शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय परराष्ट्र मंत्रालयाचं नेपाळला रोखठोक उत्तर, लिपुलेखमार्गे मानसरोवर यात्रेला केला होता विरोध
2
Mansarovar Yatra: "लिपुलेख आमचाच!" भारताच्या मानसरोवर यात्रेला नेपाळचा विरोध; चीनवरही निशाणा
3
चार राज्यांच्या निवडणूका: फलोदीसह अमेरिकन पॉलिमार्केटमध्येही सट्ट्याची धूम; बंगालवर सर्वाधिक सट्टा, भाजपा-तृणमूलमध्ये 'कांटे की टक्कर'
4
CSK ला मोठा धक्का! पदार्पणात चमकलेल्या ऑलराउंडरचा पाय फ्रॅक्चर; तो उर्वरित स्पर्धेतून बाहेर
5
निकालापूर्वी बंगालमध्ये दहशत पसरवण्याचा प्रयत्न! भाजप नेत्याच्या घरावर गोळीबार, दोघांना अटक
6
वॉशिंग्टनची 'सुंदर' खेळी! अखेरच्या षटकात षटकार मारत संपवली मॅच; GT ने टेबल टॉपर PBKS ला दिला पराभवाचा धक्का
7
रेल्वे प्रवासात तुमची लूट तर होत नाहीये? जाणून घ्या, खाण्यापिण्याचे दर; बघा IRCTC चं अधिकृत रेट कार्ड
8
कोल्हापूर जिल्ह्यात नीट परीक्षेत गोंधळ, विद्यार्थ्यांचे नुकसान झाल्याची पालकांची तक्रार; नेमकं काय घडलं?
9
​परतवाड्याचा लाकूड बाजार आगीच्या भक्ष्यस्थानी; आकाशाला भिडल्या ज्वाळा, कोट्यवधींचे नुकसान!
10
"रडण्याची वेळ आली आहे...!" बंगाल निकालापूर्वीच मौलाना जर्जिश अंसारी यांच प्रक्षोभक विधान; योगींना म्हणाले 'शेर'!
11
GT vs PBKS: अर्धा संघ ४७ धावांत गारद! पंजाबसाठी मुंबईकर सूर्यांश शेडगेनं शड्डू ठोकला; २४ चेंडूत पहिली IPL फिफ्टी
12
'भाजपाचा झेंडा असलेल्या कार ईव्हीएम स्ट्राँग रुमजवळ कशा?', ममता बॅनर्जींच्या मतदारसंघात खळबळ
13
GT कडून बॉक्सरच्या लेकाला IPL पदार्पणाची संधी; CSK च्या ताफ्यातून बाकावर बसून ठरलेला IPL चॅम्पियन!
14
मिसिंग लिंकवर सेल्फी, फोटो काढाल, तर महागात पडेल; सीसीटीव्हीची नजर, MSRDCने दिला इशारा
15
एकाच गर्भातून जन्माला आल्या जुळ्या बहिणी, पण वडील मात्र वेगवेगळे! DNA चाचणीतून ४९ वर्षांपूर्वीचं गुपित झालं उघड अन्...
16
मुंबईकर रहाणे-रघुवंशी जोडीचा हिट शो, रिंकूचा फिनिशिंग टच! SRH ला मात देत KKR ची विजयी हॅटट्रिक
17
अल्पवयीन मुलीवर पित्याकडूनच अत्याचार, मुलगी गर्भवती; वडिलांस अटक
18
लॅपटॉप वापरताना 'ही' एक छोटी चूक ठरू शकते मोठा धोका! आताच सुधारली नाही, तर होईल भारी नुकसान
19
"माझा सत्तेत बसलेल्यांना थेट सवाल आहे, तुमचं...", अमित ठाकरे नसरापूर प्रकरणावरून सरकारवर संतापले
20
लैंगिक शोषण प्रकरण: विनेश फोगाटचा मोठा खुलासा; "मीही त्या ६ पीडित महिला कुस्तीपटूंपैकी एक"
Daily Top 2Weekly Top 5

बाजारात गर्दी आणि रेटारेटी कायम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2020 12:41 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : संचारबंदी व लॉक डाऊनचा कुठलाही परिणाम शहरी भागात दिसून येत नसल्याची स्थिती आहे. बाजारात ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : संचारबंदी व लॉक डाऊनचा कुठलाही परिणाम शहरी भागात दिसून येत नसल्याची स्थिती आहे. बाजारात खरेदी करण्यासाठी दररोज सकाळी मोठ्या प्रमाणावर गर्दी होत आहे. गुरुवारी तर नंदुरबार व शहाद्यात खरेदीसाठी प्रचंड गर्दी झाली होती. मंगळ बाजारात तर रेटारेटी देखील होत होती. त्यामुळे कोरोना बाबत कुणीही गांभिर्याने घेत नसल्याची स्थिती आहे.आता प्रशासनाने विविध वस्तू विक्रीच्या दुकांनांना परवाणगी दिल्याने शुक्रवारपासून गर्दी आणखी वाढण्याची शक्यता वर्तविली जात आहे. त्यामुळे लॉकडाऊन आणि संचारबंदीचा उद्देशालाच हरताळ फासला जात असल्याची स्थिती आहे.जिल्ह्यात सर्वत्र संचारबंदीची स्थिती असतांना तसेच नागरिकांना एकाच ठिकाणी गर्दी न करण्यासंदर्भात सुचना असतांना देखील त्याचे पालन कुणीही करीत नसल्याची स्थिती आहे. बाजारात तर अक्षरश: रेटारेटी सुरू आहे. केवळ किराणा दुकानांवर मार्र्कींगची सुविधा सुरू करण्यात आली आहे. पोलीस व जिल्हा प्रशासनाने देखील शिथीलता आणल्याने नागरिक कुणाचेही ऐकण्याच्या मनस्थितीत नसल्याची स्थिती आहे.बाजारात रेटारेटीगुरुवारी सकाळी बाजारात भाजीपाला, फळ व इतर वस्तू खरेदीसाठी अक्षरश: रेटारेटी झाली. सकाळी नऊ वाजेपासून १२ वाजेपर्यंत ही स्थिती कायम होती. नागरिकांना कोरोनाचे ना भय ना चिंता अशी स्थिती होती. बाजारात अनेक ठिकाणी अगदी एकमेकांना लागून भाजीपाला विक्रीच्या लॉरी लागल्या होत्या. त्यामुळे विशिष्ट अंतर ठेवून खरेदी करण्याच्या सुचनांचे कुणीही पालन करीत नसल्याची स्थिती आहे.किराणा दुकानांवर सतर्कताकिराणा दुकानांवर मात्र सतर्कता बाळण्यात येत असल्याचे चित्र आहे. अनेक लहान, मोठ्या किराणा दुकानदारांनी आपल्या दुकानांसमोर मार्कीग सिस्टिम करून त्याच अनुषंगाने ग्राहकांना किराणा वितरीत केले जात असल्याचे चित्र आहे. अशची पद्धत शिवसेनेतर्फे सुरू करण्यात आलेल्या भाजीपाला विक्री केंद्राच्या ठिकाणी देखील दिसून आली. भाजीपाला विक्रीच्या दुकानांवर देखील अशी पद्धत अवलंबविणे आवश्यक असतांना तसे कुठेही दिसून येत नाही.पोलिसांकडून शिथीलतासंचारबंदीच्या पहिल्या दिवशी पोलिसांकडून कडक धोरण अवलंबविण्यात आले होते. याबाबत तक्रारी झाल्यानंतर व नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त केल्या गेल्यानंतर त्यात थोडी शिथीलता आणली गेली.अनेक ठिकाणी तर पोलीस कर्मचारीच दिसून येत नसल्याची स्थिती आहे. त्यामुळे नागरिक कुणीही आणि कुठेही सहजपणे फिरतांना दिसून येत आहेत. त्यामुळेच ठिकठिकाणी गर्दी होत असल्याचे चित्र आहे.

किराणा, भाजीपाला व पिठाची गिरणी : कुठलेही निर्बंध नाहीत.बेकरी, रेस्टॉरंट व हॉटेल्स : सकाळी ८ ते दुपारी २ वाजेपर्यंत.अंडी, चिकन, मटन व मासे विक्री : सकाळी ८ ते १२ व दुपारी ३ ते ६(केवळ मंगळ, बुध, शुक्र व रविवार)पशु उपचार व औषधी दुकाने : सकाळी ९ ते दुपारी २कृषी खते व खाद्य दुकाने : सकाळी ९ ते दुपारी ३दूध विक्री केंद्र : सकाळी ७ ते ९, सायंकाळी ६ ते ८ वाजेपर्यंत.स्वस्त धान्य दुकाने : नियमित वेळेत सुरू राहतील.इंटरनेट सुविधा पुरविणारे, पुरवठा साखळी गोडावून, गोदाम, वेअर हाऊस यांना निर्बंध नाहीत.

जीवनावश्यक वस्तूचा तुटवडा राहणार नाही याची काळजी घेण्यात आली आहे. नागरिकांनी आवश्यक तेवढीच खरेदी करावी. विनाकारण गर्दी करून प्रशासनाच्या आदेशाचे उल्लंघन करू नये. जीवनावश्यक वस्तू पुरेशा प्रमाणात आहेत. त्यामुळे नागरिकांनी संयम राखावा असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारूड यांनी केले आहे.