मालेगाव रिटर्न डॉक्टरमुळे सुरू झाली धावपळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 4, 2020 11:53 AM2020-06-04T11:53:26+5:302020-06-04T11:53:39+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क सारंगखेडा : शहादा तालुक्यातील सारंगखेडा येथे मालेगाव रिटर्न झालेले पशुधन विकास अधिकाऱ्यांचा कोरोना पॉझीटिव्ह अहवाल प्राप्त ...

Malegaon return doctor started the rush | मालेगाव रिटर्न डॉक्टरमुळे सुरू झाली धावपळ

मालेगाव रिटर्न डॉक्टरमुळे सुरू झाली धावपळ

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
सारंगखेडा : शहादा तालुक्यातील सारंगखेडा येथे मालेगाव रिटर्न झालेले पशुधन विकास अधिकाऱ्यांचा कोरोना पॉझीटिव्ह अहवाल प्राप्त झाल्यानंतर त्यांच्या संपर्कातील वैजाली येथील पशुधन विकास अधिकारी, सहाय्यक पशुधन विकास अधिकारी व परिचर यांच्या पत्नीसह चार लोकांचे बुधवारी स्वॅब घेण्यात आले.
या वेळी संपूर्ण गाव तीन दिवस कडकडीत बंद ठेवण्यात येणार आहे. त्या पार्श्वभूमीवर कडक उपाययोजना करण्यात आल्या असून, अत्यावश्यक सेवा वगळता गाव १०० टक्के बंद ठेवून व्यापारी व ग्रामस्थ सहकार्य करीत आहेत.
शहादा तालुक्यातील सारंगखेडा येथे मालेगाव रिटर्न असलेले पशुधन विकास अधिकाऱ्यांचा पॉझिटिव्ह रिपोर्ट आल्यानंतर स्थानिक ग्रामपंचायत प्रशासनासह आरोग्य विभाग खडबडून जागे झाले. या वेळी तत्काळ पशुसंवर्धन दवाखाना कर्मचारी निवासस्थान व परिसर संपूर्ण बंदीस्त करण्यात आला. दरम्यान स्थानिक प्रशासनाकडून गाव निर्जंतुकीकरणासह विविध उपाययोजना करण्यात येत आहे. तसेच आरोग्य विभागाकडून १० लोकांना क्वॉरंटाईन करण्यात आले आहे. तसेच त्याच्या संपर्कात आलेल्या वैजाली येथील पशुधन विकास अधिकारी, सहाय्यक पशुधन विकास अधिकारी, परिचर व त्यांच्या पत्नीस अशा चार लोकांचे स्वॅब घेऊन पाठवण्यात आले आहे. उर्वरित लोकांचेही स्वॅब घेण्यात येतील, अशी माहिती आरोग्य प्रशासनाकडून देण्यात आली.
क्वॉरंटाईन करण्यात आलेल्यांच्या संपर्कातील व्यक्तींच्या अहवाल येत नाही तोपर्यंत गावात सर्व खबरदारीच्या उपाययोजना करण्यात येतील, अशी माहिती आरोग्य विभाग, ग्रामपंचायत प्रशासन व पोलीस प्रशासनाकडून देण्यात आली. दरम्यान बुधवारी जनता कर्फ्युत ग्रामस्थ व व्यापाºयांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवून कडकडीत बंद पाळण्यात आला. दरम्यान सारंखेडा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक चंद्रकांत सरोदे, आरोग्य विभाग व ग्रामपंचायत प्रशासन परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत.

चार लोकांच्या अहवालाची प्रतीक्षा सारंगखेडावासीयांना लागून आहे. स्थानिक प्रशासन व पोलीस प्रशासन संपूर्ण परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत. नागरिकांनी कोणतीही भीती बाळगू नये, घरात राहून आपले आरोग्य जपावे. तीन दिवस पूर्णत: जनता कर्फ्यूसाठी सहकार्य करावे. पॉझिटिव्ह व्यक्ती कोणाच्या संपर्कात आली असले तर स्वत:हून प्रशासनाला माहिती देण्यासाठी पुढे यावे, असे आव्हान जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष जयपालसिंह रावल, सरपंच सुशिलाबाई मोरे, पोलीस निरीक्षक चंद्र्रकांत सरोदे, वैद्यकीय अधिकारी डॉ.जयदेव ठाकरे, प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी सी.एम. पाटील, ग्राम विकास अधिकारी संजय मंडळे आदींनी केले आहे

होमिओ पॅथिक आरसोनिक अल्बम ३० हे औषध कोरूना विरुद्धच्या लढ्यात प्रभावी उपचार म्हणून उपयुक्त ठरत आहे. कोरोनावर मात करण्यासाठी ग्रामपंचायत प्रशासनाकडून गावातील १२ हजार लोकांना होमिओ पॅथिक औषधांचे वाटप करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष जयपालसिंह रावल यांनी दिली.

Web Title: Malegaon return doctor started the rush

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.