे दिसून आले़ जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद आदी कार्यालयात सकाळपासून केवळ कर्मचारी आणि अधिकारी यांचा वावर असल्याचे दिसून आले़ शासनाने बायोमेट्रीक बंद करण्याचे आदेश काढल्याने अधिकारी व कर्मचारी हे सह्या करुन कार्यालयात प्रवेश करत असल्याचे दिसून आले़शासनाने शाळा, महाविद्यालय यांना आधीच सुटी जाहिर केल्याने शाळांच्या आवारात शुकशुकाट होता़ बºयाच ठिकाणी शिक्षकांना शाळेत बोलावले गेल्याचे प्रकार दिसून आले होते़ महाविद्यालयांमध्येही हीच स्थिती होती़ खाजगी व्यवस्थापनाच्या शाळांमध्ये शिक्षक आणि कर्मचारी दिसून येत असल्याने त्यांना आदेशांची योग्य माहिती समोर आले आहे़कोरोना संदर्भातील खबरदारी व उपाययोजना रोखण्यासाठी आता रेल्वेनेही पाऊल उचचले आहे़ विशेषत: रेल्वेस्थानकावरील प्लॅटफॉर्मवर मोठ्या प्रमाणावर वर्दळ असते़ नातेवाईकांना भेटण्यासाठी त्यांना चहा व नाश्ता देण्यासाठी तसेच निरोप देण्यासाठी नागरिक रेल्वेस्थानकावर गर्दी करीत असतात़ ती कमी व्हावी यासाठी प्लॅटफॉर्मचे तिकिट दर वाढवण्याचा निर्णय रेल्वे बोर्डाने घेतला आहे़ त्यानुसार नंदुरबार प्लॅटफॉर्म तिकिट आता १० रुपयांवरुन ३० रुपये झाले आहे़ तर सुरत स्थानकावरील प्लॅटफॉर्मचे तिकिट ५० रुपये करण्यात आले आहे़ अशा पद्धतीने सर्वच रेल्वेस्थानकावरचे प्लॅटफॉर्म तिकिट वाढवण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे़