शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
2
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
3
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
4
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
5
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
6
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
7
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
8
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
9
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
10
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
11
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
12
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
13
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
14
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
15
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
16
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
17
केजीएमयूमध्ये खळबळ: १२वी पास तरूण बनला 'डॉक्टर'; बनावट लेटरहेडचा वापर करून रचला मोठा डाव!
18
"राजकारणात काम करणाऱ्या महिला, नेत्यांसोबत बेड…"; पप्पू यादव यांच्या विधानावर नोटिस जारी, खासदारकी धोक्यात? 
19
'ऑपरेशन सिंदूर'चा धसका! वर्ष उलटूनही हाफिज सईद आणि मसूद अजहर बिळांतून बाहेर येण्यास घाबरतायत
20
T20 मध्ये ६९ चेंडूत नाबाद १९५ धावा! आयुष म्हात्रेच्या जागी CSK 'या' धडाकेबाज फलंदाजाला संधी देणार?
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हास्तरीय बूथ संपर्क अभियान यशस्वी करा- भाजप संघटनमंत्री

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 08:10 IST

नंदुरबार शहरातील कन्यादान मंगल कार्यालयात गुरुवारी जिल्हास्तरीय बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्याप्रसंगी ते बोलत होते. बैठकीच्या प्रारंभी मान्यवरांनी ...

नंदुरबार शहरातील कन्यादान मंगल कार्यालयात गुरुवारी जिल्हास्तरीय बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्याप्रसंगी ते बोलत होते. बैठकीच्या प्रारंभी मान्यवरांनी भारतमातेचे पूजन केले. तसेच थोर राष्ट्रपुरुषांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण केले. बैठकीचे प्रास्ताविक जिल्हाध्यक्ष विजय चौधरी यांनी केले. व्यासपीठावर सातपुडा सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन दीपक पाटील, जिल्हा संघटन सरचिटणीस निलेश माळी, प्रदेश सदस्य राजेंद्रकुमार गावीत, आदिवासी मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष नागेश पाडवी, प्रदेश कार्यकारिणी सदस्य राजेंद्र गावीत,नवापूर तालुकाध्यक्ष भरत गावीत, नंदुरबार नंदुरबार शहराध्यक्ष नरेंद्र माळी उपस्थित होते.

विभागीय संघटनमंत्री रवी अनासपुरे म्हणाले, बूथरचना कार्यकर्त्यांच्या संघटनात्मक कामाचा आधार आहे. गेल्या काही वर्षांत प्रत्येक बूथवर १ ते ३० कार्यकर्त्यांच्या गट असावा म्हणून प्रयत्न आहे. मतदार यादीतील प्रत्येक पानाला पन्नाप्रमुख असावा. प्रदेशातील सर्व कार्यकर्त्यांचे एकाच वेळी बूथरचनेकडे लक्ष केंद्रित व्हावे या दृष्टीने दि. ३१ जानेवारी ते २१ फेब्रुवारीदरम्यान बूथ संपर्क अभियान दोन टप्प्यांमध्ये राबविण्यात येणार आहे. जिल्हा व मंडलस्तरावरसुध्दा बूथरचना विषयासाठी एक महामंत्री अथवा प्रमुख पदाधिकाऱ्याचे नाव सुचवावे, असे त्यांनी सांगितले.

३१ जानेवारी ते ७ फेब्रुवारी एका आठवड्याच्या काळात प्रदेशातील सर्व मंडलांच्या बैठका होतील. जिल्ह्यातील एका मंडलाच्या बैठकीसाठी प्रदेश पदाधिकारी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करतील. नमो अ‍ॅप कार्यकर्त्यांना तसेच पक्षाच्या समर्थकांना, सहानुभूतीदारांना तसेच सामान्य मतदारांनाही डाऊनलोड करावयास सांगणे, मंडलस्तरावरील पदाधिकाऱ्यांना तसेच विविध मोर्चा, आघाड्यांच्या पदाधिकाऱ्यांना प्रत्येकी ५-५ बूथची जबाबदारी सोपविणे, सदस्यता यादी अद्ययावत करणे, संघटनमंत्र्यांकडून मागील दोन लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांतील बूथनिहाय मतदानाची आकडेवारी मिळवणे, सर्व बूथचे मंडल पातळीवर ए-बी-सी-डी अशी वर्गवारी करावी, असे त्यांनी यावेळी सांगितले.

जिल्हाध्यक्ष विजय चौधरी यांनी ग्रामपंचायत निवडणुकीत कोपर्लीमध्ये ५० वर्षांनंतर भाजपने सत्तांतर केल्याने जिल्हा परिषद उपाध्यक्षांना धक्का.

कोरोनाकाळात भाजपने भरीव योगदान दिले. जिल्ह्यात १२८२ बूथ असून, जिल्हास्तरावर त्यांची लवकरच बैठक घेण्यात येईल. भाजपतर्फे ३१ जानेवारी ते २१ फेब्रुवारीदरम्यान राबविण्यात येणाऱ्या बूथरचना कार्यक्रम यशस्वी करण्यात येईल. श्री राम जन्मभूमी मंदिर निर्माण समर्पण अभियानात भाजपने सक्रिय सहभाग घेतला असल्याचेही त्यांनी सांगितले.